१० मे पंचांग आणि दिनविशेष


आजचे पंचांग

  • तिथि-त्रयोदशी – 17:32:52 पर्यंत
  • नक्षत्र-चित्रा – 27:15:53 पर्यंत
  • करण-तैेतिल – 17:32:52 पर्यंत
  • पक्ष- शुक्ल
  • योग-सिद्वि – 27:59:52 पर्यंत
  • वार- शनिवार
  • सूर्योदय- 06:08
  • सूर्यास्त- 19:02
  • चन्द्र-राशि-कन्या – 13:42:56 पर्यंत
  • चंद्रोदय- 17:14:00
  • चंद्रास्त- 28:53:59
  • ऋतु- ग्रीष्म

जागतिक दिन :
  • महासागर दिवस Mother Ocean Day
  • राष्ट्रीय लघु व्यवसाय दिवस National Small Business Day
महत्त्वाच्या घटना :
  • 1818 : रायगड किल्ला इंग्रज आणि मराठ्यांमध्ये तह झाला आणि इंग्रजांच्या ताब्यात गेला.
  • 1824 : लंडनमधील नॅशनल गॅलरी सर्वसामान्यांसाठी खुली करण्यात आली.
  • 1857 : भारताचे पहिले स्वतंत्रता संग्राम झाले.
  • 1877 : रोमेनियाने स्वतःला तुर्कस्तानपासून स्वतंत्र जाहीर केले.
  • 1907 : स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी लंडनमध्ये 1857 च्या स्वातंत्र्यलढ्याचा सुवर्ण महोत्सव साजरा केला.
  • 1937 : स्वातंत्र्यवीर सावरकर यांची रत्‍नागिरीच्या स्थानबद्धतेतून बिनशर्त मुक्तता.
  • 1940 : दुसरे महायुद्ध – हिटलरने हॉलंड, बेल्जियम आणि फ्रान्सवर हल्ला केला.
  • 1940 : दुसरे महायुद्ध – नेव्हिल चेंबरलेन यांनी राजीनामा दिला आणि विन्स्टन चर्चिल युनायटेड किंगडमचे पंतप्रधान झाले.
  • 1962 : मार्वल कॉमिक्सने द इनक्रेडिबल हल्कचा पहिला अंक प्रकाशित केला.
  • 1979 : मायक्रोनेशिया प्रजासत्ताक बनले.
  • 1981 : भारतात प्रथमच मुंबईत रात्रीचा क्रिकेट सामना खेळवण्यात आला.
  • 1981 : फ्रँकोइस मिटरँड फ्रान्सचे अध्यक्ष झाले.
  • 1993 : संतोष यादव हि दोनदा एव्हरेस्ट पर्वत सर करणारी पहिली भारतीय महिला ठरली.
  • 1994 : दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्रप्रमुख, नोबेल पारितोषिक विजेते नेल्सन मंडेला यांनी देशाची सूत्रे हाती घेतली.
  • 1997 : इराणमध्ये 7.3 रिश्टर स्केल क्षमतेच्या भूकंपात सुमारे 1,567 लोकांचा मृत्यू झाला, 2,300 लोक जखमी झाले आणि 50,000 लोक बेघर झाले.
  • 2002 : घानामध्ये फुटबॉलचा सामना सुरू असताना चेंगराचेंगरी, 120 ठार.
  • 2013 : वन वर्ल्ड ट्रेड सेंटर ही पश्चिम गोलार्धातील सर्वात उंच इमारत (त्या काळातील) बनली.
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
  • 1265 : ‘फुशिमी’ – जपानचा सम्राट यांचा जन्म. (मृत्यू: 8 ऑक्टोबर 1317)
  • 1855 : ‘युकतेश्वर गिरी’ – भारतीय गुरु आणि शिक्षक यांचा जन्म. (मृत्यू: 9 मार्च 1936)
  • 1889 : ‘नारायण दामोदर सावरकर’ – स्वातंत्र्यवीर सावरकरांचे बंधू, कादंबरीकार यांचा जन्म.
  • 1905 : ‘पंकज मलिक’ – गायक व संगीतकार यांचा जन्म. (मृत्यू: 16 फेब्रुवारी 1978)
  • 1909 : ‘बेल्लारी शामण्णा केशवन’ – आंतरराष्ट्रीय कीर्तीचे ग्रंथालयशास्त्रज्ञ, पद्मश्री, इंडियन नॅशनल सायंटिफिक डॉक्युमेंटेशन सेंटर चे पहिले संचालक यांचा जन्म. (मृत्यू: 16 फेब्रुवारी 2000)
  • 1914 : ‘ताराचंद बडजात्या’ – चित्रपट निर्माते यांचा जन्म. (मृत्यू: 21 सप्टेंबर 1992)
  • 1918 : ‘रामेश्वरनाथ काओ’ – रिसर्च अँड अ‍ॅनॅलेसिस विंग (RAW) या भारतीय गुप्तचर संघटनेचे संस्थापक अध्यक्ष यांचा जन्म. (मृत्यू: 20 जानेवारी 2002)
  • 1927 : ‘नयनतारा सहगल’ – भारतीय लेखिका यांचा जन्म.
  • 1931 : ‘जगदीश खेबूडकर’ – ज्येष्ठ गीतकार यांचा जन्म.
  • 1940 : ‘माणिकराव गोडघाटे’ ऊर्फ ग्रेस – प्रसिद्धी पराङमुख गीतकार व कवी यांचा जन्म. (मृत्यू: 26 मार्च 2012)
  • 1986 : ‘पेंड्याला हरिकृष्ण’ – बुद्धीबळपटू यांचा जन्म.
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
  • 1774 : ‘लुई (पंधरावा)’ – फ्रान्सचा राजा यांचे निधन. (जन्म: 15 फेब्रुवारी 1710)
  • 1899 : ‘महादेव विनायक रानडे’ – रँड वधाच्या प्रकरणी द्रविड बंधूंची हत्या केल्याबद्दल यांना फाशी.
  • 1981 : विमादि तथा ‘विनायक माधव दीक्षित’ – विनोदी लेखक प्राध्यापक पटवर्धन यांचे निधन.
  • 1998 : ‘यदुनाथ दत्तात्रय थत्ते’ – पत्रकार, समाजसेवक, लेखक, चरित्रकार, साधना मासिकाचे संपादक यांचे निधन. (जन्म: 5 ऑक्टोबर 1922)
  • 2000 : ‘नागोराव घन:श्याम’ तथा ‘ना. घ. देशपांडे’ – कवी यांचे निधन. (जन्म: 21 ऑगस्ट 1909)
  • 2001 : ‘सुधाकरराव नाईक’ – महाराष्ट्राचे 13 वे मुख्यमंत्री, हिमाचल प्रदेशचे राज्यपाल यांचे निधन. (जन्म: 21 ऑगस्ट 1934)
  • 2002 : सय्यद अख्तर हुसेन रिझवी ऊर्फ ‘कैफी आझमी’ – गीतकार यांचे निधन. (जन्म: 14 जानेवारी 1919)
  • 2015 : ‘निनाद बेडेकर’ – भारतीय इतिहासकार, लेखक यांचे निधन. (जन्म: 17 ऑगस्ट 1949)


दररोजच्या अपडेट्स साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.

 

Facebook Comments Box

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search