Konkan Railway: १०० कोटी उत्त्पन्न मिळवून देण्याची क्षमता असणाऱ्या जिल्ह्याच्या पदरी उपेक्षाच!

   Follow us on        
Kokanai Exclusive: कोकण रेल्वेच्या गेल्या वर्षीच्या म्हणजे २४-२५ उत्पन्नात सिंधुदुर्ग जिल्ह्याचे मोठे योगदान राहिले आहे आहे.  सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या स्थानकांपासून मिळणाऱ्या उत्पन्नात वाढ होऊन ते ९८ कोटी ६२ लाख झाले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तीन स्थानके म्हणजे कणकवली, कुडाळ आणि सावंतवाडी कोकण रेल्वेला सर्वात जास्त उत्पन्न  मिळवून देणाऱ्या पहिल्या १० स्थानकांमध्ये मोडत आहेत. तर जिल्ह्यातून पूर्ण वर्षात जवळपास ४८ लाख प्रवाशांनी प्रवास केला आहे.  कणकवली आणि कुडाळ स्थानकांच्या उत्पन्नात मोठी वाढ होऊन ते प्रत्येकी ३४ कोटीच्या घरात पोहोचले आहे. ही दोन्ही स्थानके उत्पन्नात संपूर्ण कोकण रेल्वे क्षेत्रात अनुक्रमे पाचव्या आणि सहाव्या क्रमांकावर आहेत. सावंतवाडी स्थानकापासून मिळणाऱ्या उत्पन्नात सुद्धा जवळपास ९ ते १० टक्क्याने वाढ होऊन ते १६ कोटीच्या घरात गेले असून संपूर्ण कोकण रेल्वे क्षेत्रात दहाव्या क्रमांकावर आहे. वैभववाडी (७ कोटी) सिंधदुर्ग (५.६० कोटी)  ही स्थानके सुद्धा रेल्वे ला चांगले उत्त्पन्न मिळवून देत आहेत.
असे असताना रेल्वे प्रशासनाकडून या जिल्ह्याच्या पदरी उपेक्षाच पडत असल्याचे दिसत आहे. कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या एकूण १५ गाडयांना या जिल्ह्यात एकही स्थानकावर थांबा नाही आहे. खर ते महाराष्ट्र सरकारने या जिल्ह्याला पर्यटन जिल्हा म्हणून घोषित केले असताना या जिल्ह्यातून जाणाऱ्या प्रत्येक गाडीला जिल्हातील स्थानकांवर आलटून पालटून थांबे देणे गरजेचे होते. मात्र प्रवाशी संघटनांनी वारंवार मागणी करून सुद्धा रेल्वे प्रशासन हे थांबे देत नाही आहे.
सावंतवाडी स्थानकापासून मिळणाऱ्या उत्पन्नाच्या वाढीस वाव 
सावंतवाडी पंचक्रोशीमध्ये येणारे तालुके आणि गावे पाहता या स्थानकाचा विकास करून इथे महत्वाच्या गाडयांना थांबे दिले जावेत, उदघाटन झालेल्या टर्मिनस चे काम पूर्ण करण्यात यावे यासाठी कोकण रेल्वे प्रवासी संघटना, सावंतवाडी ने विविध माध्यमातून आंदोलन छेडले आहे. टर्मिनस चे काम पूर्ण झाल्यानंतर आणि अधिक गाडयांना थांबे दिल्यावर या स्थानकावरून रेल्वे ला मिळणाऱ्या उत्पन्नात दुपटीने वाढ होण्याचा विश्वास संघटनेने व्यक्त केला आहे.
वैभववाडी आणि सिंधुदुर्ग स्थानकापासून मिळणाऱ्या उत्पन्नात चांगली वाढ होत असूनही येथे आरक्षण सुविधा, पादचारी पूल आणि इतर मूलभूत सेवा उपलब्ध करून देण्यास रेल्वे प्रशासन अयशस्वी ठरत आहे. खरे तर वाढती प्रवासी संख्या लक्षात घेऊन येथे या मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याची गरज आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात थांबा नसणाऱ्या गाड्या
१) १२२०१/०२ – कोचुवेली लोकमान्य टिळक टर्मिनस गरीब रथ एक्सप्रेस
२) १२४३१ /१२४३२ त्रिवंद्रम राजधानी एक्सप्रेस
३) १२२२४/२३ एलटीटी – एर्नाकुलम दुरांतो एक्सप्रेस
४) १२२८३/८४  – हजरत निजामुद्दीन एर्नाकुलम दुरंतो एक्सप्रेस
५) १२४४९/५०  गोवा संपर्क क्रांती एक्सप्रेस
६) १२२१७/१८ – केरळ संपर्क क्रांती एक्सप्रेस
७) १२९७७/७८  – मारुसागर सुपरफास्ट एक्सप्रेस
८) १९५७७/७८ जामनगर तिरुनेलवेली एक्सप्रेस
९) १२४८३/८४ अमृतसर कोचुवेली साप्ताहिक सुपरफास्ट एक्सप्रेस
१०) २२६५९/६० ऋषिकेश कोचुवली सुपरफास्ट एक्सप्रेस
११ २२४७५/७६ कोईमतूर हिसार एसी सुपरफास्ट एक्सप्रेस
१२) २०९२३/२४  गांधीधाम तिरुनवेली हमसफर एक्स्प्रेस
१३) २०९०९/१० कोचुवेली पोरबंदर साप्ताहिक सुपरफास्ट एक्सप्रेस
१४) २२६५३/५४ हजरत निजामुद्दीन – तिरुवनंतपुरम सेंट्रल सुपरफास्ट एक्सप्रेस
१५) २२६५३/५४ हजरत निजामुद्दीन – एर्नाकुलम  सुपरफास्ट एक्सप्रेस
Facebook Comments Box

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search