Konkan Railway: कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या २ गाड्यांच्या रेकचे रूपांतर आधुनिक दर्जाच्या एलएचबी रेक मध्ये करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. मात्र ही सुधारणा करताना या गाड्यांच्या डब्यांच्या संरचनेत मोठा बदल करण्यात आला असून सामान्य प्रवाशांना सोयीच्या ठरणाऱ्या स्लीपर डब्यांत कपात करण्यात आली आहे. याबाबतचा अधिक तपशील खालीलप्रमाणे
१) २२१४९/२२१५० पुणे जंक्शन – एर्नाकुलम – द्वि-साप्ताहिक एक्सप्रेस ही गाडी दिनांक ६ जुलै २०२५ पासून सुधारित एलएचबी कोचसहित धावणार आहे.
२ ) ११०९७/११०९८ पुणे जंक्शन – एर्नाकुलम – पुणे जंक्शन साप्ताहिक एक्सप्रेस ही गाडी दिनांक ५ जुलै २०२५ पासून सुधारित एलएचबी कोचसहित धावणार आहे.
या दोन्ही गाड्यांच्या डब्यांची सध्याची आणि सुधारित संरचना खालीलप्रमाणे असणार आहे.
सध्याची संरचना | सुधारित संरचना |
२ टियर एसी – ०१ |
२ टियर एसी – ०२
|
३ टियर एसी – ०४ |
३ टियर एसी – ०४
|
स्लीपर – ११ | स्लीपर – ०७ |
जनरल – ०३ | जनरल – ०४ |
पॅन्ट्री कार – ०१ | पॅन्ट्री कार – ०१ |
एसएलआर – ०२ | एसएलआर – ०२ |
एकूण – २२ आयसीएफ कोच |
एकूण – २० एलएचबी कोच
|
LHB मध्ये अपग्रेड करताना दोन्ही या गाड्यांचे तब्बल ४ स्लीपर डबे कमी करण्यात आले आहेत. एकिकडे कोकण रेल्वे मार्गावर स्लीपर आणि जनरल डब्यांमध्ये मोठी गर्दी होत असताना या गाड्यांचे हे डबे कमी केल्याने प्रवाशांकडून नाराजी व्यक्त होत आहे.
Facebook Comments Box