आजचे पंचांग
- तिथि-चतुर्थी – 11:26:47 पर्यंत
- नक्षत्र-मृगशिरा – 14:22:01 पर्यंत
- करण-विष्टि – 11:26:47 पर्यंत, भाव – 22:16:55 पर्यंत
- पक्ष- शुक्ल
- योग-अतिगंड – 08:33:58 पर्यंत, सुकर्मा – 29:38:19 पर्यंत
- वार- गुरूवार
- सूर्योदय- 06:13
- सूर्यास्त- 19:59
- चन्द्र-राशि-मिथुन
- चंद्रोदय- 09:07:59
- चंद्रास्त- 23:07:59
- ऋतु- ग्रीष्म
जागतिक दिवस :
- महाराष्ट्र दिन
- मराठी राजभाषा दिन
- आंतरराष्ट्रीय कामगार दिन
महत्त्वाच्या घटना :
- 1707 : इंग्लंडचे राज्य आणि स्कॉटलंडचे राज्य विलीन होऊन ग्रेट ब्रिटनचे साम्राज्य निर्माण झाले.
- 1739 चिमाजी अप्पांनी पोर्तुगीजांच्या ताब्यातील वसईवर हल्ला केला. तीन महिन्यांच्या युद्धानंतर वसई मराठ्यांच्या ताब्यात गेली.
- 1840 : युनायटेड किंगडममध्ये पेनी ब्लॅक, पहिले अधिकृत टपाल तिकीट जारी करण्यात आले.
- 1844 : हाँगकाँग पोलीस दलाची स्थापना जगातील दुसरे आधुनिक पोलीस दल आणि आशियातील पहिले पोलीस दल म्हणून करण्यात आली.
- 1882 : आर्य महिला समाजाचे पं. रमाबाईंच्या पुढाकाराने पुण्यात त्याची स्थापना झाली.
- 1884 : अमेरिकेत कामगारांनी दिवसात 8 तास काम करावे या मागणीची घोषणा.
- 1886 : आंतरराष्ट्रीय कामगार दिन हा कम्युनिस्ट आंतरराष्ट्रीय संघटनेच्या दुसर्या बैठकीत पहिल्यांदा साजरा केला.
- 1890 : जागतिक कामगार दिन हा जगात पहिल्यांदा साजरा केला.
- 1897 : रामकृष्ण मिशन ची सुरूवात स्वामी विवेकानंद यांनी केली.
- 1927 : जागतिक कामगार दिन हा भारतात पहिल्यांदा साजरा केला.
- 1930 : सूर्यमालेतील प्लुटो चे नामकरण करण्यात आले.
- 1940 : युद्धाच्या उद्रेकामुळे ऑलिम्पिक खेळ रद्द करण्यात आले.
- 1960 : मुंबईसह मराठी भाषिक ‘महाराष्ट्र’ राज्य आणि ‘गुजरात’ राज्य या स्वतंत्र राज्यांचा निर्माण झाला.
- 1960 : गुजरात उच्च न्यायालयाची स्थापना झाली.
- 1961 : क्युबाचे पंतप्रधान फिडेल कॅस्ट्रो यांनी क्युबाला समाजवादी देश घोषित केले आणि निवडणुका रद्द केल्या.
- 1962 : महाराष्ट्रातील जिल्हा परिषदांची स्थापना.
- 1978 : जपानचे ‘नामी उमुरा’ हे उत्तर ध्रुवावर पोहोचणारे पहिले मनुष्य आहेत.
- 1983 : ‘अमरावती विद्यापीठाची’ स्थापना.
- 1998 : कोकण रेल्वे प्रकल्प पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी राष्ट्राला समर्पित केला.
- 1999 : नगरपालिकांच्या नगराध्यक्षांची मुदत एक वर्षावरून अडीच वर्षांपर्यंत वाढवण्यासाठी सुधारणा करणारा अध्यादेश जारी झाला.
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
- 1218 : जर्मनीचा राजा रुडॉल्फ (पहिला) यांचा जन्म. (मृत्यू: 15 जुलै 1291)
- 1913 : ‘बलराज साहनी’ – अभिनेता यांचा जन्म. (मृत्यू: 13 एप्रिल 1973)
- 1915 : डॉ. रामेश्वर शुक्ल उर्फ अंचल – हिन्दी साहित्यिक यांचा जन्म. (मृत्यू: 13 ऑक्टोबर 1995)
- 1919 : ‘मन्ना डे’ – भारतीय भाषेतील प्रतिभासंपन्न पार्श्वगायक यांचा जन्म. (मृत्यू: 24 ऑक्टोबर २०१३)
- 1922 : ‘मधु लिमये’ – स्वातंत्र्यसैनिक, पत्रकार आणि समाजवादी नेते यांचा जन्म. (मृत्यू: 8 जानेवारी 1995)
- 1932 : ‘एस. एम. कृष्णा’ – कर्नाटकचे 16 वे मुख्यमंत्री यांचा जन्म.
- 1943 : ‘सोनल मानसिंह’ – नृत्यांगना यांचा जन्म.
- 1955 : ‘आनंद गोपाल महिंद्रा’ – महिंद्रा समूहाचे व्यवस्थापकीय संचालक आणि अध्यक्ष यांचा जन्म.
- 1971 : ‘अजित कुमार’ – भारतीय अभिनेते आणि रेस कार ड्रायव्हर यांचा जन्म.
- 1988 : ‘अनुष्का शर्मा’ – हिंदी चित्रपट अभिनेत्री यांचा जन्म.
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
- 1945 : ‘जोसेफ गोबेल्स’ – जर्मनीचा चॅन्सेलर नाझी नेता यांचे
- निधन. (जन्म: 29 ऑक्टोबर 1897)
- 1958 : गणेश शिवराम उर्फ नाना जोग – नाटककार यांचे नागपुर येथे निधन.
- 1972 : ‘कमलनयन बजाज’ – उद्योगपती, जमनालाल बजाज यांचे चिरंजीव यांचे निधन. (जन्म: 23 जानेवारी 1915)
- 1993 : ‘ना. ग. गोरे’ – स्वातंत्र्यसैनिक आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील नेते यांचे निधन. (जन्म: 15 जून 1907)
- 2013 : ‘निखील एकनाथ खडसे’ यांचे निधन
दररोजच्या अपडेट्स साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.
Facebook Comments Box