आजचे पंचांग
- तिथि-सप्तमी – 18:25:45 पर्यंत
- नक्षत्र-उत्तराभाद्रपद – 19:07:09 पर्यंत
- करण-गर – 07:22:14 पर्यंत, वणिज – 18:25:45 पर्यंत
- पक्ष- शुक्ल
- योग-परिघ – 26:04:51 पर्यंत
- वार- सोमवार
- सूर्योदय- 07:15
- सूर्यास्त- 18:14
- चन्द्र-राशि-मीन
- चंद्रोदय- 11:54:00
- चंद्रास्त- 24:30:00
- ऋतु- शिशिर
महत्त्वाच्या घटना:
- १६६५: शिवाजी महाराजांनी सूर्यग्रहणाच्या निमित्ताने राजमाता जिजाऊ व सोनोपंत विश्वनाथ डबीर यांची सुवर्णतुला केली. श्री क्षेत्र महाबळेश्वर येथील देवळासमोर ही सुवर्णतुला झाली.
- १६७३: कोंडाजी फर्जंद यांनी अवघ्या ६० मावळ्यांनिशी पन्हाळा जिंकुन महाराजांचे १३ वर्षे अपुर्ण असलेले स्वप्न पूर्ण केले.
- १८३२: पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांनी इंग्रजी व मराठीतील पहिले साप्ताहिक वृत्तपत्र ’दर्पण’ सुरू केले.
- १८३८: सॅम्युअल मॉर्स यांनी तारयंत्राचा शोध लावला.
- १९०७: मारिया माँटेसरी यांनी पहिली माँटेसरी शाळा सुरूकेली. त्यांच्या शाळांमुळे पूर्वप्राथमिक शिक्षणात आमूलाग्र बदल झाला.
- १९१२: न्यू मेक्सिको हे अमेरिकेचे ४७ वे राज्य बनले.
- १९२४: राजकारणात भाग न घेणे व रत्नागिरी जिल्ह्यातच राहणे या अटींवर स्वातंत्र्यवीर सावरकर यांची जन्मठेपेतुन सशर्त मुक्तता
- १९२९: गोरगरिब व रुग्णांची सेवा करण्यासाठी मदर तेरेसा यांचे कोलकाता येथे आगमन
- १९४४: दुसरे महायुद्ध – रशियन सैन्य पोलंडमध्ये शिरले.
- १९४६: आजच्या दिवशी विएतनाम येथे पहिल्या सार्वत्रिक निवडणूका घेण्यात आल्या.
- १९८९: केहर सिंह आणि सतवंत सिंह यांना इंदिरा गांधींच्या हत्या करण्याच्या गुन्हात फाशीची शिक्षा देण्यात आली.
- १९९४: सिडनी टेस्ट सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या टीम ने ऑस्ट्रेलिया च्या टीम ला ५ रन नी हरविले.
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
- १४१२: फ्रान्सला परकीय जोखडातून मुक्त करणार्या ’जोन ऑफ आर्क’चा जन्म. तिला चेटकीण ठरवून जाळण्यात आले. नंतर मात्र तिला संत ठरवले गेले. ती ’द मेड ऑफ ऑर्लिन्स’ या टोपणनावानेही ओळखली जाते. (मृत्यू: ३० मे १४३१)
- १७४५: बलूनच्यासहाय्याने आकाशात उडण्याचे प्रयोग करणाऱ्या जाक्कास एलियन माँटगोल्फिएर यांचा जन्म.
- १८१२: बाळशास्त्री जांभेकर – मराठी पत्रकारितेचे पितामह, १८३२ मधे ‘दर्पण’ हे वृत्तपत्र काढून त्यांनी वृत्तपत्र व्यवसायाचा पाया घातला. ’दिग्दर्शन’ हे मराठीतील पहिले मासिकही त्यांनीच १८४० मधे सुरू केले. (मृत्यू: १८ मे १८४६)
- १८२२: उत्खनन करून ट्रॉय आणि मायसेनी या नगरीचा शोध लावणाऱ्या हेन्रीचा श्लीमन यांचा जन्म.
- १८६८: गणेश दत्तात्रय सहस्रबुद्धे उर्फ ‘दासगणू महाराज’ – आधुनिक संतकवी, ’भक्तिरसामृत’, ’भक्तकथामृत’ आणि ’संतकथामृत’ हे त्यांचे संतचरित्रात्मक ग्रंथ आहेत. (मृत्यू: २५ नोव्हेंबर १९६२)
- १८८३: खलील जिब्रान – लेबनॉनमधे जन्मलेले अमेरिकन कवी, लेखक व कलाकार (मृत्यू: १० एप्रिल १९३१)
- १९१०: ला प्रसिद्ध भारतीय गायक जी. एन. बालासुब्रमनियम यांचा जन्म.
