Konkan Railway:नाताळाच्या सुट्टीत गोवा आणि कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी एक खुशखबर आहे. प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी कोकण रेल्वे मार्गावर रेवा – मडगाव साप्ताहिक एक्सप्रेस विशेष गाडी चालविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या गाडीचा तपशील खालीलप्रमाणे
गाडी क्र. ०१७०३/०१७०४ रेवा – मडगाव जं. रेवा साप्ताहिक एक्सप्रेस विशेष:
गाडी क्र. ०१७०३ रेवा – मडगाव जं. साप्ताहिक एक्सप्रेस स्पेशल रविवार दिनांक २२/१२/२०२४ आणि २९/१२/२०२४ रोजी रेवा येथून १२:०० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी २१:२५ वाजता मडगावला पोहोचेल.
गाडी क्र. ०१७०४ मडगाव जं. – रेवा साप्ताहिक एक्सप्रेस विशेष गाडी सोमवार दिनांक २३/१२/२०२४ आणि ३० /१२/२०२४ रोजी २२.२५ वाजता मडगाव येथून निघेल आणि तिसऱ्या दिवशी 08:20 वाजता रेवाला पोहोचेल.
ही गाडी सतना, मैहर, कटनी, जबलपूर जंक्शन, नरसिंगपूर, पिपरिया, इटारसी जंक्शन, हरदा, खांडवा जंक्शन, भुसावळ, जळगाव, मनमाड जंक्शन, नाशिक रोड, कल्याण जंक्शन, पनवेल, रोहा, चिपळूण, रत्नागिरी,कणकवली, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिविम आणि करमाळी येथे थांबेल
डब्यांची रचना : एकूण २४ डबे = संमिश्र (प्रथम एसी + २ टायर एसी) – ०१ कोच, २ टायर एसी – ०१ कोच, ३ टायर एसी – ०५ कोच, स्लीपर – ११ डबे, सामान्य – ०४ कोच, एसएलआर – ०२.
गाडी क्र. ०१७०४ साठीचे बुकिंग २१/१२/२०२४ रोजी सर्व प्रवासी आरक्षण प्रणाली (PRS), इंटरनेट आणि IRCTC वेबसाइटवर उघडेल. प्रवाशांनी कृपया सेवेचा लाभ घ्यावा अशी विनंती रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आली आहे.
Facebook Comments Box
Vision Abroad