आजचे पंचांग
- तिथि-त्रयोदशी – 08:30:22 पर्यंत, चतुर्दशी – 28:52:21 पर्यंत
- नक्षत्र-उत्तराभाद्रपद – 06:27:53 पर्यंत, रेवती – 27:39:31 पर्यंत
- करण-वणिज – 08:30:22 पर्यंत, विष्टि – 18:43:21 पर्यंत
- पक्ष- कृष्ण
- योग-वैधृति – 08:40:42 पर्यंत, विश्कुम्भ – 28:34:12 पर्यंत
- वार- शनिवार
- सूर्योदय- 06:16
- सूर्यास्त- 18:57
- चन्द्र-राशि-मीन – 27:39:31 पर्यंत
- चंद्रोदय- 29:30:59
- चंद्रास्त- 17:33:59
- ऋतु- ग्रीष्म
जागतिक दिवस :
- एलियन डे Alien Day
- जागतिक बौद्धिक संपदा दिवस World Intellectual Property Day
- राष्ट्रीय लहान मुले आणि पाळीव प्राणी दिवस National Kids And Pets Day
महत्त्वाच्या घटना :
- 1755 : रशियातील जुन्या प्रसिद्ध मॉस्को विद्यापीठाची स्थापना.
- 1841 : द बॉम्बे गॅझेट या इंग्रजी वृत्तपत्राची मुंबईत स्थापना झाली आणि ती प्रथम रेशमी कापडावर प्रकाशित झाली
- 1903 : ऍटलेटिको माद्रिद असोसिएशन फुटबॉल क्लबची स्थापना झाली.
- 1933 : गेस्टापो, नाझी जर्मनीच्या गुप्त पोलिस दलाची स्थापना झाली.
- 1962 : नासाचे ‘रेंजर-4’ चंद्रावर कोसळले.
- 1964 : टांगानिका झांझिबारमध्ये विलीन होऊन टांझानिया देशाची निर्मिती झाली.
- 1970 : जागतिक बौद्धिक संपदा संघटनेची स्थापना करणारे अधिवेशन अंमलात आले.
- 1973 : अजित नाथ रे भारताचे 14 वे सरन्यायाधीश बनले.
- 1986 : रशियातील चेरनोबिल येथील अणुभट्टीत मोठा स्फोट होऊन किरणोत्सारी पदार्थ वातावरणात सोडले.
- 1989 : बांगलादेशात चक्रीवादळामुळे सुमारे 1,300 लोकांचा मृत्यू झाला, 12,000 लोक जखमी झाले आणि 80,000 बेघर झाले.
- 1995 : भारताच्या निशा मोहोता हिने आशियाई प्रादेशिक बुद्धिबळ स्पर्धेत आंतरराष्ट्रीय महिला मास्टर विजेतेपद पटकावले.
- 2005 : आंतरराष्ट्रीय समुदायाच्या दबावाखाली सीरियाने लेबनॉनमधून आपले सैन्य मागे घेतले.
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
- 1479 : ‘वल्लभाचार्य’ – पुष्टिमार्गाचे संस्थापक यांचा जन्म.
- 1900 : ‘चार्लस रिश्टर’ – रिश्टर तीव्रता प्रमाणचे जनक यांचा जन्म. (मृत्यू: 30 सप्टेंबर 1985)
- 1908 : ‘सर्व मित्र सिकरी’ – भारताचे 13 वे सरन्यायाधीश यांचा जन्म. (मृत्यू: 24 सप्टेंबर 192)
- 1942 : ‘मोल्वी इफ्तिखार हुसैन अन्सारी’ – भारतीय मोल्वी आणि राजकारणी यांचा जन्म. (मृत्यू: 30 सप्टेंबर 2014)
- 1948 : ‘मौशमी चटर्जी’ – अभिनेत्री यांचा जन्म.
- 1970 : ‘मेलानिया ट्रम्प’ – अमेरिकेचे 45वे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची पत्नी यांचा जन्म.
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
- 1920 : ‘श्रीनिवास रामानुजन’ – थोर भारतीय गणितज्ञ यांचे निधन. (जन्म: 22 डिसेंबर 1887)
- 1976 : त्र्यंबक खानोलकर ऊर्फ ‘आरती प्रभू’ – साहित्यिक चिंतामणी यांचे निधन. (जन्म: 8 मार्च 1930)
- 1987 : ‘शंकरसिंग रघुवंशी’ – शंकर-जयकिशन या जोडीतील संगीतकार यांचे निधन. (जन्म: 5 ऑक्टोबर 1922)
- 1999 : ‘मनमोहन अधिकारी’ – लोकशाही पद्धतीने निवडण्यात आलेले नेपाळचे पहिले पंतप्रधान यांचे निधन. (जन्म: 20 जून 1920)
दररोजच्या अपडेट्स साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.
Facebook Comments Box