सावंतवाडी: कोकण रेल्वे प्रवासी संघटना, सावंतवाडी तर्फे आज सावंतवाडी रेल्वे स्थानकावर कोकण रेल्वेचे शिल्पकार प्रा. मधु दंडवते यांची १०१ वी जयंती सावंतवाडी स्थानकात साजरी करण्यात आली. यावेळी मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांनी उपस्थिती दर्शवली होती.
यावेळी कोकण रेल्वे प्रवासी संघटनेचे प्रमुख सल्लागार जगदीश मांजरेकर, अभिमन्यु लोंढे, नंदू तारी, पुंडलिक दळवी, सुभाष शिरसाट संघटनेचे सचिव मिहिर मठकर, संपर्क प्रमुख भूषण बांदिवडेकर, सुधीर राऊळ, साईल नाईक, विहंग गोठोस्कर, मेहुल रेडीज, सागर तळवडेकर, रिक्षा संघटनेचे सर्व पदाधिकारी आणि प्रवासी उपस्थित होते
कोकण रेल्वेचे शिल्पकार प्रा. मधु दंडवते कोकणात रेल्वे आणण्यासाठी खूप मोठे योगदान दिले आहे. त्यांच्यामुळे कोकणात रेल्वे आणण्याचे अशक्य कार्य पूर्णत्वास आले. त्यांच्या या कार्याचा गौरव व्हावा यासाठी सावंतवाडी टर्मिनसला प्रा. मधू दंडवते यांचे नाव देण्यात यावे अशी मागणी कोकण रेल्वे प्रवासी संघटनेने लावून धरली आहे. या मागणी व्यतिरिक्त सावंतवाडी टर्मिनस चे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावे, या स्थानकावर महत्वाच्या नियमित गाडयांना थांबे देण्यात यावेत आणि इतर मागण्या पूर्ण करून घेण्यासाठी संघटनेने येत्या प्रजासत्ताक दिनी २६ जानेवारीला ‘रेल रोको’ आंदोलन करायचे ठरविले आहे. हे आंदोलन यशस्वी करण्यासाठी या आंदोलनात नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवावा असे आवाहन संघटनेने केले आहे.
Facebook Comments Box
Related posts:
सावंतवाडी टर्मिनसला उघड पाठिंबा देणार तोच आमचा उमेदवार- सावंतवाडी रेल्वे प्रवासी संघटना
लोकसभा निवडणूक २०२४
सिंधुदुर्ग: जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी भात पिकासाठी ताडपत्री खरेदी अनुदान योजना; अर्ज कसा कराल?
कोकण
मटण भाकरीच्या प्रसादासाठी प्रसिद्ध असलेला नांदगाव येथील श्री देव कोळंबा देवाचा जत्रोत्सव पुढील आठवड्...
कोकण
Vision Abroad