आजचे पंचांग
- तिथि-द्वितीया – 27:26:20 पर्यंत
- नक्षत्र-पुष्य – 10:29:17 पर्यंत
- करण-तैतुल – 15:20:20 पर्यंत, गर – 27:26:20 पर्यंत
- पक्ष- कृष्ण
- योग-प्रीति – 25:46:18 पर्यंत
- वार- बुधवार
- सूर्योदय- 07:17:46
- सूर्यास्त- 18:20:01
- चन्द्र-राशि-कर्क
- चंद्रोदय- 19:48:00
- चंद्रास्त- 08:22:59
- ऋतु- शिशिर
जागतिक दिवस:
- राष्ट्रीय सैन्य दिवस.
महत्त्वाच्या घटना:
- १५५९: राणी एलिझाबेथ (पहिली) हिचा इंग्लंडची राणी म्हणून वेस्टमिन्स्टर अॅबे येथे राज्याभिषेक झाला.
- १७६१: पानिपतचे तिसरे युद्ध संपले.
- १८६१: एलिशा जी. ओटिस या संशोधकाला सुरक्षित उद्वाहकाचे (Lift) जगातील पहिले पेटंट मिळाले.
- १८८९: द पेंबरटन मेडिसिन कंपनी या कंपनीची अटलांटा, जॉर्जिया, यू. एस. ए. येथे स्थापना झाली. ही कंपनी सध्या द कोका कोला कंपनी म्हणून प्रसिद्ध आहे.
- १९४९: जनरल करिअप्पा यांनी ब्रिटिशांकडुन भारतीय सेनेची सूत्रे हाती घेतली.
- १९७०: मुअम्मर गडाफी लीबीयाचे सर्वेसर्वा झाले.
- १९७३: जनरल गोपाळ गुरुनाथ बेवूर यांनी भारताचे ९ वे लष्करप्रमुख म्हणून सूत्रे हाती घेतली. हे लष्करप्रमुख होणारे पहिले महाराष्ट्रीयन आहेत.
- १९९६: भारतातील रेल्वेयुगाच्या प्रारंभापासून ब्रिटिश परंपरा व संस्कृतीचा डौल मिरवणाऱ्या बोरीबंदर (व्हिक्टोरिया टर्मिनस) या स्थानकाचे नाव बदलुन ते छत्रपती शिवाजी टर्मिनस (CST) असे करण्यात आले.
- १९९९: गायिका ज्योत्स्ना भोळे यांना राज्य सरकारच्या वतीने गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान करण्यात आला.
- २००१: सर्वांना मोफत असलेला ज्ञानकोश ’विकीपिडिया’ हा इंटरनेटवर प्रथमच उपलब्ध झाला.
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
- १७७९: रॉबर्ट ग्रँट – मुंबई इलाख्याचे राज्यपाल, मुंबईतील ग्रँट मेडिकल कॉलेजचे एक संस्थापक, मुंबईतील ग्रँट रोड हा त्यांच्याच नावाने ओळखला जातो. (मृत्यू: ? ? १८३८)
- १८५६: भारताचे प्रसिध्द राजनीती मर्मज्ञ, सामाजिक कार्यकर्ते अश्विनी कुमार दत्त यांचा जन्म.
- १९१८: भारताचे प्रसिद्ध स्वातंत्र्य सैनिक यशवंत अग्रवाडेकर यांचा जन्म.
- १९२०: डॉ. आर. सी. हिरेमठ – कन्नड साहित्यिक, कर्नाटक विद्यापीठाचे कुलगुरू (मृत्यू: ३ नोव्हेंबर १९९८)
- १९२१: बाबासाहेब भोसले – महाराष्ट्राचे ९ वे मुख्यमंत्री [कार्यकाल: २१ जानेवारी १९८२ ते १ फेब्रुवारी १९८३] (मृत्यू: ६ आक्टोबर २००७)
- १९२६: कुस्तीगीर खाशाबा दादासाहेब जाधव – १९५२ च्या हेलसिंकी ऑलिम्पिकमधे वैयक्तिक पदक मिळवणारे पहिले भारतीय, शिवछत्रपती पुरस्कार [मरणोत्तर] (मृत्यू: १४ ऑगस्ट १९८४)
- १९२९: मार्टिन ल्युथर किंग (ज्युनिअर) – कृष्णवर्णीयांचे गांधी म्हणून ओळखले जाणारे अमेरिकेतील मानवी हक्क कार्यकर्ते आणि नोबेल पारितोषिक विजेते (मृत्यू: ४ एप्रिल १९६८)
- १९३१: मराठीह कथाकार शरच्चंद्र वासुदेव चिरमुले यांचा जन्म.
- १९३८: भारतीय फुटबॉलर चुनी गोस्वामी यांचा जन्म.
- १९४७: पत्रकार नितीश नंदी यांचा जन्म.
- १९५६: बहुजन समाज पक्षाच्या नेत्या मायावती यांचा जन्म.
- १९८२: प्रसिद्ध अभिनेता नील नितीन मुकेश यांचा जन्म.
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
- १९७१: दीनानाथ दलाल – अत्यंत लोकप्रिय व प्रतिभावान चित्रकार (जन्म: ३० मे १९१६)
- १९९४: हरिलाल उपाध्याय – गुजराथी लेखक, कवी व ज्योतिषी (जन्म: २२ जानेवारी १९१६)
- १९९८: गुलजारीलाल नंदा – भारताचे दुसरे पंतप्रधान, स्वातंत्र्यसैनिक व गांधीवादी कार्यकर्ते (जन्म: ४ जुलै १८९८)
- २००२: विठाबाई भाऊ (मांग) नारायणगावकर – राष्ट्रपतिपदक विजेत्या तमाशा कलावंत (जन्म: ? ? १९३५)
- २००९: दादासाहेब फाळके पुरस्कार जिंकणारे तपन सिन्हा यांचे निधन.
- २०१२: भारताच्या पहिल्या महिला फोटोग्राफर होमाई व्यारावाला यांचे निधन.
- २०१३: डॉ. शरदचंद्र गोखले – समाजसेवक (जन्म: २९ सप्टेंबर १९२५)
- २०१४: नामदेव लक्ष्मण ढसाळ – दलित साहित्यिक (जन्म: १५ फेब्रुवारी १९४९)
दररोजच्या अपडेट्स साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.
Facebook Comments Box
Vision Abroad