१४ जानेवारी पंचांग आणि दिनविशेष

आजचे पंचांग

  • तिथि-प्रथम – 27:24:14 पर्यंत
  • नक्षत्र-पुनर्वसु – 10:18:07 पर्यंत
  • करण-बालव – 15:37:27 पर्यंत, कौलव – 27:24:14 पर्यंत
  • पक्ष- कृष्ण
  • योग-विश्कुम्भ – 26:58:11 पर्यंत
  • वार- मंगळवार
  • सूर्योदय- 07:17
  • सूर्यास्त- 18:19
  • चन्द्र-राशि-कर्क
  • चंद्रोदय- 18:48:59
  • चंद्रास्त- 07:35:59
  • ऋतु- शिशिर
जागतिक दिवस:
  • मकर संक्रमण
\
महत्त्वाच्या घटना:
  • १७६१: मराठे आणि अफगाणी यांमध्ये पानिपतची तिसरी लढाई झाली. दुसर्‍याच दिवशी संपलेल्या या युद्धात अफगाण्यांचा विजय झाल्यामुळे भारतीय इतिहासाचा चेहरामोहराच बदलुन गेला.
  • १९२३: विदर्भ साहित्य संघाची स्थापना झाली.
  • १९४८: ’लोकसत्ता’ हे मराठी वृत्तपत्र सुरू झाले.
  • १९९४: मराठवाडा विद्यापीठाचा ’डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ’ असा नामविस्तार करण्यात आला.
  • १९९८: दाक्षिणात्य गायिका एम.एस. सुब्बलक्ष्मी यांना ‘भारतरत्‍न’ हा सर्वोच्‍च सन्मान जाहीर.
  • २०००: ज्येष्ठ समाजसेवक व गांधीवादी विचारवंत मुरलीधर देविदास ऊर्फ ’बाबा’ आमटे यांना १९९९ चा गांधी शांतता पुरस्कार राष्ट्रपतींच्या हस्ते प्रदान.
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
  • १५५१: अकबराच्या नऊ रत्नांपैकी एक अबुल फ़ज़ल यांचा जन्म.
  • १८८२: रघुनाथ धोंडो तथा र. धों. कर्वे – समाजस्वास्थ्यासाठी संततिनियमन आणि लैंगिक शिक्षण यांसाठी बुद्धिवादी विचारप्रवर्तन व प्रत्यक्ष कार्य करणारे विचारवंत, महर्षी धोंडो केशव कर्वे यांचे ज्येष्ठ पुत्र (मृत्यू: १४ आक्टोबर १९५३)
  • १८८३: निना रिकी – जन्माने इटालियन असलेल्या फ्रेंच फॅशन डिझायनर (मृत्यू: ३० नोव्हेंबर १९७०)
  • १८९२: शतायुषी क्रिकेटमहर्षी प्रा. दिनकर बळवंत तथा दि. ब. देवधर – प्रथमश्रेणीचे ६२ सामने, १०० डाव, ११ वेळा नाबाद, ९ शतके, ३९५१ एकूण धावा, ४४.३९ सरासरी. भारत सरकारतर्फे त्यांना पद्मश्री (१९६५) व पद्मविभूषण (१९९१) या पुरस्कारांनी गौरविण्यात आले होते. (मृत्यू: २४ ऑगस्ट १९९३)
  • १८९६: ’रिझर्व बँक ऑफ ईंडिया’ चे पहिले गव्हर्नर सर चिंतामणराव द्वारकानाथ देशमुख उर्फ सी. डी. देशमुख (मृत्यू: २ आक्टोबर १९८२)
  • १९०५: दुर्गा खोटे – हिन्दी व मराठी चित्रपटातील अभिनेत्री. सुमारे ५० वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी ३०० हून अधिक चित्रपटांत भूमिका केला. १९८२ मध्ये ’मी दुर्गा खोटे’ हे त्यांचे आत्मचरित्र प्रसिद्ध झाले. (मृत्यू: २२ सप्टेंबर १९९१)
  • १९०८: ज्येष्ठ पत्रकार आणि रॉयवादी विचारवंत द्वा. भ. कर्णिक यांचा जन्म.
  • १९१८: भारतीय महिला स्वातंत्र्य सैनिक सुधाताई जोशी याचा जन्म.
  • १९१९: सय्यद अख्तर हुसेन रिझवी ऊर्फ ’कैफी आझमी’ – गीतकार (मृत्यू: १० मे २००२)
  • १९२३: चित्तरंजन कोल्हटकर – अभिनेते (मृत्यू: २५ आक्टोबर २००९)
  • १९२६: महाश्वेता देवी – बंगाली लेखिका
  • १९३१: सईद अहमद शाह ऊर्फ ’अहमद फराज’ – ऊर्दू शायर (मृत्यू: २५ ऑगस्ट २००८)
  • १९७७: नारायण कार्तिकेयन – भारतीय फॉर्म्यूला कार रेसिंग ड्रायव्हर
  • १९८२: माजी प्रधान मंत्री इंदिरा गांधींनी २ सूत्री कार्यक्रमाची घोषणा.
  • १९९२: माजी भारतीय क्रिकेटर दिनकर बळवंत देवधर यांचा जन्म.
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
  • १७४२: एडमंड हॅले – हॅलेच्या धूमकेतूचा शोध लावणारे ब्रिटिश खगोलशास्त्रज्ञ, भूवैज्ञानिक, गणितज्ञ, हवामानशास्त्रज्ञ आणि भौतिकशास्त्रज्ञ (जन्म: ८ नोव्हेंबर १६५६)
  • १७६१: सदाशिवराव भाऊ – पानिपतच्या तिसर्‍या युद्धातील सरसेनापती (जन्म: ४ ऑगस्ट १७३०)
  • १७६१: विश्वासराव – पानिपतच्या ३ र्‍या युद्धात मारले गेलेले नानासाहेब पेशव्यांचे ज्येष्ठ चिरंजीव (जन्म: २ मार्च १७४२)
  • १८९८: इंग्लिश लेखक आणि गणितज्ञ लुईस कॅरोल यांचे निधन.
  • १९२०: डॉज ऑटोमोबाईल कंपनीचे सहसंस्थापक जॉन फ्रान्सिस लबाडी यांचे निधन. (जन्म: २५ ऑक्टोबर १८६४)
  • १९९१: चित्रगुप्त श्रीवास्तव ऊर्फ ’चित्रगुप्त’ – संगीतकार (जन्म: १६ नोव्हेंबर १९१७)
  • २००१: फली बिलिमोरिया – माहितीपट निर्माते (जन्म: ? ? ????)

दररोजच्या अपडेट्स साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.
Facebook Comments Box






मराठी तरुण-तरुणींना परदेशांत शिक्षण आणि नोकरीसाठी सर्वतोपरी मदत करणारी मराठी माणसांनी चालवलेली संस्था.
अधिक माहितीसाठी खालील लिंक वर क्लिक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search