IPL 2025 Schedule :क्रिकेट प्रेमींसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. आयपीएलच्या 18 व्या मोसमाचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. त्यामुळे खेळाडूंची आणि क्रिकेट चाहत्यांची अखेर अनेक दिवसांची प्रतिक्षा संपली आहे. आयपीएल गव्हर्निंग काउन्सिलने या 18 व्या हंगामाचं वेळापत्रक जाहीर केलं आहे.
कधी होणार पहिला सामना?
आयपीएलच्या 18 व्या मोसमाला 22 मार्चपासून सुरुवात होणार आहे. या स्पर्धेतील सलामीचा सामना कोलकाता विरुद्ध बंगळुरु यांच्यात होणार आहे. गतविजेत्या कोलकाता टीमच्या होम ग्राउंडमध्ये अर्थात इडन गार्डनमध्ये हा सामना होणार आहे. तर दुसऱ्याच दिवशी 23 मार्चला या स्पर्धेतील पहिल्या डबल हेडरचं (एकाच दिवशी 2 सामने) आयोजन करण्यात आलं आहे. डबल हेडरमधील पहिल्या सामन्यात हैदराबाद विरुद्ध राजस्थान आमनेसामने असतील, तर दुसरा सामना हा महामुकाबला असणार आहे. मुंबई विरुद्ध चेन्नई असा असणार आहे. हा सामना चेन्नईत खेळवण्यात येणार आहे.
यंदाच्या हंगामात एकूण 65 दिवसांत 74 सामने खेळवण्यात येणार आहे. मुंबई आणि चेन्नई हे या स्पर्धेतील 2 यशस्वी संघ आहेत. दोन्ही संघांनी प्रत्येकी 5-5 वेळा ट्रॉफीवर नाव कोरलं आहे. केकेआर हा 3 जेतेपदे जिंकणारा तिसरा सर्वात यशस्वी संघ आहे. यंदा एकूण 13 ठिकाणी हे सामने पार पडणार आहेत. त्यानुसार मुंबई, दिल्ली, चेन्नई, बंगलुरु, हैदराबाद, लखनऊ, अहमदाबाद, जयपूर, कोलकाता, धर्मशाळा, न्यू चंडीगड, गुवाहाटी आणि विशाखापट्टणम येथे सामने खेळवण्यात येणार आहेत.
दरम्यान यंदाच्या हंगामात एकूण 12 डबल हेडरचं आयोजन करण्यात आलं आहे. राजस्थान, दिल्ली, लखनऊ आणि गुजरात हे 4 संघ दुपारी प्रत्येकी 3-3 सामने खेळणार आहे. तर उर्वरित 6 संघ दुपारी प्रत्येकी 2-2 सामने खेळणार आहेत.
ग्रुप A – कोलकाता, बंगळुरु, राजस्थान, चेन्नई आणि पंजाब
ग्रुप B – मुंबई, दिल्ली, गुजरात, लखनऊ आणि हैदराबाद
कधी होणार अंतिम सामना?
आयपीएलच्या 18 व्या मोसमाला 22 मार्चपासून सुरुवात होणार आहे. क्वालिफायर-1 20 मे रोजी आणि एलिमिनेटर 21 मे रोजी खेळवला जाईल. क्वालिफायर-2 सामना 23 मे रोजी कोलकाता येथे खेळवला जाईल. अंतिम सामना 25 मे रोजी होणार आहे.
Mark your calendars, folks! 🥳🗓#TATAIPL 2025 kicks off on March 2️⃣2️⃣ with a clash between @KKRiders and @RCBTweets 🤜🤛
When is your favourite team’s first match? 🤔 pic.twitter.com/f2tf3YcSyY
— IndianPremierLeague (@IPL) February 16, 2025
Facebook Comments Box