Vande Bharat Sleeper: १८० किमी प्रतितास वेग, एकूण ३ श्रेणी आणि ८२३ प्रवासी क्षमता…लवकरच सुरु होणारी वंदे भारत स्लीपर ट्रेन नेमकी कशी असणार ?

   Follow us on        
Vande Bharat Sleeper: रेल्वेचा प्रवास हा इतर प्रवासापेक्षा उत्तम पर्याय मानला जातो. प्रवाशांच्या वाढत्या सोयीसाठी तसेच प्रवासाला अधिक आरामदायी बनवण्यासाठी भारतीय रेल्वेने वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या या ट्रेनची चाचणी सुरू असून लवकरच ती प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहे. त्यामुळे लांबच्या ठिकाणी प्रवास करण्यासाठी हा निर्णय महत्वाचा ठरणार आहे.
   Follow us on        
वंदे भारत स्लीपर ट्रेनची चाचणी सुरू आहे. ही चाचणी यशस्वी झाल्यानंतर रेल्वे सुरक्षा आयुक्तांकडून (CRS) हिरवा कंदील मिळताच ही ट्रेन प्रवाशांसाठी सुरू होईल. समोर आलेल्या माहितीनुसार ही ट्रेन 160 ते 180 किलोमीटर प्रतितास वेगाने धावणार आहे. तसेच एका रिपोर्ट्सनुसार, वंदे भारत स्लीपर ट्रेनची पहिली सेवा दिल्ली-मुंबई किंवा दिल्ली-कोलकाता मार्गावर सुरू होण्याची शक्यता आहे. जानेवारी 2025 अखेर ही ट्रेन प्रवाशांच्या सेवेत दाखल होईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
वंदे भारत स्लीपर ट्रेनमध्ये (Vande Bharat Sleeper Trains) एकूण 16 डबे असतील. यामध्ये 11 एसी 3-टायर कोच, 4 एसी 2-टायर कोच, आणि 1 फर्स्ट क्लास कोच समाविष्ट आहे. तसेच, ट्रेनमध्ये प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी आणि लवचिकतेसाठी 2 एसएलआर (स्लिपर) कोच असतील, जे लगेज आणि गार्डसाठी वापरले जातात. यामुळे प्रवाशांना आरामदायक आणि सुरक्षित प्रवासाची सुविधा पुरवली जाणार आहे , तसेच विविध विभागात प्रवास करण्याचा पर्याय उपलब्ध करतो. वंदे भारत स्लीपर ट्रेन ही अत्याधुनिक सुविधा आणि सोयींच्या दृष्टीने एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे.
ट्रेनमध्ये (Train) एकावेळी 823 प्रवासी प्रवास करू शकतील. यात 3 टायर एसी कोचमध्ये 611 बर्थ, 2 टायर एसी कोचमध्ये 188 बर्थ, आणि फर्स्ट क्लास एसी कोचमध्ये 24 बर्थ उपलब्ध असतील. यामुळे विविध प्रवाशांसाठी विविध प्रकारच्या सुविधांचा पुरवठा होईल. ट्रेनचे डिझाइन आणि सुरक्षिततेबाबत विशेष काळजी घेतली गेली आहे. ही ट्रेन ऑस्ट्रेनिटिक स्टेनलेस स्टीलपासून बनवली आहे, जे अधिक मजबूती पुरवते. तसेच, क्रॅश बफर आणि कप्लर्स यांसारख्या सुरक्षिततेसाठी आवश्यक बाबींवर लक्ष देऊन प्रवाशांच्या सुरक्षिततेची काळजी घेतली आहे. ही अत्याधुनिक स्लीपर ट्रेन इंटिग्रल कोच फॅक्टरी (ICF), चेन्नई येथे तयार करण्यात आली आहे. भारत अर्थमूव्हर्स लिमिटेड (BEML) नेही या प्रकल्पाला पाठिंबा दिला आहे.
Facebook Comments Box

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search