२० डिसेंबर पंचांग आणि दिनविशेष

आजचे पंचांग

  • तिथि-पंचमी – 10:51:43 पर्यंत
  • नक्षत्र-माघ – 27:48:00 पर्यंत
  • करण-तैतुल – 10:51:43 पर्यंत, गर – 23:32:33 पर्यंत
  • पक्ष- कृष्ण
  • योग-विश्कुम्भ – 18:10:46 पर्यंत
  • वार- शुक्रवार
  • सूर्योदय- 07:09
  • सूर्यास्त- 18:04
  • चन्द्र-राशि-सिंह
  • चंद्रोदय- 22:53:59
  • चंद्रास्त- 11:09:00
  • ऋतु- हेमंत
जागतिक दिवस:
  • मानवी ऐक्यभाव दिन.
महत्त्वाच्या घटना:
  • १८७६: ला राष्ट्रीय गीत वंदे मातरम चे लिखाण बकिमचंद्र चटर्जी यांनी पूर्ण केले.
  • १९२४: हिटलरची लँड्सबर्ग तुरुंगातून सुटका.
  • १९४२: दुसरे महायुद्ध – जपानी फौजांनी कलकत्ता शहरावर बॉम्बवर्षाव केला.
  • १९४५: मुंबई – बंगलोर प्रवासी विमानसेवा सुरू
  • १९४६: ला महात्मा गांधी एक महिन्यासाठी श्रीरामपूर येथे थांबले होते.
  • १९५५: ला भारतीय गोल्फ संघटनेचे गठन करण्यात आले.
  • १९७१: झुल्फिकार अली भूट्टो हे पाकिस्तानचे चौथे राष्ट्राध्यक्ष बनले.
  • १९८५: ला तिरुपती बालाजी येथील भगवान वेंकटेश्वर च्या मूर्तीला २.५ करोड रुपयांचे मुकुट चढविल्या गेले.
  • १९८८: ला भारताच्या लोकसभेमध्ये मतदानाचे वयवर्ष २१ वरून १८ करण्यासाठी नवीन कायदा मंजूर झाला.
  • १९९१: ला पॉल कीटिंग हे ऑस्ट्रेलिया चे नवीन प्रधानमंत्री बनले.
  • १९९३: ला भारत आणि सोवियत संघामध्ये ब्रुसेल्स येथे सहकार करारावर स्वाक्षऱ्या झाल्या.
  • १९९४: राष्ट्रपती डॉ. शंकरदयाळ शर्मा यांच्या हस्ते मलेशियाचे पंतप्रधान डॉ. महाथीर मोहम्मद यांना आंतरराष्ट्रीय सामंजस्यासाठीचा ’जवाहरलाल नेहरू पुरस्कार’ प्रदान
  • १९९९: पोर्तुगालने ’मकाऊ’ हे बेट चीनला परत दिले.
  • २०१०: भाषेबाबत मूलगामी अभ्यास करून त्यावर विविधांगी लिखाणे करणारे ज्येष्ठ भाषावैज्ञानिक व समीक्षक अशोक केळकर यांना मानाचा ‘साहित्य अकादमी पुरस्कार’ जाहीर
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
  • १८६८: हार्वे फायरस्टोन – अमेरिकन उद्योजक (मृत्यू: ७ फेब्रुवारी १९३८)
  • १८९०: जेरोस्लॉव्ह हेरॉव्हस्की – नोबेल पारितोषिक (१९५९) विजेते झेक रसायनशास्त्रज्ञ, ’इलेक्ट्रो केमिकल अ‍ॅनॅलेसिस’मधे केलेल्या संशोधनाबद्दल त्यांना नोबेल पारितोषिक देण्यात आले. (मृत्यू: २७ मार्च १९६७)
  • १९०१: रॉबर्ट व्हॅन डी ग्राफ – अमेरिकन पदार्थवैज्ञानिक (मृत्यू: १६ जानेवारी १९६७)
  • १९०९: भारतीय पत्रकार आणि राजकारणी वक्कम मजीद यांचा जन्म. (मृत्यू: १० जुलै २०००)
  • १९१७: नाट्यगृहांमधील प्रसिद्ध दिग्दर्शक शांता गांधी यांचा जन्म.
  • १९२७: मध्य प्रदेश चे माजी मुख्यमंत्री मोतीलाल वोरा यांचा जन्म
  • १९३६: प्रसिद्ध साहित्यकार रॉबिन शॉ यांचा जन्म.
