आजचे पंचांग
- तिथि-एकादशी – 10:22:17 पर्यंत
- नक्षत्र-कृत्तिका – 13:46:36 पर्यंत
- करण-विष्टि – 10:22:17 पर्यंत, भाव – 21:22:19 पर्यंत
- पक्ष- शुक्ल
- योग-शुभ – 14:36:35 पर्यंत
- वार- शुक्रवार
- सूर्योदय- 07:16
- सूर्यास्त- 18:16
- चन्द्र-राशि-वृषभ
- चंद्रोदय- 14:48:00
- चंद्रास्त- 28:38:59
- ऋतु- शिशिर
जागतिक दिवस:
- जागतिक हिंदी दिवस.
महत्त्वाच्या घटना:
- १६६६: सुरत लुटून शिवाजीमहाराज राजगडाकडे निघाले.
- १७३०: पहिल्या बाजीरावाच्या कारकिर्दीत शनिवारवाड्याच्या बांधकामास सुरुवात झाली.
- १८०६: केपटाऊन येथे स्थायिक असलेले डच वसाहतवादी ब्रिटिशांना शरण गेले.
- १८१०: नेपोलियन बोनापार्टने जोसेफाइन या आपल्या पहिल्या पत्नीला घटस्फोट दिला.
- १८३९: पहिल्यांदा भारताचा चहा इंग्लंड ला पोहचला.
- १८६३: चार्ल्स पिअर्सन याच्या आराखड्यानुसार रचना केलेल्या ७ किमी लांबीच्या व सात स्थानके असलेल्या भुयारी रेल्वेची लंडनमध्ये सुरूवात झाली.
- १८७०: जॉन डी. रॉकफेलर याने ’स्टँडर्ड ऑईल’ कंपनीची स्थापना केली.
- १८७०: बॉम्बे, बडोदा अँड सेंट्रल इंडिया रेल्वे (B. B. C. I. Railway) या ब्रिटिशकालीन रेल्वे कंपनीच्या इतिहासाचे साक्षीदार असलेले चर्चगेट रेल्वे स्थानक सुरू झाले. या स्थानकावर फक्त एक फलाट होता.
- १८८४: ब्रिटन च्या रसायन शास्त्रज्ञ जोज़फ एस्पीडियन यांनी पहिल्यांदा सिमेंट बनविले.
- १९२०: पहिले महायुद्ध – व्हर्सायचा तह अस्तित्त्वात आल्याने पहिले महायुद्ध संपले.
- १९२६: स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी हुतात्मा स्वामी श्रद्धानंदांच्या स्मरणार्थ ‘श्रद्धानंद’ साप्ताहिक मुंबईत सुरू केले.
- १९२९: जगात अमाप लोकप्रियता मिळालेले ’द अॅडव्हेंचर्स ऑफ टिनटिन’ हे कॉमिक प्रथमच प्रसिद्ध झाले.
- १९६६: भारत व पाकिस्तान यांच्यात ताश्कंद करार झाला.
- १९७२: पाकिस्तानमधील तुरुंगात ९ महिने काढल्यानंतर शेख मुजीबूर रहमान हे राष्ट्राध्यक्ष म्हणून नुकतेच स्वातंत्र्य मिळालेल्या बांगला देश मधे परतले.
- २००६: माजी प्रधान मंत्री मनमोहन सिंग यांनी १० जानेवारी ला जागतिक हिंदी दिवस म्हणनू साजरे करण्याची घोषणा केली.
- २००८: टाटा कंपनी ने जगातील सर्वात स्वस्त कार नॅनो कार ला बाजारात आणण्यासाठी सुरुवात केली.
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
- १७७५: बाजीराव पेशवे (दुसरे) (मृत्यू: २८ जानेवारी १८५१ – ब्रम्हावर्त)
- १८९६: नरहर विष्णू तथा ’काकासाहेब’ गाडगीळ – स्वातंत्र्यसैनिक, लेखक, वक्ते, राजकीय नेते, केंद्रीय मंत्री आणि पंजाबचे राज्यपाल (मृत्यू: १२ जानेवारी १९६६)
- १९००: मारोतराव सांबशिव कन्नमवार – महाराष्ट्राचे दुसरे मुख्यमंत्री (२० नोव्हेंबर १९६२ ते २४ नोव्हेंबर १९६३) (मृत्यू: २४ नोव्हेंबर १९६३)
- १९०१: इतिहास संशोधक डॉ. गणेश हरी खरे यांचा पनवेल येथे जन्म (मृत्यू: ? ? ????)
- १९१९: संस्कुत अभ्यासक आणि रामायणातील शाप आणि वर, महाभारतातील कुमारसंभव या ग्रंथांचे लेखक श्री. र. भिडे यांचा जन्म.
- १९२७: तमिळ अभिनेते शिवाजी गणेशन यांचा जन्म.
- १९३७: भातीय राजनीती तज्ञ मुरली देवड़ा यांचा जन्म.
- १९४०: के. जे. येसूदास – पार्श्वगायक व संगीतकार
- १९४९: प्रसिद्ध दक्षिणात्य चित्रपट निर्माते अल्लू अरविंद यांचा जन्म.
- १९५०: आदिवासींसाठी आयुष्य वेचणारया नाजुबाई गावित यांचा जन्म.
- १९७१: प्रसिद्ध बासरी वादक राकेश चौरसिया यांचा जन्म.
- १९७४: हृतिक रोशन – सिनेकलाकार
- १९८४: भारतीय अभिनेत्री कल्कि कोचेलिन यांचा जन्म.
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
- १६९३: कोलकत्याचे निर्माते म्हणून ओळखले जाणारे जाब चारनाक यांचे निधन.
- १७६०: दत्ताजी शिंदे – पानिपतच्या पहिल्या संग्रामातील रणवीर (जन्म: ? ? १७२३)
- १७७८: कार्ल लिनिअस – स्वीडीश वनस्पतीतज्ञ, वनस्पतींच्या दुहेरी नामकरणाची आंतरराष्ट्रीय पद्धत त्याने विकसित केली. ही पद्धत त्याला इतकी आवडली की त्याने स्वत:चेही नाव बदलून कॅरोलस लिनिअस असे केले. (जन्म: २३ मे १७०७)
- १९६९: उत्तर प्रदेश चे माजी मुख्यमंत्री संपूर्णानंद यांचे निधन.
- १९९४: ला प्रसिद्ध लेखक गिरिजाकुमार माथुर यांचे निधन.
- १९९९: आचार्य श्रीपाद कृष्ण केळकर – स्वातंत्र्य सैनिक व समाजवादी विचारवंत (जन्म: ? ? ????)
- २००२: पं. चिंतामणी रघुनाथ तथा सी. आर. व्यास – ख्यालगायक, गुरु व बंदिशकार (जन्म: ९ नोव्हेंबर १९२४)
दररोजच्या अपडेट्स साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.
Facebook Comments Box
Vision Abroad