



SSC Result 2025 : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (राज्य मंडळ) घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेच्या निकालाच्या तारखेची घोषणा करण्यात आली आहे. यंदा दहावीची परीक्षा दरवर्षीच्या तुलनेत लवकर घेण्यात आली होती. त्यामुळे विद्यार्थी पालकांचे निकालाच्या तारखेकडे लक्ष लागले होते. त्यानुसार यंदा दहावीच्या परीक्षेचा निकाल मंगळवारी (१३ मे) जाहीर करण्यात येणार आहे.
राज्य मंडळाचे सचिव देविदास कुलाळ यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे ही माहिती दिली. राज्यभरातील सुमारे १५ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली आहे. यंदा परीक्षेदरम्यान कॉपीमुक्त अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करण्यात आली. त्यामुळे कॉपीच्या घटनांमध्ये घट झाली आहे. बारावीच्या परीक्षेचा निकाल दीड टक्क्याने घटलाअसताना दहावीचा निकाल वाढणार की घटणार याकडे विद्यार्थी, पालकांचे लक्ष लागले आहे
उद्या दिनांक 13 मे रोजी दुपारी ठीक 1 वाजता खालील संकेतस्थळांवर उपलब्ध होणार आहे.