रत्नागिरी: होळीच्या सणाला गावी गेलेल्या एका ३५ वर्षीय तरुणाचा मुंबईला परतत असताना ट्रेन पकडण्याच्या प्रयत्नांत तोल गेल्याने गाडी खाली येवून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना रत्नागिरी स्थानकावर घडली आहे.
नोकरी निमित्त मुंबईत वास्तव्यास असलेला रुपेश आणि त्याचे काही मित्र मुंबईला परत जाण्यासाठी रत्नागिरी रेल्वे स्थानकावर दाखल झाले. गर्दी अधिक असल्याने सुपरफास्ट गाडीत चढण्यासाठी धडपड सुरू होती. गाडी स्थानकात शिरताच सर्वत्र गोंधळ उडाला. प्रत्येक जण चढण्याचा प्रयत्न करत होता. त्याच क्षणी रुपेशनेही गाडीत चढण्याचा प्रयत्न केला, त्या प्रयत्नात त्याचा हात निसटला, तोल गेला आणि तो रेल्वेखाली गेला. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या रुपेशला तातडीने त्याला ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरू असताना त्याची प्राणज्योत मालवली.
होळी साठी मोठ्या प्रमाणात कोकणकर कोकणात आपल्या गावांत जातात. त्यामुळे कोकण रेल्वे मार्गावरील गाड्यांत मोठी गर्दी होत आहे. मध्य रेल्वे आणि पाश्चिम रेल्वे प्रशासनाने या मार्गावर विशेष गाड्या चालविल्या आहेत. तरीसुद्धा नियमित गाड्यांतून प्रवास करण्यास प्रवासी पसंदी देत असताना दिसत आहे. रेल्वे प्रशासनाकडून विशेष गाड्यांसाठी चुकीचे नियोजन झाले असल्याने या गाड्यांना प्रतिसाद दिला जात नसल्याचा आरोप रेल्वे प्रवासी संघटनांनी केला आहे.
Facebook Comments Box