आजचे पंचांग
- तिथि-द्वादशी – 22:28:32 पर्यंत
- नक्षत्र-अश्विनी – 09:53:20 पर्यंत
- करण-भाव – 11:50:57 पर्यंत, बालव – 22:28:32 पर्यंत
- पक्ष- शुक्ल
- योग-परिघ – 15:22:39 पर्यंत
- वार- गुरूवार
- सूर्योदय- 07:04
- सूर्यास्त- 18:01
- चन्द्र-राशि-मेष
- चंद्रोदय- 15:16:00
- चंद्रास्त- 28:41:00
- ऋतु- हेमंत
महत्त्वाच्या घटना:
- १७८७: ला पेनसिल्वेनिया हे अमेरिकेचे संविधान स्विकार करणारे दुसरे राष्ट्र बनले.
- १७५५: डच इस्ट इंडिया कंपनीचे निकोबार येथे आगमन
- १८००: ला वॉशिंग्टन डीसी अमेरिकेची राजधानी बनले.
- १८८२: आनंदमठ या बंकिमचंद्र यांच्या कादंबरीचे प्रकाशन, याच कादंबरीमध्ये वंदे मातरम् हे गीत आहे.
- १८८४: ला इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया या दोन देशांमध्ये क्रिकेट सामना खेळला गेला जो अधिकृत रित्या पहिला होता.
- १९०१: जी. मार्कोनी याला प्रथमच बिनतारी संदेशाचे अटलांटिक महासागर पार प्रक्षेपण करण्यात यश मिळाले.
- १९११: दिल्ली ही भारताची राजधानी करण्यात आली. या आधी कोलकाता ही भारताची राजधानी होती.
- १९११: ला जॉर्ज पाचवा भारतामध्ये आला होता.
- १९१७: ला इटली येथील फ्रेंच आल्प्स येथे फ्रान्स च्या सैन्याची रेल्वे रुळावरून रेल्वे घसरून ५४३ लोकांचा मृत्यू.
- १९२३: ला इटलीच्या गंगा मानल्या जाणाऱ्या नदीवरील बांध फुटल्यामुळे ६०० च्या जवळपास लोक मारल्या गेले होते.
- १९३६: ला चीन चे नेता च्यांग काई शेक यांनी जपान विरुद्ध युद्धाची घोषणा केली होती.
- १९५८: ला जिनिया हा देश संयुक्त राष्ट्र संघाचा सदस्य बनला.
- १९६३: ला केनियाला स्वातंत्र्य मिळाले.
- १९७१: संस्थानिकांचे तनखे व विशेषाधिकार रद्द करण्यात आले.
- १९९०: ला टी. एन. शेषन हे भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त बनले.
- १९९६: ला भारत आणि बांग्लादेश यांच्या मध्ये ३० वर्षापर्यंत गंगेचे पाणी वाटण्याच्या करारा वर सह्या झाल्या होत्या.
- २००१: पृथ्वी या क्षेपणास्त्राची चाचणी करण्यात आली.
- २००१: आशा भोसले यांना दादासाहेब फाळके पुरस्कार
- २००१: ला भारताने नेपाळ ला दोन चीता हेलिकॉप्टर आणि काही अवजारे दिली होती.
- २००८: ला कर्नाटक चे माजी मुख्यमंत्री एम वीरप्पा मोइली यांनी सरकारी कर्मचारी यांच्या सेवा मंडळांमध्ये बदलाव करण्यासाठी शिफारस केली.
- २०१६: प्रियांका चोप्रा यांना युनिसेफ (UNICEF) सदिच्छा दूत म्हणून नेमण्यात आले.
- 2021: हरनाज कौर संधूने मिस युनिव्हर्स 2021 जिंकली
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
- १८८१: वॉर्नर ब्रदर्स चे सहसंस्थापक हॅरी वॉर्नर यांचा जन्म. (मृत्यू: २५ जुलै १९५८)
- १८७२: डॉ. बाळकृष्ण शिवराम मुंजे – राजकीय नेते, हिन्दू महासभेचे संस्थापक, अध्यक्ष आणि सरचिटणीस, लष्करीकरणाचे प्रवर्तक आणि नाशिक येथील ’भोंसला मिलिटरी स्कूल’चे संस्थापक (मृत्यू: ३ मार्च १९४८)
- १८९२: गौरीशंकर गोवर्धनराम जोशी तथा ’धूमकेतू’ – गुजराथी कथाकार व कादंबरीकार. त्यांच्या ७ उत्कृष्ट कथांचा संग्रह ’सप्तपर्ण’ या नावाने प्रकाशित झाला आहे. (मृत्यू: ११ मार्च १९६५)
- १९०५: डॉ. मुल्कराज आनंद – लेखक (मृत्यू: २८ सप्टेंबर २००४)
- १९०७: खेमचंद प्रकाश – संगीतकार (मृत्यू: १० ऑगस्ट १९५०)
- १९१५: फ्रँक सिनात्रा – हॉलिवूड मधील अभिनेते व गायक (मृत्यू: १४ मे १९९८)
- १९१९: ला भारतीय क्रिकेटर भाऊसाहेब निंबाळकर यांचा जन्म.
