



Konkan Railway: उन्हाळी सुट्टी साठी कोकण रेल्वे मार्गावर होणारी अतिरिक्त गर्दी विचारात घेऊन कोकण रेल्वेने मध्य रेल्वेच्या समन्वयाने विशेष गाडी कोकण रेल्वे मार्गावर चालविण्याचा निर्णय घेतला आहे. या गाडीची तपशील खालीलप्रमाणे आहे.
१) गाडी क्रमांक ०१०५१/०१०५२ लोकमान्य टिळक (टी)- करमाळी – लोकमान्य टिळक (टी) (AC)साप्ताहिक स्पेशल:
गाडी क्रमांक ०१०५१ लोकमान्य टिळक (टी)- करमाळी स्पेशल (साप्ताहिक) दर शुक्रवारी , ११/०४/२०२५ ते २३/०५/२०२५ पर्यंत लोकमान्य टिळक (टी) येथून रात्री २२:१५ वाजता सुटेल आणि ट्रेन दुसऱ्या दिवशी दुपारी १२:०० वाजता करमाळी पोहोचेल.
गाडी क्रमांक ०१०५२ करमाळी – लोकमान्य टिळक (टी) स्पेशल (साप्ताहिक) दर शनिवारी , १२/०४/२०२५ ते २४/०५/२०२५ पर्यंत करमाळी येथून दुपारी १४:३० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी ०४:०५ वाजता लोकमान्य टिळक (टी) ला पोहोचेल.
ही गाडी ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव,वीर, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड,नांदगाव, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड,आणि थिविम आणि या स्थानकांवर थांबेल.
डब्यांची रचना : एकूण २० LHB कोच : दोन टायर एसी – ०८कोच, थ्री टायर एसी – १० कोच, जनरेटर कार – ०२ कोच
Facebook Comments Box
Related posts:
Konkan Railway: मध्य रेल्वेचा शनिवार - रविवार ब्लॉक; कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या 'या' गाड्यांवर प...
महाराष्ट्र
मालवणात उद्या छत्रपति शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा पायाभरणी समारंभ; असा असेल नवीन पुतळा
महाराष्ट्र
फक्त २००० रुपयांत, तासाभरात कोकणात, पुणेकर चाकरमान्यांना अखेर मिळाला प्रवासाचा जलद पर्याय
महाराष्ट्र