आजचे पंचांग
- तिथि-द्वादशी – 14:59:04 पर्यंत
- नक्षत्र-हस्त – 24:09:46 पर्यंत
- करण-बालव – 14:59:04 पर्यंत, कौलव – 28:15:43 पर्यंत
- पक्ष- शुक्ल
- योग-वज्र – 26:56:48 पर्यंत
- वार- शुक्रवार
- सूर्योदय- 06:09
- सूर्यास्त- 19:02
- चन्द्र-राशि-कन्या
- चंद्रोदय- 16:26:00
- चंद्रास्त- 28:21:00
- ऋतु- ग्रीष्म
जागतिक दिन :
- चुंबक वर्णमाला दिवस
महत्त्वाच्या घटना :
- 1874 : मुंबईत घोड्यावर चालणारी ट्राम सुरू झाली.
- 1877 : पेरूच्या (देश) किनारपट्टीवर 8.8 तीव्रतेच्या भूकंपात 2,541 लोकांचा मृत्यू झाला.
- 1904 : सिटी ट्रोरो हे स्टीम इंजिन 160 किमी/ताशी वेगाने धावणारे युरोपमधील पहिले इंजिन बनले.
- 1936 : इटलीने इथिओपिया देश बळकावला.
- 1955 : पश्चिम जर्मनी नाटोमध्ये सामील झाला.
- 1975 : विजेवर चालणारी टंकलेखन मशीन तयार करण्यात आली
- 1999 : अटलांटा ग्रांप्री नेमबाजी स्पर्धेत भारताच्या रुपी उन्नीकृष्णनने प्रोन गटात रौप्यपदक पटकाविले.
- 1999: ग्वाटेमालाच्या ज्युलिओ मार्टिनेझने 20 किमी ग्रँड प्रिक्स शर्यत 1 तास 17 मिनिटे आणि 46 सेकंदात पूर्ण करून नवीन विश्वविक्रम प्रस्थापित केला.
- 2006 : तास्मानियात खाणीतील अपघातानंतर 14 दिवस जमिनीखाली अडकलेल्या दोन कामगारांची सुटका.
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
- 1540 : ‘महाराणा प्रताप’ – मेवाड चे सम्राट यांचा जन्म. (मृत्यू: 29 जानेवारी 1597)
- 1814 : ‘दादोबा पांडुरंग तर्खडकर’ – मराठी व्याकरणकार, लेखक आणि समाजसुधारक यांचा जन्म. (मृत्यू: 17 ऑक्टोबर 1882)
- 1866 : ‘गोपाल कृष्ण गोखले’ – थोर समाजसेवक यांचा कातळूक यांचा जन्म. (मृत्यू: 19 फेब्रुवारी 1915)
- 1886 : ‘केशवराव मारुतराव जेधे’ – स्वातंत्र्यसैनिक, संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील प्रमुख नेते, शेतकरी कामगार पक्षाचे संस्थापक यांचा जन्म. (मृत्यू: 12 नोव्हेंबर 1959)
- 1928 : ‘वसंत नीलकंठ गुप्ते’ – समाजवादी कामगारनेते, लेखक व समाजवादाचे अभ्यासक यांचा जन्म. (मृत्यू: 9 सप्टेंबर 2010)
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
- 1338 : ‘चोखा मेळा’ – भगवद्भक्त हा मंगळवेढे येथील गावकुस बांधत असताना कोसळणार्या कुसबाखाली सापडला.
- 1917 : ‘कान्होबा रणझोडदास’ – डॉक्टर, कवी व शास्त्रज्ञ यांचे निधन.
- 1919 : ‘नारायण वामन टिळक’ उर्फ रेव्हरंड यांचे निधन. (जन्म: 6 डिसेंबर 1861)
- 1931 : ‘अल्बर्ट मायकेलसन’ – वर्णपटाद्वारे प्रकाशाच्या मापनासंबंधीच्या शोधासाठी नोबेल पारितोषिक मिळवणारे जर्मन-अमेरिकन पदार्थवैज्ञानिक यांचे निधन. (जन्म: 19 डिसेंबर 1852)
- 1959 : ‘डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील’ – थोर शिक्षणतज्ज्ञ यांचे निधन. (जन्म: 22 सप्टेंबर 1887)
- 1986 : ‘शेरपा तेलसिंग नोर्गे’ – एवरेस्ट शिखर सर करणारा यांचे निधन. (जन्म: 29 मे 1914)
- 1995 : ‘अनंत माने’ – दिग्दर्शक यांचे निधन. (जन्म: 22 सप्टेंबर 1915)
- 1998 : ‘तलत महमूद’ – पार्श्वगायक व अभिनेता, गझलचे बादशहा यांचे निधन. (जन्म: 24 फेब्रुवारी 1924)
- 1999 : ‘करमसीभाई जेठाभाई सोमय्या’ – उद्योगपती यांचे निधन.
- 2008 : ‘पं. फिरोझ दस्तूर’ – किराणा घराण्याचे शास्त्रीय गायक यांचे निधन.
- 2014 : ‘नेदुरुमल्ली जनार्दन रेड्डी’ – भारतीय राजकारणी यांचे निधन. (जन्म: 20 फेब्रुवारी 1935)
दररोजच्या अपडेट्स साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.
Facebook Comments Box