Shaktipeeth Expressway Updates:वर्धा जिल्ह्यापासून सांगली जिल्ह्याच्या हद्दीपर्यंतच्या शक्तीपीठ द्रुतगती महामार्ग प्रकल्पाला जनता पूर्ण पाठिंबा देत असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शपथविधी नंतर घेतलेल्या आपल्या पहिल्या पत्रकार परिषदेत दिली. त्यानुसार या जिल्ह्यांमध्ये भूसंपादन सुरू करून पूर्ण केले जाणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.
हा द्रुतगती मार्ग ज्या 12 जिल्ह्यांतून जातो, त्यापैकी केवळ सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातच विरोध आहे, ज्यांच्या जमिनी संपादित कराव्या लागणार आहेत, त्यांच्याशी चर्चा करून तोडगा काढला जाईल आणि या महामार्गाचे काम लवकरच सुरू केले जाईल असे ते म्हणालेत.
11 जिल्हय़ातून जाणार्या सुमारे 802 किलोमीटर लांबीच्या या द्रुतगती महामार्गाला शेतकर्यांनी विरोध केला होता. आत्ताच झालेल्या लोकसभा निवडणुकीत महायुतीला त्यामुळे मोठा फटकाही बसला होता. त्यामुळ सावधानता म्हणुन विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर या प्रकल्पाच्या भूसंपादन प्रक्रियेस तात्पुरती स्थगिती देण्यात आली होती. मात्र विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठे भेटले आहे. त्यामुळे हा प्रकल्प पूर्णत्वास नेण्यास हालचाली झाल्या आहेत.
शक्तीपीठ एक्स्प्रेसमध्ये 802 किमी लांबीमध्ये 26 इंटरचेंज असतील.
- पवनार-येळा
- कळंब-राळेगाव
- यवतमाळ
- माहूरगड-आर्णी
- पुसद
- उमरखेड
- हिंगोली-नांदेड
- औंढा नागनाथ-बसमत
- परभणी
- गंगाखेड
- परळी वैजनाथ
- अंबेजोगाई-घाटनांदूर
- लातूर
- तुळजापूर-धाराशिव
- बार्शी
- सोलापूर
- पंढरपूर-मंगळवेढा
- सांगोला
- सांगली
- नरसोबाची वाडी
- पट्टण कोडोली
- कोल्हापूर बायपास
- पन्हाळा
- आदमपूर
- गारगोटी
- बांदा-पत्रादेवी
Vision Abroad