सिंधुदुर्ग :सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाची धुरा हाती घेतल्यानंतर भाजप नेते आणि मत्स्य विकास मंत्री नितेश राणे परप्रांतीय फेरीवाल्यांविरोधात आक्रमक झाले आहेत. बाहेरून आलेल्या परप्रांतीय फेरीवाल्यांना सिंधुदुर्ग जिल्ह्यातून बाहेर काढणार असे विधान त्यांनी केले आहे.
माझ्या जिल्ह्यामध्ये परप्रांतीयांची मस्ती चालणार नाही. युपी- बिहार आणि बाहेरचे फेरीवाले इथे आले आहेत त्यांना जिल्ह्यातून बाहेर काढणार. जिल्ह्याचा पालकमंत्री या नात्याने आपण जिल्ह्याच्या नागरिकांच्या सुरक्षितेतसाठी कोणतीही तडजोड करणार नसल्याचे ते म्हणाले.
अलीकडच्या काळात सिंधुदुर्ग जिल्ह्यात परप्रांतीय फेरीवाल्यांच्या प्रमाणात मोठी वाढ झाली आहे. कोकण रेल्वे मार्गावरून युपी बिहारला थेट जाणाऱ्या रेल्वे गाड्यांमुळे ही संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्यांच्या वाढत्या संख्येबरोबर जिल्ह्यातील नागरिकांचा सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. काही परप्रांतीय बेकायदेशीररित्या अवैध ड्रुग्स आणि दारूच्या तस्करी मध्ये आढळून आले आहेत. या पार्श्ववभूमीवर मंत्री नितेश राणे यांनी हे विधान केले आहे.
Facebook Comments Box
Related posts:
Konkan Railway: बाप्पा पावला! गणेशोत्सवात मुंबई-मडगाव वंदेभारत एक्सप्रेस होणार १६ डब्यांची
कोकण
सावंतवाडी रेल्वे स्थानकावर आता १२ तास रेल्वे आरक्षण सुविधा मिळणार; प्रवासी संघटनेच्या प्रयत्नांना यश
कोकण
Konkan Railway: पावसाळ्यात मुंबई गोवा वंदेभारत एक्सप्रेसच्या फेऱ्या वाढविणे अशक्य - मध्य रेल्वे
कोकण रेल्वे