- १९२७: इंटेल कॉर्पोरेशनचे सहसंस्थापक रॉबर्ट नोयस यांचा जन्म. (मृत्यू: ३ जून १९९०)
- १९४०: शरद पवार – केंद्रीय कृषी मंत्री, संरक्षण मंत्री आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री
- १९४५: ला संसद आणि लोकसभेचे सदस्य माजीद मेमन यांचा जन्म.
- १९४९: ला महाराष्ट्राचे लोकनेते गोपीनाथ पांडुरंग मुंडे यांचा जन्म.
- १९४९: ला तमिळ तसेच हिंदी चित्रपटांचे अभिनेते रजनीकांत यांचा जन्म.
- १९५०: रजनीकांत – प्रसिद्ध तामिळ अभिनेते
- १९५२: भारतीय कॅनेडियन व्यापारी आणि राजकारणी हरब धालीवाल यांचा जन्म.
- १९५४: ला मुंबई येथे २६/११ च्या झालेल्या दहशदवादी हल्यात शहीद झालेले हेमंत करकरे यांचा जन्म.
- १९७३: ला मराठी चित्रपट सृष्टीचे प्रसिद्ध सुपर स्टार भरत जाधव यांचा जन्म.
- १९७८: ला मराठी चित्रपट सृष्टीचे कलाकार उमेश कामत यांचा जन्म.
- १९८१: युवराजसिंग – भारतीय क्रिकेटपटू
- १९८४: ला मराठी चित्रपट सृष्टीचे कलाकार संतोष जुवेकर यांचा जन्म.
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
- १९३०: परदेशी मालाविरुद्ध निदर्शने करताना हुतात्मा बाबू गेनू याचा मोटारीखाली चिरडून मृत्यू (जन्म: ? ? १९०८)
- १९६४: मैथिलिशरण गुप्त – हिन्दी कवी. त्यांचे सुमारे ४० स्वतंत्र ग्रंथ आणि ६ अनुवादित ग्रंथ प्रसिद्ध झाले. त्यांच्या ’भारतभारती’ या काव्यग्रंथामुळे त्यांना राष्ट्रकवी म्हणून मान्यता मिळाली. (जन्म: ३ ऑगस्ट १८८६)
- १९९१: दत्तात्रय गणेश तथा अप्पासाहेब शेंबेकर – शेतीतज्ञ व बागाईतदार, महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागाईतदार संघाचे संस्थापक अध्यक्ष (१९६३ – १९६६) (जन्म: ? ? ????)
- १९९२: पं. महादेवशास्त्री जोशी – साहित्यिक, भारतीय संस्कृतीकोषाचे व्यासंगी संपादक (जन्म: १२ जानेवारी १९०६ – आंबेडे, सातेरी, गोवा)
- २०००: जयदेवप्पा हलप्पा तथा जे. एच. पटेल – कर्नाटकचे १५ वे मुख्यमंत्री (३१ मे १९९६ – ७ आक्टोबर १९९९) (जन्म: १ आक्टोबर १९३०)
- २००५: रामानंद सागर – हिन्दी चित्रपट निर्माते (जन्म: २९ डिसेंबर १९१७)
- २००६: सीगेट टेक्नोलॉजी चे सहसंस्थापक अॅलन शुगर्ट यांचे निधन. (जन्म: २७ सप्टेंबर १९३०)
- २०१२: पण्डित रवी शंकर – सतार वादक, ’भारतरत्न’ (जन्म: ७ एप्रिल १९२०)
- २०१२: उत्तराखंडचे पहिले मुख्यमंत्री नित्यानंद स्वामी यांचे निधन. (जन्म: २८ डिसेंबर १९२७)
- २०१५: भारतीय शेतकरी आणि राजकारणी शरद अनंतराव जोशी यांचे निधन. (जन्म: ३ सप्टेंबर १९३५)
दररोजच्या अपडेट्स साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.
Facebook Comments Box
Vision Abroad