मुंबई : राज्यातील बिबट्यांची वाढती संख्या आणि बिबट्यांचे मानवी वस्तींवर होणारे हल्ले रोखण्यासाठी राज्य सरकारने त्यांच्या नसबंदीचा पर्याय पुढे आणला आहे. बिबट्यांची संख्या नियंत्रणात आणण्यासाठी त्यांच्या नसबंदीचा प्रस्ताव लवकरच केंद्र सरकारकडे पाठवला जाईल, अशी माहिती वनमंत्री गणेश नाईक यांनी दिली.
दरम्यान, चालू वर्षात १३ वाघांचा मृत्यू झाल्याची माहितीही त्यांनी दिली. वन मंत्रिपदाचा पदभार स्विकारल्यानंतर गणेश नाईक यांनी मंत्रालयात पहिलीच पत्रकार परिषद घेतली. नाशिक पदवीधर मतदारसंघाचे विधानपरिषद सदस्य सत्यजित तांबे यांनी चार दिवसांपूर्वी बिबट्यांच्या नसबंदीबाबत आपल्याला पत्र दिले. या नसबंदीसाठी केंद्र सरकारची परवानगी लागते. सध्या राज्यात बिबट्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे.
Vision Abroad