१९ डिसेंबर पंचांग आणि दिनविशेष

आजचे पंचांग

  • तिथि- चतुर्थी – 10:05:36 पर्यंत
  • नक्षत्र- आश्लेषा – 26:00:34 पर्यंत
  • करण- बालव – 10:05:36 पर्यंत, कौलव – 22:22:33 पर्यंत
  • पक्ष- कृष्ण
  • योग- वैधृति – 18:33:19 पर्यंत
  • वार- गुरूवार
  • सूर्योदय- 07:08
  • सूर्यास्त- 18:04
  • चन्द्र राशि- कर्क – 26:00:34 पर्यंत
  • चंद्रोदय- 22:02:00
  • चंद्रास्त- 10:31:00
  • ऋतु- हेमंत
जागतिक दिवस:
गोवा मुक्ती दिवस.
महत्त्वाच्या घटना:
१९१९: अमेरिकेमध्ये हवामान संस्थेची स्थापना करण्यात आली.
१९२४: जर्मनी चा सिरीयल किलर फ्रिट्ज हार्मेन याला मृत्युदंडाची शिक्षा सुनावली गेली.
१९२७: राम प्रसाद बिस्मिल, रोशन सिंग आणि अश्फाकुल्लाह खान या क्रांतिकारकांना ब्रिटिश सरकारने फाशी दिले.
१९४१: दुसरे महायुद्ध – अ‍ॅडॉल्फ हिटलर हा जर्मन सैन्याचा सरसेनापती बनला.
११५४: दुसरा राजा हेन्री यांचे इंग्लंड चे राजे म्हणून राज्याभिषेक झाला.
१९६१: भारतीय सैन्याने ऑपरेशन विजय च्या माध्यमाने गोव्याच्या बोर्डर मध्ये प्रवेश केला होता.
१९६१: पोर्तुगिजांच्या ताब्यात असलेले दमण व दीव हे प्रांत भारतात समाविष्ट करण्यात आले.
१९६३: झांजिबारला (युनायटेड किंगडमकडून) स्वातंत्र्य मिळाले आणि तेथे सुलतान जमशिद बिन अब्दूल्लाह यांची राजसत्ता अस्तित्त्वात आली.
१९८३: ब्राझिलमधील रिओ डी जानिरो येथुन ’फिफा वर्ल्ड कप’ चोरीस गेला.
१९९८: अमेरिकेच्या डेनवर मध्ये विश्व विकलांग स्कीइंग मध्ये शील कुमार यांना सर्वोत्तम खेळाडू म्हणून पुरस्कार वितरीत.
२००२: व्ही. एन. खरे यांनी भारताचे ३३ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.
२००६: शैलजा आचार्य ह्या भारतासाठी नेपाळ च्या पहिल्या राजदूत बनल्या होत्या.
२००७: ब्लादीमर पुतीन यांना टाईम्स मग्झीन ने पर्सन ऑफ़ द ईयर ने पुरस्कृत केले.
२०१२: ज्यून-हाय पार्क ह्या दक्षिण कोरिया च्या पहिल्या महिला राष्ट्रपती बनल्या.
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
१८५२: अल्बर्ट मायकेलसन – वर्णपटाद्वारे प्रकाशाच्या मापनासंबंधीच्या शोधासाठी नोबेल पारितोषिक (१९०७) मिळवणारे जर्मन-अमेरिकन पदार्थवैज्ञानिक (मृत्यू: ९ मे १९३१)
१८९४: कस्तुरभाई लालभाई – दानशूर व राष्ट्रवादी विचारसरणीचे उद्योगपती, पद्मभूषण (१९६९), रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे संचालक (१९३७ – १९४९). अरविंद मिल्स, अशोक मिल्स, अतुल असे अनेक गिरण्या व कारखाने त्यांनी चालू केले. आपल्या गिरण्य़ांत त्यांनी कामगार कल्याणासाठी सहकार संस्था काढल्या. (मृत्यू: २० जानेवारी १९८०)
