आजचे पंचांग
- तिथि-षष्ठी – 10:01:42 पर्यंत
- नक्षत्र-हस्त – 20:31:00 पर्यंत
- करण-वणिज – 10:01:42 पर्यंत, विष्टि – 23:21:36 पर्यंत
- पक्ष- कृष्ण
- योग-सुकर्मा – 26:51:31 पर्यंत
- वार- सोमवार
- सूर्योदय- 07:17
- सूर्यास्त- 18:23
- चन्द्र-रशि-कन्या
- चंद्रोदय- 23:57:59
- चंद्रास्त- 11:15:00
- ऋतु- शिशिर
महत्त्वाच्या घटना:
- १७८८: इंग्लडमधून हद्दपार केलेले गुन्हेगार वसाहतीसाठी ऑस्ट्रेलियातील न्यू साऊथ वेल्सच्या किनार्यावर उतरले. इथे वसाहत करण्यासाठी तयार झालेल्या गुन्हेगारांची शिक्षा माफ करण्यात आली होती.
- १८४१: ब्रिटिशांनी हाँगकाँग बेटाचा ताबा घेतला.
- १९३७: फ्रॅंकलिन डिलानो रूझवेल्ट यांनी अमेरिकेचे ३२ वे राष्ट्राध्यक्ष म्हणून अमेरिकेच्या अध्यक्षपदाची शपथ घेतली. यानंतर २० जानेवारीलाच अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचा शपथविधी करण्याची प्रथा पडली.
- १९४४: दुसरे महायुद्ध – रॉयल एअर फोर्सने बर्लिनवर २३०० टन बॉम्बवर्षाव केला.
- १९४८: महात्मा गांधींची हत्या करण्याचा चौथा प्रयत्न झाला. याआधी १९३४, १९४४ व १९४४ मध्ये त्यांची हत्या करण्याचे प्रयत्न झाले होते.
- १९५७: आशियातील पहिली अणुभट्टी पंतप्रधान पंडित जवाहरलालनेहरू यांच्या हस्ते देशाला अर्पण करुन अॅटॉमिक एनर्जी एस्टॅब्लिशमेंट (सध्याचे नाव भाभा अणुसंशोधन केंद्र) या संस्थेची स्थापना करण्यात आली.
- १९६३: चीन व नेपाळ या देशांत सरहद्दविषयक करार झाला.
- १९६९: क्रॅब नेब्युलात प्रथमत: पल्सार दिसून आला.
- १९९८: संगीत क्षेत्रातील नोबेल समजला जाणारा ’पोलार संगीत पुरस्कार’ विख्यात सतारवादक पं. रविशंकर यांना जाहीर
- १९९९: गिरीश कर्नाड यांना ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर
- २००९: अमेरिकेचे पहिले कृष्णवर्णीय राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांचा शपथविधी झाला.
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
- १७७५: आंद्रे अॅम्पिअर – फ्रेन्च भौतिकशास्त्रज्ञ (मृत्यू: १० जून १८३६)
- १८६१: मराठीमधील पहिल्या स्त्री कथा-कादंबतीकार, निबंधकार आणि सुधारक काशीबाई गोविंदराव कानिटकर यांचा जन्म.
- १८७१: सर रतनजी जमसेटजी टाटा – टाटा घराण्यातील उद्योगपती व दानशूर व्यक्ति (मृत्यू: ५ सप्टेंबर १९१८)
- १८८९: महान देशभक्त आणि तपस्वी मसुरकर महाराज यांचा जन्म.
- १८९८: कृष्णाजी गणेश फुलंब्रीकर तथा ’मास्टर कृष्णराव’ – प्रतिभावान गायक, अभिनेते व संगीतकार, त्यांच्या गायनात ग्वाल्हेर, आग्रा व जयपूर घराण्यांचा संगम दिसून येई. ’वंदे मातरम’ला त्यांनी दिलेली चाल लोकप्रिय ठरली. (मृत्यू: २० आक्टोबर १९७४)
- १९३०: चंद्रावर उतरणारे दुसरे अमेरिकन अंतराळवीर बझ आल्ड्रिन यांचा जन्म.
- १९६०: आपा शेर्पा – १९ वेळा माऊंट एव्हरेस्टवर यशस्वी चढाई करणारे नेपाळी गिर्यारोहक
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
- १८९१: डेविड कालाकौआ – हवाईचा राजा (जन्म: १६ नोव्हेंबर १८३६)
- १९३६: जॉर्ज (पाचवा) – इंग्लंडचा राजा (जन्म: ३ जून १८६५)
- १९५१: अमृतलाल विठ्ठलदास ठक्कर ऊर्फ ’ठक्कर बाप्पा’ – समाजसेवक (जन्म: २९ नोव्हेंबर १८६९)
- १९८०: कस्तुरभाई लालभाई – दानशूर व राष्ट्रवादी विचारसरणीचे उद्योगपती, पद्मभूषण (१९६९), रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे संचालक (१९३७ – १९४९). अरविंद मिल्स, अशोक मिल्स, अतुल असे अनेक गिरण्या व कारखाने त्यांनी चालू केले. आपल्या गिरण्य़ांत त्यांनी कामगार कल्याणासाठी सहकार संस्था काढल्या. (जन्म: १९ डिसेंबर १८९४)
- १९८८: खान अब्दुल गफार खान तथा ’सरहद गांधी’ (जन्म: ३ जून १८९०)
- १९९३: ऑड्रे हेपबर्न – ब्रिटिश अभिनेत्री, संयुक्त राष्ट्रांच्या बालक निधीच्या (UNICEF) सदिच्छा प्रतिनिधी, ’रोमन हॉलिडे’ या चित्रपटातील अभिनयाबद्दल त्यांना ऑस्कर पुरस्कार मिळाला. (जन्म: ४ मे १९२९)
- २००२: रामेश्वरनाथ काओ – रिसर्च अँड अॅनॅलेसिस विंग (RAW) या भारतीय गुप्तचर संघटनेचे संस्थापक अध्यक्ष. काओ यांना भारतीय गुप्तचर यंत्रणेचे अध्वर्यू मानण्यात येते. (जन्म: १० मे १९१८)
दररोजच्या अपडेट्स साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.
Facebook Comments Box
Vision Abroad