- १९१८: ला भारतीय प्रसिद्ध गायक भारत व्यास यांचा जन्म.
- १९२५: रमेश मंत्री – प्रवासवर्णनकार, कथाकार, विनोदी लेखक (मृत्यू: १९ जून १९९८)
- १९२८: नाटककार, चित्रपटकथालेखक, पत्रकार व साहित्यिक विजय तेंडुलकर यांचा जन्म. (मृत्यू: १९ मे २००८ – पुणे, महाराष्ट्र)
- १९३१: डॉ. आर. डी. देशपांडे – पर्यावरण क्षेत्रातील शा’स्त्रज्ञ, ’महाराष्ट्र असोसिएशन फॉर द कल्टिव्हेशन ऑफ सायन्स’चे (आघारकर रिसर्च इन्स्टिट्युट) अध्यक्ष
- १९४०: प्रसिद्ध भारतीय लेखक नरेंद्र कोहली यांचा जन्म.
- १९४९: परमवीर चक्राने सन्मानित सुभेदार बाना सिंग यांचा जन्म.
- १९५५: रोवान अॅटकिन्सन – विनोदी अभिनेते व पटकथालेखक
- १९५९: कपिल देव निखंज – भारतीय क्रिकेटकप्तान, समालोचक व प्रशिक्षक
- १९६५: हिमाचल प्रदेश चे १४ वे मुख्यमंत्री जय राम ठाकूर यांचा जन्म.
- १९६७: ऑस्कर पुरस्कार विजेते जगप्रसिद्ध गायक ए. आर. रेहमान यांचा जन्म.
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
- १७९६: जिवबा दादा बक्षी – महादजी शिंदे यांचे सेनापती, मुत्सद्दी (जन्म: ? ? ????)
- १८४७: त्यागराज – दाक्षिणात्य संगीतकार (जन्म: ४ मे १७६७)
- १८५२: लुई ब्रेल – अंधांना उपयोगी पडणाऱ्या ब्रेल लिपीचे जनक व शिक्षक (जन्म: ४ जानेवारी १८०९)
- १८८४: ग्रेगोर मेंडेल – जनुकांची (genes) संकल्पना मांडणारा जर्मन जीवशास्त्रज्ञ (जन्म: २० जुलै १८२२)
- १८८५: भारतेंदू हरिश्चंद्र – आधुनिक हिन्दी साहित्याचे जनक मानले जाणारे हिन्दी साहित्यिक, १८५० ते १९०० हा काळ हिन्दी साहित्यात ’भारतेंदू काळ’ म्हणून ओळखला जातो. (जन्म: ९ सप्टेंबर १८५०)
- १९१८: जी. कँटर – जर्मन गणितज्ञ (जन्म: ३ मार्च १८४५)
- १९१९: थिओडोर रुझव्हेल्ट – अमेरिकेचे २६ वे राष्ट्राध्यक्ष, नोबेल पारितोषिक विजेते (जन्म: २७ आक्टोबर १८५८)
- १९७१: प्रफुल्लचंद्र तथा पी. सी. सरकार – जादूगार (जन्म: २३ फेब्रुवारी १९१३)
- १९८१: ए. जे. क्रोनिन – स्कॉटिश लेखक (जन्म: १९ जुलै १८९६)
- १९८४: ’विद्यानिधी’ सिद्धेश्वरशास्त्री विष्णू चित्राव – महामहोपाध्याय, वैदिक साहित्याचे अभ्यासक व मराठी कोशकार (जन्म: १ फेब्रुवारी १८८४)
- २००८: भारतीय ऑर्थोपेडिक सर्जन प्रमोद करन सेठी यांचे निधन.
- २००९: जम्मू काश्मीर चे माजी मुख्यमंत्री गुलाम मोहम्मद शाह यांचे निधन.
- २०१०: प्रल्हाद ईरबाजी सोनकांबळे – लेखक व इंग्रजीचे प्राध्यापक (जन्म: १६ जुलै १९४३)
- २०१७: भारतीय अभिनेता ओम पुरी यांचे निधन.
दररोजच्या अपडेट्स साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.
Facebook Comments Box
Vision Abroad