आजचे पंचांग
- तिथि-तृतीया – 28:05:49 पर्यंत
- नक्षत्र-ज्येष्ठा – 14:08:04 पर्यंत
- करण-वणिज – 15:21:33 पर्यंत, विष्टि – 28:05:49 पर्यंत
- पक्ष-कृष्ण
- योग-शिव – 07:00:36 पर्यंत
- वार- गुरूवार
- सूर्योदय- 06:04:06
- सूर्यास्त- 19:05:42
- चन्द्र-राशि-वृश्चिक – 14:08:04 पर्यंत
- चंद्रोदय- 21:37:59
- चंद्रास्त- 07:41:00
- ऋतु- ग्रीष्म
जागतिक दिन :
- आंतरराष्ट्रीय कुटुंब दिन
- आंतरराष्ट्रीय ग्राहक समर्थन दिवस
महत्त्वाच्या घटना :
- 1718 : जगातील पहिल्या मशीन गनचे पेटंट जेम्स पुकल यांनी केले.
- 1730 : रॉबर्ट वॉलपोल युनायटेड किंग्डमचे पहिले पंतप्रधान बनले.
- 1811 : पॅराग्वेला स्पेनपासून स्वातंत्र्य मिळाले.
- 1836 : सूर्यग्रहणापूर्वी दिसणारे बेलीचे मणी प्रथम शास्त्रज्ञ फ्रान्सिस बेली यांनी पाहिले.
- 1928 : प्लेन क्रेझी शोमध्ये मिकी माऊस कार्टून प्रथम प्रसारित झाले.
- 1935 : मॉस्को शहरात भुयारी रेल्वेची सुरूवात झाली.
- 1940 : दुसरे महायुद्ध – हॉलंडने जर्मनीसमोर शरणागती पत्करली.
- 1940 : सॅन बर्नार्डिनो, कॅलिफोर्निया येथे पहिले मॅकडोनाल्ड रेस्टॉरंट उघडले.
- 1958 : सोव्हिएत युनियनने स्पुतनिक 3 लाँच केले.
- 1960 : सोव्हिएत युनियनने स्पुतनिक 4 लाँच केले.
- 1961 : पुण्यातील चतु:श्रृंगी पॉवर स्टेशनमध्ये झालेल्या भीषण स्फोटात 9 जणांचा मृत्यू झाला.
- 2000 : दक्षिण काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील मंडीपुरा येथे अतिरेक्यांनी पेरलेल्या भूसुरुंगाच्या स्फोटात जम्मू – काश्मीरचे ऊर्जा राज्यमंत्री गुलाम हसन बट यांच्यासह 5 जणांचा मृत्यू झाला.
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
- 1817 : ‘देवेन्द्रनाथ टागोर’ – भारतीय तत्त्ववेत्ते आणि लेखक यांचा जन्म. (मृत्यू: 19 जानेवारी 1905)
- 1859 : ‘पिअर क्युरी’ – नोबेल पारितोषिकविजेते फ्रेन्च भौतिकशास्त्रज्ञ यांचा जन्म. (मृत्यू: 19 एप्रिल 1906)
- 1903 : ‘रामचंद्र श्रीपाद जोग’ – साहित्य मीमांसक, कवी व विचारवंत यांचा जन्म. (मृत्यू: 21 फेब्रुवारी 1977)
- 1907 : ‘सुखदेव थापर’ – क्रांतिकारक यांचा जन्म. (मृत्यू: 23 मार्च 1931)
- 1967 : ‘माधुरी दिक्षीत-नेने’ – अभिनेत्री यांचा जन्म.
- 1988 : ‘राम पोथिनेनी’ – भारतीय फिल्म अभिनेता यांचा जन्म.
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
- 1350 : ‘संत जनाबाई’ – यांचे निधन.
- 1729 : ‘खंडेराव दाभाडे’ – मराठा साम्राज्याचे कुशल सरदार यांचे निधन.
- 1993 : ‘के. एम. करिअप्पा’ – स्वतंत्र भारताचे पहिले लष्करप्रमुख फील्डमार्शल यांचे निधन. (जन्म: 28 जानेवारी 1899)
- 1994 : ‘ओम अग्रवाल’ – जागतिक हौशी स्नूकर अजिंक्यपद स्पर्धेतील एकमेव भारतीय विजेता यांचे निधन.
- 1994 : चित्रकार व कॅलेंडर निर्मितीचे अध्वर्यू पी. सरदार यांचे निधन.
- 2000 : ‘सज्जन’ – जुन्या जमान्यातील चित्रपट व नाट्य अभिनेते यांचे निधन.
- 2007 : ‘जेरी फेलवेल’ – लिबर्टी विद्यापीठाचे स्थापक यांचे निधन. (जन्म: 11 ऑगस्ट 1933)
- 2010 : ‘भैरोंसिंह शेखावत’ – भारताचे माजी उपराष्ट्रपती यांचे निधन.
दररोजच्या अपडेट्स साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.
Facebook Comments Box