नवी दिल्ली : मुंबई-गोवा महामार्गवरील परिस्थितीमुळे मला रोज प्रवाशांची नाराजी सहन करावी लागते. ही नाराजी वृत्तवाहिन्यांच्या माध्यमातून समजते. यामुळे पावसाळा सुरू होण्यापूर्वी या महामार्गचे काम पूर्ण करू, अशी ग्वाही केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मंगळवारी पत्रकारांशी बोलताना दिली.
याशिवाय दिल्ली- मुंबई या महत्त्वाकांक्षी महामार्गचे काम या वर्षात पूर्ण होईल, असेही गडकरी यांनी सांगितले.
केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशाच्या वाहतूक मंत्र्याची ४२ वी बैठक भारत मंडपम येथे पार पडली. यावेळी पत्रकारांशी बोलताना गडकरी यांनी अपघातांत मृत्युमुखी पडणाऱ्यांच्या वाढत्या संख्येवर खंत व्यक्त केली. सरकारने कॅशलेस उपचारांची व्यवस्था केली गेली आहे. अपघातात जखमी व्यक्तीचा ७ दिवस उपचार किंवा १.५ लाखांचा खर्च मंत्रालय करणार आहे, असे त्यांनी सांगितले.
Vision Abroad