०२ मे पंचांग आणि दिनविशेष


आजचे पंचांग

  • तिथि-पंचमी – 09:17:53 पर्यंत
  • नक्षत्र-आर्द्रा – 13:05:21 पर्यंत
  • करण-बालव – 09:17:53 पर्यंत, कौलव – 20:30:25 पर्यंत
  • पक्ष- शुक्ल
  • योग-धृति – 27:19:32 पर्यंत
  • वार- शुक्रवार
  • सूर्योदय- 06:12
  • सूर्यास्त- 18:59
  • चन्द्र-राशि-मिथुन
  • चंद्रोदय- 10:11:59
  • चंद्रास्त- 24:04:59
  • ऋतु- ग्रीष्म

जागतिक दिन :
  • राष्ट्रीय भाऊ आणि बहिण दिन National Brothers And Sister Day
  • राष्ट्रीय जीवन विमा दिवस National Life Insurance Day
महत्त्वाच्या घटना :
  • 1908 : स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी लंडनमध्ये पहिल्यांदा शिवजयंती साजरी केली.
  • 1918 : जनरल मोटर्सने शेवरलेट मोटर कंपनी विकत घेतली.
  • 1921 : स्वातंत्र्यवीर सावरकरांचे बंधू बाबाराव आणि तात्याराव यांना अंदमानातून हिंदुस्थानात पाठवण्यात आले.
  • 1994 : बँक ऑफ कराडचे बँक ऑफ इंडियामध्ये विलीनीकरण.
  • 1994 : नगर जिल्ह्यातील रामदास ढमाले या अपंग युवकाने पुण्यातील टिळक तलावात सलग 37 तास 45 मिनिटे पोहण्याचा विक्रम केला.
  • 1997 : टोनी ब्लेअर इंग्लंडचे पंतप्रधान झाले.
  • 1997 : पुण्याच्या अभिजित कुंटेने राष्ट्रीय अ बुद्धिबळ स्पर्धेत आंतरराष्ट्रीय मास्टर विजेतेपदाचे निकष पूर्ण केले.
  • 1999 : कोल्हापूर येथील शर्वरी मानसिंग पवार या तीन वर्षे चार महिन्याच्या बालिकेने 51.1 कि. मी. अंतर न थांबता स्केटिंग करुन 3 तास 51 मिनिटांत पार केले.
  • 1999 : मीरा मॉस्कोसो पनामाच्या पहिल्या महिला अध्यक्ष बनल्या.
  • 2004 : एस. राजेंद्र बाबू यांनी भारताचे 34 वे सरन्यायाधीश म्हणून पदभार स्वीकारला.
  • 2011 : ओसामा बिन लादेनला पाकिस्तानातील अबोटाबाद येथे नेव्ही सील 6 ने ठार मारले.
  • 2012 : नॉर्वेजियन चित्रकार एडवर्ड मुंच यांचे द स्क्रीम हे चित्र लिलावात $120 दशलक्षमध्ये विकले गेले. हा नवा विश्वविक्रम ठरला.
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
  • 1899 : ‘भालजी पेंढारकर’ – मराठी चित्रपटसृष्टी चे चित्रमहर्षी यांचा जन्म. (मृत्यू: 26 नोव्हेंबर 1994)
  • 1920 : ‘डॉ. वसंतराव देशपांडे’ – शास्त्रीय व नाट्यसंगीत गायक यांचा जन्म. (मृत्यू: 30 जुलै 1983)
  • 1921 : ‘सत्यजित रे’ – ख्यातनाम चित्रपट निर्माते व दिग्दर्शक आणि भारतरत्‍न तसेच विशेष ऑस्कर पुरस्कार विजेते यांचा जन्म. (मृत्यू: 23 एप्रिल 1992)
  • 1929 : ‘जिग्मे दोरजी वांगचुकयांचा’ – भूतानचे राजे जन्म. (मृत्यू: 21 जुलै 1972)
  • 1969 : ‘ब्रायन लारा’ – वेस्ट इंडीजचा क्रिकेटपटू यांचा जन्म.
  • 1972 : ‘अहटी हेनला’ – स्काईप सॉफ्टवेअर चे सहनिर्माते यांचा जन्म.
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
  • 1519 : ‘लिओनार्डो दा विंची’ – इटालियन चित्रकार, संशोधक, गणितज्ञ आणि भौतिकशास्त्रज्ञ यांचे निधन. (जन्म: 15 एप्रिल 1452)
  • 1683 : ‘रघुनाथ नारायण हणमंते’ तथा रघुनाथपंडित शिवाजी महाराजांच्या सांगण्यावरुन राज्यव्यवहारकोश तयार करणारे मुत्सद्दी यांचे निधन.
  • 1963 : ‘डॉ. के. बी. लेले’ – महाराष्ट्रातील जादूगारांचे आचार्य यांचे निधन. (जन्म: 2 नोव्हेंबर 1882)
  • 1973 : ‘दिनकर केशव’ तथा ‘दि. के. बेडेकर’ – लेखक, तत्त्वचिंतक व समीक्षक यांचे निधन. (जन्म: 8 जून 1910)
  • 1975 : ‘शांताराम आठवले’ – चित्रपट दिग्दर्शक, लेखक, कवी व गीतकार यांचे निधन. (जन्म: 21 जानेवारी 1910)
  • 1998 : ‘पुरुषोत्तम काकोडकर’ – गोवा मुक्ती संग्रामातील स्वातंत्र्यसैनिक, काँग्रेसचे नेते, ५व्या लोकसभेचे सदस्य यांचे निधन. (जन्म: 18 मे 1913)
  • 1999 : ‘पं. सुधाकरबुवा डिग्रजकर’ – जयपूर-अत्रौली घराण्याचे शास्त्रीय गायक यांचे निधन.
  • 2011 : अल कायदा चे संस्थापक ओसामा बिन लादेन ला अमेरिकन सैन्याने ठार मारले. (जन्म: 10 मार्च 1957)


दररोजच्या अपडेट्स साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.
Facebook Comments Box

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search