Konkan Raiwlay:या महिन्यात कोकणात गावी जाणाऱ्या प्रवाशांसाठी एक खुशखबर आहे. पश्चिम रेल्वे कोकण रेल्वे मार्गावर एक दिनांक ०८ डिसेंबर पासून एक द्विसाप्ताहिक विशेष गाडी चालविणार आहे. या गाडीच्या एकूण १६ फेऱ्या होणार असून या गाडीचे आरक्षण दिनांक ०७ डिसेंबर रोजी पासून सुरु होणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनातर्फे देण्यात आली आहे. या गाडी बद्दल अधिक माहिती खालीलप्रमाणे
०९४१२/०९४११ अहमदाबाद – थिवी – अहमदाबाद द्विसाप्ताहिक विशेष (एकूण १६ फेऱ्या)
गाडी क्रमांक ०९४१२ विशेष अहमदाबाद येथून दिनांक ०८ डिसेंबर ते १ जानेवारी २०२५ पर्यंत दर रविवार आणि बुधवार या दिवशी दुपारी १४:१० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ११ वाजता थिवी येथे पोहोचेल.
गाडी क्रमांक ०९४११ विशेष थिवी येथून दिनांक ०९ डिसेंबर ते २ जानेवारी २०२५ पर्यंत दर सोमवार आणि गुरुवार या दिवशी सकाळी ११:४० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी रात्री ०८:४५ वाजता अहमदाबाद येथे पोहोचेल.
थांबे: आनंद,वडोदरा, भारूच, उधना, वलसाड, वापी, पालघर, वसई रोड, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी,राजापूर रोड, कणकवली, कुडाळ आणि सावंतवाडी
ही गाडी एसी टू टायर, एसी थ्री टायर, स्लीपर क्लास आणि जनरल कोचसहीत चालविण्यात येणार आहे.
Facebook Comments Box
Vision Abroad