०६ डिसेंबर पंचांग आणि दिनविशेष

आजचे पंचांग 

  • तिथि-पंचमी – 12:10:00 पर्यंत
  • नक्षत्र-श्रवण – 17:19:02 पर्यंत
  • करण-बालव – 12:10:00 पर्यंत, कौलव – 23:41:35 पर्यंत
  • पक्ष- शुक्ल
  • योग-घ्रुव – 10:42:29 पर्यंत
  • वार- शुक्रवार
  • सूर्योदय- 07. 01
  • सूर्यास्त- 17.59
  • चन्द्र-राशि-मकर – 29:07:32 पर्यंत
  • चंद्रोदय- 11:16:59
  • चंद्रास्त- 22:44:00
  • ऋतु- हेमंत
जागतिक दिवस:
  • महापरिनिर्वाण दिन
महत्त्वाच्या घटना:
  • १७६८: एनसायक्लोपीडिया ब्रिटानिकाचा पहिला अंक प्रकाशित झाला.
  • १८७७: द वॉशिंग्टन पोस्ट या वृत्तपत्राच्या प्रकाशनास सुरूवात झाली.
  • १८९७: परवाना टॅक्सीकॅब सुरु करणारे लंडन हे जगातील पहिले शहर ठरले.
  • १९१७: फिनलँड (रशियापासुन) स्वतंत्र झाला.
  • १९७१: भारताने बांगलादेशला मान्यता दिल्यामुळे पाकिस्तानने भारताशी राजनैतिक संबंध तोडले.
  • १९७८: स्पेनने सार्वमत चाचणीच्या कौलावरुन नवीन संविधान अंगीकारले.
  • १९८१: डॉ. एस. झेड. कासिम यांच्या नेतृत्त्वाखाली ’पोलर सर्कल’ या जहाजातून भारताची तुकडी आपल्या पहिल्या अंटार्क्टिक मोहिमेवर गोव्यातील मार्मागोवा बंदरातून रवाना झाली. ९ जानेवारी १९८२ रोजी रात्री साडेबारा वाजता अंटार्क्टिकावर पोचली. भारत हा अंटार्क्टिका मोहीम करणारा तेरावा देश बनला.
  • १९९२: अयोध्येत कारसेवकांनी बाबरी मशिद पाडली. त्यामुळे उसळलेल्या दंगलीत सुमारे १,५०० लोक ठार झाले.
  • १९९७: जपान च्या क्योटो मध्ये आंतरराष्ट्रीय हवामान परिषदच्या सम्मेलनाचे उद्घाटन.
  • १९९८: बँकॉक मध्ये १३ वी आशियाई क्रीडा स्पर्धेला सुरुवात.
  • १९९८: ह्यूगो चावेझ यांना व्हेनेझुएला चे राष्ट्रपती म्हणून निवडल्या गेले.
  • १९९९: जर्मनीची लॉनटेनिसपटू स्टेफी ग्राफ हिला ’ऑलिम्पिक ऑर्डर’ या प्रतिष्ठेच्या पुरस्काराने गौरविण्यात आले.
  • २०००: थोर समाजसेवक बाबा आमटे यांना राष्ट्रपती के. आर. नारायणन यांच्या हस्ते केन्द्र सरकारचा ’डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय पुरस्कार’ प्रदान करण्यात आला.
  • २००६: ला नासाने मार्स ग्लोबल सर्वेयर ने काढलेले फोटो सार्वजनिक केले.
  • २००७: ला ऑस्ट्रेलिया च्या शाळेमध्ये शीख विध्यार्थ्यांना कृपाण आणि मुस्लीम विध्यार्थ्यांना हिजाब नेण्यास परवानगी मिळाली होती.
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
  • १४२१: हेन्‍री (सहावा) – इंग्लंडचा राजा (मृत्यू: २१ मे १४७१)
  • १७३२: वॉरन हेस्टिंग्ज – भारताचा पहिला गव्हर्नर जनरल (मृत्यू: २२ ऑगस्ट १८१८)
  • १८२३: मॅक्समुल्लर – जर्मन विचारवंत (मृत्यू: २८ आक्टोबर १९००)
  • १८६१: रेव्हरंड नारायण वामन तथा ना. वा. टिळक – कवी व लेखक (मृत्यू: ९ मे १९१९)
  • १८५३: हरप्रसाद शास्त्री – संस्कृत विद्वान, शिक्षणतज्ञ, इतिहासकार (मृत्यू: १७ नोव्हेंबर १९३१)
  • १९१६: ’गंधर्व भूषण’ जयराम शिलेदार (मृत्यू: ६ नोव्हेंबर १९९२)
  • १९१७: बास्किन-रॉबिन्स चे सहसंस्थापक इरब रोबिन्स यांचा जन्म. (मृत्यू: ५ मे २००८)
  • १९२३: वसंत सबनीस – लेखक व पटकथाकार (मृत्यू: १५ आक्टोबर २००२)
  • १९३२: कमलेश्वर – पद्मभूषण पुरस्कार विजेते हिन्दी लेखक, पटकथालेखक, दूरदर्शनचे अतिरिक्त संचालक (मृत्यू: २७ जानेवारी २००७)
  • १९४५: अभितेने शेखर कपूर यांचा जन्म.
  • १९४८: भरतनाट्यम नृत्यांगना सुचेता भिडे-चापेकर यांचा जन्म.
  • १९८५: भारतीय क्रिकेटपटू आर. पी. सिंग यांचा जन्म.
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
  • १८९२: सीमेन्स कंपनीचे संस्थापक वर्नेर व्होंन सीमेन्स यांचे निधन. (जन्म: १३ डिसेंबर १८१६)
  • १९५६: डॉ. बाबासाहेब आंबेडकर – भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, अस्पृश्यांच्या मुक्तिसंग्रामाचे खंदे नेते, अस्पृश्य समजल्या जाणार्‍या जातितील पहिले मॅट्रिक व पहिले पदवीधर, इंग्लंडमध्ये वकिलीतील बॅरिस्टरची परीक्षा दिली आणि अर्थशास्त्रात डॉक्टरेट मिळवली. (जन्म: १४ एप्रिल १८९१)
  • १९७१: भारतातील भूविज्ञान अध्ययनाचा पाया घालणारे वैज्ञानिक कमलाकांत वामन केळकर यांचे निधन. (जन्म: १ जानेवारी १९०२)
  • १९७६: क्रांतिसिंह नाना पाटील – स्वातंत्र्यसैनिक, समाजसुधारक, ’पत्री सरकार’चे (प्रति सरकार) संस्थापक आणि कम्युनिस्ट पक्षाचे खासदार (जन्म: ३ ऑगस्ट १९००)
  • १९९८: ला परमवीर चक्र विजेता मेजर होशियार यांना वीरमरण.
  • २००९: ला भारतीय अभिनेत्री बिना राय यांचे निधन.
  • २०१३: नेल्सन मंडेला तथा ’मदीबा’ – दक्षिण अफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष, नोबेल पारितोषिक विजेते (जन्म: १८ जुलै १९१८)
  • २०१५: ला भारतीय चित्रपट अभिनेता राम मोहन याचे निधन.

दररोजच्या अपडेट्स साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.

Loading

Facebook Comments Box






मराठी तरुण-तरुणींना परदेशांत शिक्षण आणि नोकरीसाठी सर्वतोपरी मदत करणारी मराठी माणसांनी चालवलेली संस्था.
अधिक माहितीसाठी खालील लिंक वर क्लिक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search