४ जानेवारी पंचांग आणि दिनविशेष

आजचे पंचांग

  • तिथि-पंचमी – 22:03:07 पर्यंत
  • नक्षत्र-शतभिष – 21:24:04 पर्यंत
  • करण-भाव – 10:53:25 पर्यंत, बालव – 22:03:07 पर्यंत
  • पक्ष- शुक्ल
  • योग-सिद्वि – 10:07:36 पर्यंत
  • वार- शनिवार
  • सूर्योदय- 07:16
  • सूर्यास्त- 18:13
  • चन्द्र-राशि-कुंभ
  • चंद्रोदय- 10:39:00
  • चंद्रास्त- 22:36:00
  • ऋतु- शिशिर

जागतिक दिवस:

  • ब्रम्हदेश (म्यानमार) चा मुक्तिदिन
महत्त्वाच्या घटना:
  • १४९३: क्रिस्तोफर कोलंबस त्यांच्या पहिल्या सफरीच्या शेवटी नव्या जगातून परत निघाले.
  • १६४१: कर भरायला नकार देणार्‍या लोकप्रतिनिधींना पकडण्यासाठी इंग्लंडचा राजा पहिला चार्ल्स हाऊस ऑफ कॉमन्समध्ये शिरला. या अभूतपूर्व घटनेची परिणती यादवी युद्धात झाली. त्यात चार्ल्सचा पराभव होऊन मग त्याचा शिरच्छेद करण्यात आला.
  • १८४७: सॅम्युअल कॉल्टने अमेरिकन सरकारला पहिले रिव्हॉल्व्हर पिस्तुल विकले.
  • १८८१: लोकमान्य टिळक यांनी पुणे येथे ’केसरी’ या वृत्तपत्राची सुरूवात केली.
  • १८८५: आंत्रपुच्छ (appendix) काढुन टाकण्याची पहिली यशस्वी शस्त्रक्रिया डॉ. विल्यम डब्ल्यू. ग्रांट यांनी मेरी गार्टसाईड या रुग्णावर केली.
  • १९२६: क्रांतिकारकांच्या गाजलेल्या काकोरी खटल्याच्या सुनावणीस लखनौ येथे सुरुवात झाली.
  • १९३२: सविनय कायदेभंगाच्या चळवळीत भाग घेतल्याबद्दल पंडित नेहरूंना दोन वर्षांची शिक्षा
  • १९३२: जवाहरलाल नेहरू आणि महात्मा गांधी यांना इस्ट इंडिया कंपनी चे तेव्हाचे व्हाईस रॉय विलिंगडन यांनी अटक केली.
  • १९४४: १० वर्षावरील सर्व मुलामुलींना राष्ट्राच्या युद्धसेवेत दाखल करुन घेण्याबद्दलचा हिटलरचा वटहुकूम जारी झाला.
  • १९४८: ब्रम्हदेश (म्यानमार) ला (इंग्लंडपासुन) स्वातंत्र्य मिळाले.
  • १९५२: ब्रिटिश सैन्याने सुएझ कालव्याची नाकेबंदी केली.
  • १९५४: मेहेरचंद महाजन यांनी भारताचे ३ रे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.
  • १९५८: १९५३ मध्ये माउंट एव्हरेस्टवर यशस्वी चढाई करणारे सर एडमंड हिलरी दक्षिण धॄवावर पोहोचले.
  • १९५८: स्पुटनिक-१ हा पहिला मानवनिर्मित उपग्रह पृथ्वीवर परत उतरला.
  • १९५९: लूना – १ हे अंतराळयान चंद्राच्या अगदी जवळ पोहोचले.
  • १९६२: न्यूयॉर्क अमेरिका येथे पहिली चालकरहित रेल्वे सुरु झाली.
  • १९७२: दिल्लीला क्रिमिनोलॉजी आणि फॉरेन्सिक विज्ञान संस्थेचे उद्घाटन.
  • १९९०: पाकिस्तान मध्ये दोन ट्रेन एकमेकांना धडकल्या मुळे ४०० लोक मारल्या गेले आणि ५०० पेक्षा अधिक लोक जखमी झाले.
  • १९९६: साहित्यिक चंद्रकांत खोत यांच्या ’बिंब प्रतिबिंब’ या कादंबरीला कोलकता येथील भारतीय भाषा परिषदेचा प्रतिष्ठेचा पुरस्कार मिळाला.
  • २००४: नासाची मानवरहित स्पिरीट ही गाडी मंगळ ग्रहावर उतरली.
  • २०१०: ’बुर्ज खलिफा’ या जगातील सर्वात उंच इमारतीचे उद्‍घाटन झाले.
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
