4G Service in Sindhudurg: सिंधुदुर्गात येत्या ४ महिन्यात सर्वत्र ‘४जी’ सेवा कार्यान्वित होणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विस्कळीत बीएसएनएलची सेवा सुधारण्यासाठी विद्यमान खासदार नारायण राणे साहेब यांनी केंद्रीय दळणवळण व दूरसंचार विभाग मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांना पत्र लिहिले होते. त्या पत्राची दखल घेण्यात आली आहे.
मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १८७ साईट पैकी १५५ नवीन आणि ३२ विद्यमान 2G व 3G टॉवर 4G टॉवर मध्ये रूपांतरित करण्याचे ठरवले आहे. त्यापैकी २५ टॉवर कार्यान्वित झालेले आहेत. फेस टू प्रकल्पांतर्गत 4G अपग्रेडेशनसाठी ३२३ साईट पैकी ३८ साईट 4G आणि २८५ विद्यमान साईट कार्यवाहीत करण्याची ठरवलेली आहेत. यातील ४ साइट्स कार्यान्वित झालेल्या आहेत, उर्वरित टॉवर हे जून २०२५ पर्यंत कार्यान्वित करण्याचे ठरवलेले आहे.
या निर्णयामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनतेला याचा फायदा होईल असा विश्वास कुडाळ-मालवण मतदारसंघाचे आमदार निलेश राणे यांनी व्यक्त केला आहे.
Facebook Comments Box
Vision Abroad