Konkan Railway: प्रवाशांची गर्दी कमी करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने कोकण रेल्वे मार्गावर मंगळुरू सेंट्रल – एच. निजामुद्दीन दरम्यान एकेरी विशेष ट्रेन चालवण्याचा निर्णय घेण्यात आहे. या गाडीचा तपशील खालीलप्रमाणे..
१) गाडी क्रमांक ०६०७५ मंगळुरू सेंट्रल – एच. निजामुद्दीन वन वे सुपरफास्ट स्पेशल :
गाडी क्रमांक ०६०७५ मंगळुरू सेंट्रल – एच. निजामुद्दीन वन वे सुपरफास्ट स्पेशल १८/०४/२०२५, शुक्रवारी दुपारी ४:०० वाजता मंगळुरू सेंट्रल येथून निघेल आणि तिसऱ्या दिवशी सकाळी ८:०० वाजता हजरत निजामुद्दीन येथे पोहोचेल.
ही गाडी उडुपी, कुंदापारा, मुर्डेश्वर, कुमटा, गोकर्ण रोड, कारवार, मडगाव जंक्शन, करमाळी, थिविम, सावंतवाडी रोड, कुडाळ, सिंधुदुर्ग, कणकवली, वैभववाडी रोड, राजापूर रोड, रत्नागिरी, संगमेश्वर रोड, चिपळूण, खेड, माणगाव, रोहा, पनवेल, वसई रोड, सुरत, वडोदरा जं., रतलाम, नागदा जं., कोटा जं., सवाईमाधोपूर जं. आणि मथुरा जं या स्थानकांवर थांबेल.
डब्यांची रचना : एकूण २२ कोच = स्लीपर – २० कोच, एसएलआर – ०२.
Facebook Comments Box