



मुंबई : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील परिवहन महामंडळाची बस स्थानके व बसगाडयांच्या विविध अडचणीबाबत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक जी यांच्यासोबत सिंधुदुर्ग जिल्ह्य़ाचे पालकमंत्री नितेश राणे यांनी आज बैठक घेतली. यावेळी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील संबंधित अधिकारी उपस्थित होते.
सिंधुदुर्ग डोंगराळ, दुर्गम जिल्हा असून एस टी बस हा एकमेव आधार आहे. त्यामुळे बस सेवा सुरळीतपणे चालू रहावी व प्रवाशांची गैरसोय टाळून सुलभ रित्या त्यांना एसटी बसची सेवा मिळावी, अशी मागणी यावेळी नितेश राणे यांनी परिवहन मंत्र्यांकडे केली. या मागणीला परिवहन मंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असल्याची माहिती नितीश राणे यांनी दिली, तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बस स्थानक व बस गाड्यांच्या विविध अडचणीबाबतही यावेळी चर्चा करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले
सावंतवाडी टर्मिनस येथून रेल्वे वेळापत्रकाप्रमाणे तळकोकणात जाण्यासाठी एसटी बस सेवा उपलब्ध करुन देण्यात यावी. उ द दोडामार्ग, शिरोडा, वेंगुर्ला, आरोंदा, बांदा इ.