  • १६४३: इंग्लिश शास्रज्ञ आणि तत्त्वज्ञानी सर आयझॅक न्यूटन यांचा जन्म.
  • १८०९: लुई ब्रेल – अंधांना उपयोगी पडणाऱ्या ब्रेल लिपीचे जनक व शिक्षक (मृत्यू: ६ जानेवारी १८५२)
  • १८१३: सर आयझॅक पिटमॅन – शॉर्टहँड या लघुलिपीचे जनक (मृत्यू: १२ जानेवारी १८९७)
  • १८८७: ला प्रसिद्ध लेखक लोचन प्रसाद पाण्डेय यांचा जन्म.
  • १८९२: ला भारतीय अर्थशास्त्रज्ञ जे.सी. कुमारप्पा यांचा जन्म.
  • १९००: अमेरिकन पक्षीय जेम्स बाँड यांचा जन्म.
  • १९०९: मराठी नवसाहित्यिकार प्रभाकर पाध्ये यांचा जन्म.
  • १९१४: इंदिरा संत – साहित्य अकादमी पुरस्कार विजेत्या कवयित्री व लेखिका (मृत्यू: १३ जुलै २०००)
  • १९२४: विद्याधर गोखले – नाटककार व संपादक (मृत्यू: २६ सप्टेंबर १९९६)
  • १९२५: प्रदीप कुमार – हिन्दी व बंगाली चित्रपटसृष्टीतील अभिनेता (मृत्यू: २७ आक्टोबर २००१)
  • १९३१: ला भारतीय चित्रपट अभिनेत्री निरुपा रॉय यांचा जन्म.
  • १९४०: मराठी कादंबरीकार श्रीकांत सिनकर यांचा जन्म.
  • १९४१: कल्पनाथ राय – केन्द्रीय मंत्री, राज्यसभा खासदार (३ वेळा), लोकसभा खासदार (४ वेळा), काँग्रेसचे नेते (मृत्यू: ६ ऑगस्ट १९९९ – नवी दिल्ली)
  • १९६५: भारतीय चित्रपट अभिनेते आदित्य पंचोली यांचा जन्म.
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
  • १७५२: गॅब्रिअल क्रॅमर – स्विस गणिती (जन्म: ३१ जुलै १७०४)
  • १८५१: दुसरे बाजीराव पेशवे यांचे निधन.
  • १९०७: गोवर्धनराम त्रिपाठी – गुजराथी लेखक, ’सरस्वतीचंद्र’ हा गाजलेला चित्रपट त्यांच्याच चार भागांतील कादंबरीवर आधारलेला आहे. (जन्म: २० आक्टोबर १८५५ – नडियाद, गुजराथ)
  • १९०८: राजारामशास्त्री भागवत – विद्वान व समाजसुधारक, ज्ञानाच्या क्षेत्रातील मोठे प्रज्ञावंत, शिक्षणविषयक स्वतंत्र ध्येये असल्यामुळे त्यांनी १८८४ मध्ये बॉम्बे हायस्कूल आणि पुढे मराठा हायस्कूल काढले. हिन्दूधर्म विवेचक पत्राचे ते काही वर्षे संपादक होते. (जन्म: ११ नोव्हेंबर १८५१ – कशेळी, राजापूर, रत्‍नागिरी)
  • १९३१: ला भारताचे प्रसिद्ध पत्रकार मुहम्मद अली यांचे निधन.
  • १९६१: आयर्विन श्रॉडिंगर – नोबेल पारितोषिक विजेता ऑस्ट्रियन भौतिकशास्त्रज्ञ (जन्म: १२ ऑगस्ट १८८७)
  • १९६५: टी. एस. इलियट – अमेरिकेत जन्मलेले ब्रिटिश कवी, नाटककार, टीकाकार आणि नोबेल पारितोषिक विजेते (जन्म: २६ सप्टेंबर १८८८)
  • १९९४: राहूलदेव बर्मन तथा ’पंचमदा’ – संगीतकार (जन्म: २७ जून १९३९)
  • २०१६: ला भारताचे ३८ वे न्यायाधीश एस. एच. कपाड़िया यांचे निधन.

दररोजच्या अपडेट्स साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.
Facebook Comments Box






मराठी तरुण-तरुणींना परदेशांत शिक्षण आणि नोकरीसाठी सर्वतोपरी मदत करणारी मराठी माणसांनी चालवलेली संस्था.
अधिक माहितीसाठी खालील लिंक वर क्लिक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search