०९ डिसेंबर पंचांग आणि दिनविशेष

आजचे पंचांग

  • तिथि- अष्टमी – 08:04:55 पर्यंत, नवमी – 30:03:56 पर्यंत
  • नक्षत्र- पूर्वाभाद्रपद – 14:56:52 पर्यंत
  • करण- भाव – 08:04:55 पर्यंत, बालव – 19:06:47 पर्यंत
  • पक्ष- शुक्ल
  • योग- सिद्वि – 25:05:09 पर्यंत
  • वार- सोमवार
  • सूर्योदय- 07:03
  • सूर्यास्त- 18:00
  • चन्द्र राशि- कुंभ – 09:15:24 पर्यंत
  • चंद्रोदय- 13:15:00
  • चंद्रास्त- 25:37:00

 

महत्त्वाच्या घटना:
  • १७५३: थोरले माधवराव पेशवे यांचा रमाबाई यांच्याशी विवाह झाला.
  • १७५८: मद्रास मध्ये सुरु झालेल्या तेरा महिन्यांच्या युद्धाला सुरुवात.
  • १८९२: इंग्लिश फुटबॉल क्लब न्यूकॅसल युनायटेडची स्थापना झाली
  • १८९८: बेलूर मठाची स्थापना झाली.
  • १९००: लॉन टेनिसमधील ’डेव्हिस कप’ स्पर्धांना सुरुवात झाली.
  • १९००: अमेरिकेतील सर्वधर्म परिषदेत भाग घेऊन स्वामी विवेकानंद भारतात मुंबईमध्ये परतले.
  • १९२४: हंगेरी आणि हॉलंड या दोन देशांमध्ये व्यापार करार झाला होता.
  • १९४१: चीन ने जर्मनी, इटली, आणि जपान यांच्या विरुद्ध युद्धाची घोषणा केली.
  • १९४६: दिल्लीमध्ये घटना परिषदेची पहिली बैठक.
  • १९६१: पोर्तुगीज यांच्या ताब्यात असलेले दिव व दमण हे प्रांत भारतात समाविष्ट केले.
  • १९६१: ब्रिटन पासुन स्वतंत्र होऊन टांझानिया (Tanganyika) देशाचा जन्म
  • १९६६: बार्बाडोसचा संयुक्त राष्ट्रसंघात (United Nations) प्रवेश.
  • १९७१: संयुक्त अरब अमिरातींचा संयुक्त राष्ट्रसंघात (United Nations) प्रवेश.
  • १९७५: बारामती-पुणे थेट रेल्वेचा शुभारंभ.
  • १९९८: शेन वार्न और मार्क वॉ या दोघांनी १९९४ मध्ये श्रीलंका दौऱ्यावर असताना एका पाकिस्तान सट्टेबाजा कडून काही रक्कम घेतल्याची कबुली केली.
  • २००२: जॉन स्नो अमेरिकेचे नवीन अर्थमंत्री बनले.
  • २००६: पाकिस्तान ने अणु क्षमता असलेले क्षेपणास्त्र हत्फ़-3 गजनवी चे यशस्वी प्रक्षेपण केले.
  • २००७: पाकिस्तान च्या माजी प्रधानमंत्री बेनजीर भुट्टो यांनी पाकिस्तान सरकार सोबत पूर्णप्रकारे त्यांचे संबंध समाप्त केले.
  • २००८: इस्त्रो ने युरोप च्या प्रसिद्ध कंपनी एडीएम एस्ट्रीयस साठी नवीन उपग्रहाचे निर्माण केले होते.
  • २०१३: इंडोनेशिया मेंबिनटारो च्या जवळ एका ट्रेन अपघातात ६३ लोक जखमी झाले होते.
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
  • १५०८: डच गणिती आणि नकाशे तज्ञ गेम्मा फ्रिसियस यांचा जन्म.
  • १४७८: भारताचे प्रसिद्ध कवी संत सूरदास यांचा जन्म.
  • १६०८: जॉन मिल्टन – कवी, विद्वान व मुत्सद्दी (मृत्यू: ८ नोव्हेंबर १६७४)
  • १८२५: भारताचे प्रमुख नायक राव तुला राम यांचा जन्म.
  • १८६८: फ्रिटझ हेबर – नायट्रोजनपासून मोठ्या प्रमाणावर अमोनिआ वायू मिळवण्याची पद्धत शोधल्याबद्दल नोबेल पारितोषिक मिळालेले (१९१८) जर्मन रसायनशास्त्रज्ञ. (मृत्यू: २९ जानेवारी १९३४ – बाझेल, स्वित्झर्लंड)
  • १८७०: भारतीय डॉक्टर आणि मिशनरी आयडा एस स्कडर यांचा जन्म. (मृत्यू: २३ मे १९६०)
  • १८७८: अण्णासाहेब लठ्ठे – कोल्हापूर संस्थानचे दिवाण व शिक्षणमंत्री (मृत्यू: १६ मे १९५०)
  • १८८९: मध्ये आसाम मधील प्रथम असहयोगी चळवळीतील नेते चन्द्रनाथ शर्मा यांचा जन्म.
  • १९१३: पहिली महिला फोटोग्राफर होमी व्यारावाला यांचा जन्म.
  • १९१८: भारताचे प्रसिद्ध नाटककार कुशवाहा कान्त यांचा जन्म.
  • १९१९: केरळचे मुख्यमंत्री ई. के. नयनार यांचा जन्म.
  • १९२२: अमेरिकेचे हास्यकलाकार रेड फॉक्स्स यांचा जन्म.
  • १९२९: प्रसिद्ध भारतीय कवी रघुवीर सहाय यांचा जन्म.
  • १९४६: सोनिया गांधी – जन्माने इटालियन असलेल्या भारतीय राजकारणी
  • १९४६: चित्रपट अभिनेते आणि खासदार शत्रुघ्न सिन्हा यांचा जन्म.
  • १९८१: अभिनेत्री दिया मिर्झा यांचा जन्म.
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
  • १७६१: हंबीरराव मोहिते यांच्या पुत्री ताराबाई यांचे निधन.
  • १९७१: भारतीय नौसेना सैनिक महेंद्रनाथ मुल्ला यांचे निधन.
  • १९४२: डॉ. द्वारकानाथ कोटणीस – हिंदी चिनी मैत्रीचे प्रतीक (जन्म: १० आक्टोबर १९१०)
  • १९९३: चित्रपट अभिनेत्री स्नेहप्रभा प्रधान यांचे निधन.
  • १९९७: के. शिवराम कारंथ – कन्‍नड लेखक, सामाजिक कार्यकर्ते, पर्यावरणवादी, चित्रपट निर्माते आणि विचारवंत (जन्म: १० आक्टोबर १९०२ – कोटा, दक्षिण कन्नडा, कर्नाटक)
  • २००७: भारतीय लेखक त्रिलोचन शास्त्री यांचे निधन.
  • २००९: प्रसिद्ध तबला वादक उस्ताद हनीफ मोहम्मद खान यांचे निधन.
  • २०१२: बारकोडचे सहनिर्माते नॉर्मन जोसेफ वोंडलँड यांचे निधन. (जन्म: ६ सप्टेंबर १९२१)
  • pacer height=”20px”]

दररोजच्या अपडेट्स साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.

Loading

Facebook Comments Box






मराठी तरुण-तरुणींना परदेशांत शिक्षण आणि नोकरीसाठी सर्वतोपरी मदत करणारी मराठी माणसांनी चालवलेली संस्था.
अधिक माहितीसाठी खालील लिंक वर क्लिक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search