Mansoon Update:यंदा मान्सून दाखल होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. नैऋत्य मोसमी वारे अंदमान व निकोबार बेटावर 13 रोजी, तर देवभूमी केरळात नियोजित वेळेच्या 4 दिवस आधीच म्हणजेच 27 मे रोजी दाखल होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. त्यामुळे यंदा मोसमी पावसाचा प्रवास लवकरच सुरू होण्याची चिन्हे असून, शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
साधारणपणे मान्सून अंदमानात 18 ते 20 मे दरम्यान, केरळात 1 जूनच्या आसपास, तळकोकणात 7 जूनला, महाराष्ट्रात 10 जूनपर्यंत, तर संपूर्ण देशभरात 15 जुलैपर्यंत सक्रिय होत असतो. मात्र, यंदाच्या मान्सूनने लवकरच वर्दी दिल्याचे दिसत आहे. पुढील आठवड्यापर्यंत अंदमान आणि निकोबारमध्ये मान्सूनचा पाऊस सुरू होऊ शकतो. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, 13 मेपर्यंत मान्सून अंदमान आणि निकोबारच्या काही भागात दाखल होण्याची शक्मयता आहे. त्यानंतरच्या तीन ते चार दिवसात तो अंदमान, निकोबार बेटासह अंदमान समुद्राचा परिसर व्यापण्याची शक्यता आहे. मोसमी पावसाकरिता स्थिती अनुकूल असल्याने त्याचा पुढचा प्रवास झपाट्याने होण्याची चिन्हे आहेत. 2009 मध्ये मान्सून लवकरच म्हणजे 23 मे रोजी केरळमध्ये पोहोचला होता. यंदा 27 मे रोजी केरळच्या किनाऱ्यावर तो लवकरच सक्रिय झाला, तर मागच्या 15 वर्षांतील मान्सूनची हा गतिमान प्रवास असेल. त्यानंतरही मान्सूनची वाटचाल सुरूच राहणार असून, महाराष्ट्रातही तो नियोजित वेळेआधी येण्याची लक्षणे आहेत. तर साधारण 8 जुलैपर्यंत मान्सून संपूर्ण देश व्यापेल, असा अंदाज आहे.
Facebook Comments Box