१८९७: अमेरिकेचे मुख्य धर्मोपदेशक मार्टिन लूथर किंग सीनियर यांचा जन्म.
१८९९: मार्टिन ल्यूथर किंग – मानवाधिकारांसाठी आजीवन संघर्ष करणारे नेते (मृत्यू: ११ नोव्हेंबर १९८४)
१९०६: लिओनिद ब्रेझनेव्ह – रशियातील कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस (मृत्यू: १० नोव्हेंबर १९८२)
१९१९: ओमप्रकाश बक्षी ऊर्फ ’ओमप्रकाश’ – चरित्र अभिनेते (मृत्यू: २१ फेब्रुवारी १९१९)
१९३४: प्रतिभा पाटील – भारताच्या १२ व्या आणि पहिल्या महिला राष्ट्रपती
१९६६: भारतीय क्रिकेटपटू राजेश चौहान यांचा जन्म.
१९६९: भारतीय क्रिकेटपटू नयन मोंगिया यांचा जन्म.
१९७४: रिकी पॉन्टिंग –ऑस्ट्रेलियन क्रिकेट कर्णधार व फलंदाज
१९८४: भारतीय चित्रपट अभिनेत्री अंकिता लोखंडे यांचा जन्म.
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
१८४८: एमिली ब्राँट – इंग्लिश लेखिका (जन्म: ३० जुलै १८१८)
१८६०: लॉर्ड जेम्स अ‍ॅन्ड्र्यू ब्राउन रॅमसे – डलहौसी – भारताचा गव्हर्नर जनरल (१८४८-१८५६), त्यांनी सार्वजनिक बांधकाम खाते स्थापन करुन सुमारे ३,४०० किमी लांबीचे रस्ते केले. टपाल व तार यांची सेवा सुरू केली. मुंबई ते ठाणे हा लोहमार्ग त्यांच्याच कारकीर्दीत सुरू झाला. (जन्म: २२ एप्रिल १८१२)
१९१५: अलॉइस अल्झायमर – जर्मन मेंदुविकारतज्ञ (जन्म: १४ जून १८६४)
१९२७: राम प्रसाद बिस्मिल – क्रांतिकारक (जन्म: ११ जून १८९७)
१९२७: क्रांतिकारक अश्फाक़ुला खान यांचे निधन. (जन्म: २२ ऑक्टोबर १९००)
१९८८: ज्ञानपीठ पुरस्कार पुरस्कार विजेते गुजराती साहित्यकार उमाशंकर जोशी यांचे निधन.
१९९७: सोनीचे सहसंस्थापक मासारू इबकू यांचे निधन. (जन्म: ११ एप्रिल १९०८)
१९९७: डॉ. सुरेन्द्र बारलिंगे – स्वातंत्र्यसैनिक, तत्त्वज्ञानाचे अभ्यासक, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे अध्यक्ष (जन्म: २० जुलै १९१९)
१९९८: जनार्दन विठ्ठल तथा जे. एल. रानडे – भावगीतगायक (जन्म: ? ? ????)
१९९९: हेमचंद्र तुकाराम तथा बाळ दाणी – रणजी व कसोटी क्रिकेटपटू, कुशल क्रीडा संघटक (जन्म: २४ मे १९३३)
२०१४: भारतीय पत्रकार आणि दिग्दर्शक एस. बालसुब्रमण्यम यांचे निधन. (जन्म: २८ डिसेंबर १९३५)

दररोजच्या अपडेट्स साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.

Loading

Facebook Comments Box






मराठी तरुण-तरुणींना परदेशांत शिक्षण आणि नोकरीसाठी सर्वतोपरी मदत करणारी मराठी माणसांनी चालवलेली संस्था.
अधिक माहितीसाठी खालील लिंक वर क्लिक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search