१४ मे पंचांग आणि दिनविशेष


आजचे पंचांग

  • तिथि-प्रथम – 24:38:19 पर्यंत
  • नक्षत्र-विशाखा – 09:09:31 पर्यंत
  • करण-बालव – 11:35:04 पर्यंत, कौलव – 24:38:19 पर्यंत
  • पक्ष- कृष्ण
  • योग-परिघ – पूर्ण रात्र पर्यंत
  • वार- मंगळवार
  • सूर्योदय- 06:04:53
  • सूर्यास्त- 19:04:56
  • चन्द्र-राशि-वृश्चिक
  • चंद्रोदय- 19:48:59
  • चंद्रास्त- 06:09:00
  • ऋतु- ग्रीष्म

जागतिक दिन :
  • छत्रपती संभाजी महाराज जयंती

महत्त्वाच्या घटना :
  • 1796 : इंग्लंडमधील ग्लुसेस्टर काउंटीमधील बर्कले येथील आठ वर्षांच्या जेम्स फिलिप या मुलाला जगातील पहिली देवीची लस टोचण्यात आली.
  • 1900 : पॅरिसमध्ये दुसऱ्या ऑलिम्पिक खेळांना सुरुवात झाली.
  • 1940 : दुसरे महायुद्ध – हॉलंडने जर्मनीसमोर शरणागती पत्करली.
  • 1948 : इस्रायलच्या स्वातंत्र्याची घोषणा
  • 1955 : सोव्हिएत रशिया, अल्बेनिया, बल्गेरिया, चेकोस्लोव्हाकिया, हंगेरी, पोलंड, रोमानिया आणि पूर्व जर्मनी या साम्यवादी राष्ट्रांमधील वीस वर्षांच्या परस्पर संरक्षणासाठी वॉर्सा करारावर पोलंडमधील वॉर्सा येथे स्वाक्षरी झाली.
  • 1960 : एअर इंडियाने मुंबई-न्यूयॉर्क सेवा सुरू केली.
  • 1963 : कुवेत संयुक्त राष्ट्र संघात सामील झाला.
  • 1965 : चीनने सकाळी 7.30 वाजता दुसऱ्या अणुबॉम्बचा यशस्वी स्फोट केला.
  • 1973 : अमेरिकेने स्कायलॅब या आपल्या अवकाशातील प्रयोगशाळेचे प्रक्षेपण केले.
  • 1982 : ऑल इंडिया रेडिओचे आकाशवाणी असे नामकरण करण्यात आले.
  • 1997 : देशातील आणि महाराष्ट्रातील पहिल्या महिला सहकारी साखर कारखान्याची साखर आयुक्त कार्यालयात सहकार कायदा कलम चारखाली नोंदणी झाली. इंदिरा गांधी भारतीय महिला विकास सहकारी साखर कारखाना असे त्याचे नाव देण्यात आहे.
  • 2001 : भारत आणि मलेशिया यांच्यात सात करार झाले.
  • 2012 : अयशस्वी लँडिंग, अग्नी एअर फ्लाइट सीएचटी नेपाळमध्ये क्रॅश झाली, 15 लोक ठार झाले. यात ‘तरुणी सचदेव’ (रसनाच्या जाहिरातीतील बालकलाकार) यांचाही मृतू.
  • 2021 : चीनने मंगळावर पहिले रोव्हर ‘झुरोंग’ यशस्वीरित्या उतरवले.
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
  • 1657 : ‘छत्रपती संभाजी महाराज’ – यांचा जन्म. (मृत्यू: 11 मार्च 1689)
  • 1907 : ‘आयुब खान’ – फील्ड मार्शल आणि पाकिस्तानचे दुसरे राष्ट्राध्यक्ष यांचा जन्म. (मृत्यू: 19 एप्रिल 1974)
  • 1909 : ‘वसंत शिंदे’ – विनोदसम्राट, कलागौरव पुरस्कार, चित्रभूषण पुरस्कार व बालगंधर्व पुरस्काराने सन्मानित यांचा जन्म. (मृत्यू: 4 जुलै 1999)
  • 1923 : ‘मृणाल सेन’ – दिग्दर्शक यांचा जन्म.
  • 1926 : ‘डॉ. इंदुताई पटवर्धन’ – आनंदग्रामच्या संस्थापिका व थोर समाजसेविका यांचा जन्म. (मृत्यू: 8 फेब्रुवारी 1999)
  • 1965 : ‘सचिन खेडेकर’ – भारतीय अभिनेते यांचा जन्म.
  • 1981 : ‘प्रणव मिस्त्री’ – भारतीय संगणक शास्त्रज्ञ यांचा जन्म.
  • 1990 : ‘मार्क झकरबर्ग’ – फेसबुकचे सहसंस्थापक यांचा जन्म.
  • 1998 : ‘तरुणी सचदेव’ – रसना च्या जाहिरातीतील बालकलाकार यांचा जन्म. (मृत्यू: 14 मे 2012)
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
  • 1643 : ‘लुई (तेरावा)’ – फ्रान्सचा राजा यांचे निधन. (जन्म: 27 सप्टेंबर 1601)
  • 1923 : ‘चार्ल्स दि फ्रेसिने’ – फ्रांसचा पंतप्रधान यांचे निधन.
  • 1923 : ‘सर नारायण गणेश चंदावरकर’ – कायदेपंडित, समाजसुधारक यांचे निधन. (जन्म: 2 डिसेंबर 1855)
  • 1963 : ‘डॉ. रघू वीरा’ – भाषाशास्त्रज्ञ, जनसंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष, घटनासमितीचे सदस्य, राज्यसभा खासदार यांचे मोटार अपघातात निधन झाले. (जन्म: 30 डिसेंबर 1902)
  • 1978 : ‘जगदीश चंद्र माथूर’ – नाटककार व लेखक यांचे निधन. (जन्म: 16 जुलै 1917)
  • 1978 : ‘रॉबर्ट मेंझिस’ – ऑस्ट्रेलियाचे बारावे पंतप्रधान यांचे निधन.
  • 1988 : ‘विलेम ड्रीस’ – नेदरलॅंड्सचा पंतप्रधान यांचे निधन.
  • 1998 : ‘फ्रँक सिनात्रा’ – हॉलिवूड मधील अभिनेते व गायक यांचे निधन. (जन्म: 12 डिसेंबर 1915)
  • 2000 : ‘ओबुची कीझो’ – जपानी पंतप्रधान यांचे निधन.
  • 2012 : ‘तरुणी सचदेव’ – रसनाच्या जाहिरातीतील बालकलाकार यांचे निधन. (जन्म: 14 मे 1998)
  • 2013 : ‘असगर अली इंजिनिअर’ – भारतीय लेखक यांचे निधन.


दररोजच्या अपडेट्स साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.

 

Facebook Comments Box

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search