Bank Holiday Cancelled: या दिवशीची सार्वजनिक सुट्टी रद्द; बॅंका राहणार चालू

   Follow us on        

Bank Holiday March 2025 : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने सरकारी व्यवहार करणाऱ्या सर्व बँकांना ३१ मार्च २०२५ ला बँका सुरू ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. ३१ मार्च रोजी ईद उल फित्र (रमजान ईद) असल्याने यादिवशी सार्वजनिक सुट्टी असते. पण आर्थिक व्यवहारातील गोंधळ टाळण्यासाठी आरबीआयने हा निर्णय घेतला आहे. इकॉनॉमिक्स टाईम्सने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

रमजान ईद निमित्त हिमाचल प्रदेश आणि मिझोराम वगळता सर्व राज्यांमध्ये ३१ मार्च रोजी बँक हॉलिडे जाहीर करण्यात आला होता. ३१ मार्च २०२५ रोजी संपणाऱ्या २०२४-२५ या आर्थिक वर्षात पावत्या आणि देयकांसह सर्व सरकारशी संबंधित आर्थिक व्यवहारांचा योग्य हिशेब करण्यासाठी या दिवसाची सुट्टी रद्द करण्यात आली आहे.

 

३१ मार्च २०२५ रोजी कोणत्या बँकिंग सुविधा सुरू असणार?

प्राप्तिकर, जीएसटी, सीमाशुल्क आणि उत्पादन शुल्कासह सरकारी कर देयके.

पेन्शन पेमेंट आणि सरकारी अनुदाने

सरकारी वेतन आणि भत्त्यांचे वितरण

सरकारी योजना आणि अनुदानांशी संबंधित सार्वजनिक व्यवहार

Facebook Comments Box

1 thoughts on “Bank Holiday Cancelled: या दिवशीची सार्वजनिक सुट्टी रद्द; बॅंका राहणार चालू

  1. चंद्रशेखर एकनाथ बेजकर says:

    प्रामुख्याने कोकणातील बातम्या मिळाव्यात यासाठी कोकण न्युज जॉइन झालो आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search