  • १९४०: यामिनी कृष्णमूर्ती – भरतनाट्यम व कथ्थक नर्तिका, पद्मश्री (१९६७)
  • १९४२: राणा भगवानदास – पाकिस्तानातील पहिले ’हिन्दू’ मुख्य न्यायाधीश (Chief Justice)
  • १९४५: भारतीय वकील शिवकांत तिवारी यांचा जन्म. (मृत्यू: २६ जुलै २०१०)
  • १९६०: उत्तराखंड चे मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत यांचा जन्म.
  • १९७०: हिंदी चित्रपट अभिनेता सोहेल खान यांचा जन्म.
  • १९७१: द वॉल्ट डिस्ने कंपनीचे सहसंस्थापक रॉय ओ. डिस्ने यांचे निधन. (जन्म: २४ जून १८९३)
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
  • १७३१: छत्रसाल बुंदेला – बुंदेलखंडचा महाराजा (जन्म: ४ मे १६४९)
  • १९१५: भारतीय चित्रकार आणि संगीतकार उपेंद्रकिशोर रे यांचे निधन. (जन्म: १२ मे १८६३)
  • १९३३: विष्णू वामन बापट – संस्कृत विद्वान, भाषांतरकार व शास्त्रसुधारक, शंकराचार्यांच्या ग्रंथांचे व इतर संस्कृत ग्रंथांचे मराठीत अनुवाद केले. (जन्म: २२ मे १८७१)
  • १९५६: देबुजी झिंगराजी जानोरकर ऊर्फ ’संत गाडगे महाराज’ – कमालीचे अज्ञान, अनिष्ट चालीरीती व अंधश्रद्धा पाहून त्यांनी निरपेक्ष सेवेचे व्रत घेतले आणि त्यासाठी कीर्तनाचे माध्यम प्रभावीपणे वापरले. (जन्म: १३ फेब्रुवारी १८७६)
  • १९८१: भारतीय चित्रपट सृष्टीचे कलाकार कानू रॉय यांचे निधन.
  • १९९३: वामन नारायण तथा डब्ल्यू. एन. भट – आंतरराष्ट्रीय कीर्तीचे छायाचित्रकार (जन्म: ????)
  • १९९६: कार्ल सगन – अमेरिकन अंतराळतज्ञ, लेखक व विज्ञानप्रसारक. यांनी सुमारे ६०० हून अधिक शोध निबंध प्रकाशित केले. शुक्राच्या पृष्ठभागावरील उच्‍च तापानाचा शोध त्यांच्या प्रयत्‍नामुळे लागला. (जन्म: ९ नोव्हेंबर १९३४ – ब्रुकलिन, न्यूयॉर्क, यु. एस. ए.))
  • १९९६: दगडू मारुती तथा ’दया’ पवार – ’बलुतं’कार दलित लेखक (जन्म: १५ सप्टेंबर १९३५)
  • १९९८: बंगळुरू वेंकट तथा बी. व्ही. रमण – जागतिक कीर्तीचे फलज्योतिषी (जन्म: ८ ऑगस्ट १९१२)
  • २००१: सेनेगलचे पहिले राष्ट्रपती लेओपोल्ड सेडर सेन्घोर यांचे निधन. (जन्म: ९ ऑक्टोबर १९०६)
  • २००९: महाराष्ट्राचे प्रसिद्ध लेखक अरुण कांबळे यांचे निधन.
  • २०१०: नलिनी जयवंत – अभिनेत्री (जन्म: १८ फेब्रुवारी १९२६)
  • २०१०: सुभाष भेंडे – लेखक (जन्म: १४ आक्टोबर १९३६)
  • २०१०: भारतीय चित्रपट दिग्दर्शक बाबूभाई मिस्त्री यांचे निधन.

दररोजच्या अपडेट्स साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.

Loading

Facebook Comments Box






मराठी तरुण-तरुणींना परदेशांत शिक्षण आणि नोकरीसाठी सर्वतोपरी मदत करणारी मराठी माणसांनी चालवलेली संस्था.
अधिक माहितीसाठी खालील लिंक वर क्लिक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search