आजचे पंचांग
- तिथि-चतुर्थी – 29:16:40 पर्यंत
- नक्षत्र-मूळ – 16:08:19 पर्यंत
- करण-भाव – 16:44:20 पर्यंत, बालव – 29:16:40 पर्यंत
- पक्ष- कृष्ण
- योग-सिद्ध – 07:13:12 पर्यंत
- वार- शुक्रवार
- सूर्योदय- 06:03:43
- सूर्यास्त- 19:06:05
- चन्द्र-राशि-धनु
- चंद्रोदय- 22:30:59
- चंद्रास्त- 08:33:59
- ऋतु- ग्रीष्म
जागतिक दिन :
- शांततेत एकत्र राहण्याचा आंतरराष्ट्रीय दिवस
- आंतरराष्ट्रीय प्रकाश दिवस
- राष्ट्रीय डेंग्यू दिवस
महत्त्वाच्या घटना :
- 1665 : पुरंदर किल्ल्यास दिलेरखानाने घातलेला वेढा तोडण्याच्या प्रयत्नात मुरारबाजी यांचा मृत्यू.
- 1866 : युनायटेड स्टेट्समध्ये पाच सेंट किंवा निकेल नाणे सुरू झाले.
- 1899 : क्रांतिकारक बाळकृष्ण चाफेकर यांना फाशी.
- 1929 : हॉलिवूडच्या अकादमी ऑफ मोशन पिक्चर्स, आर्ट्स अँड सायन्सेसने मोशन पिक्चर्समधील उल्लेखनीय कामगिरीचा सन्मान करण्यासाठी पहिला समारंभ आयोजित केला. हे पुरस्कार पुढे ऑस्कर म्हणून ओळखले जाऊ लागले.
- 1969 : सोविएत रशियाचे व्हेनेरा-5 हे मानवविरहित अंतराळयान शुक्र ग्रहाच्या वातावरणात प्रवेश मिळवणारे पहिले अंतराळयान.
- 1975 : सिक्कीमचे भारतात विलीन झाले.
- 1975 : जपानची जुनको ताबेई माउंट एव्हरेस्ट चढणारी पहिली महिला ठरली.
- 1993 : बचेन्द्री पालच्या नेतृत्वाखालील पहिल्या महिला भारतीय मोहिमेने सात मुलींसह अठरा गिर्यारोहकांना एव्हरेस्ट सर करण्याचा मान मिळवून दिला व नवा विश्वविक्रम प्रस्थापित केला.
- 1996 : अटलबिहारी वाजपेयी यांनी भारताचे 10 वे पंतप्रधान म्हणून पद स्वीकारले. मात्र आवश्यक पाठबळ न मिळाल्याने त्यांचे सरकार केवळ 13 दिवस टिकले.
- 2000 : बॅडमिंटनला अधिक लोकप्रिय बनवण्यासाठी आणि खेळाचे प्रसारण सुलभ करण्यासाठी, क्वालालंपूर येथे आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन महासंघाच्या बैठकीत हा खेळ 15 गुणांऐवजी 7 गुणांचा करण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र हा नियम 2006 मध्ये बदलण्यात आला.
- 2005 : कुवेतमध्ये महिलांना प्रथमच मतदानाचा अधिकार मिळाला.
- 2007 : निकोलस सार्कोझी फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष झाले.
- 2010 : वेस्ट इंडिजमध्ये झालेल्या 20-20 विश्वचषकाच्या निर्णायक सामन्यात इंग्लंडने ऑस्ट्रेलियाचे 147 धावांचे लक्ष्य तीन गडी गमावून पूर्ण केले आणि प्रथमच विश्वविजेता ठरला.
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
- 1825 : ‘केरुनाना लक्ष्मण छत्रे’ – आद्य गणिती, आधुनिक भास्कराचार्य यांचा जन्म. (मृत्यू: 19 मार्च 1884)
- 1831 : ‘डेव्हिड एडवर्ड ह्यूजेस’ – मायक्रोफोन चे सहसंशोधक यांचा जन्म. (मृत्यू: 22 जानेवारी 1900)
- 1905 : ‘हेन्री फोंडा’ – अमेरिकन अभिनेते यांचा जन्म. (मृत्यू: 12 ऑगस्ट 1982)
- 1926 : ‘माणिक वर्मा’ – गायिका यांचा जन्म. (मृत्यू: 10 नोव्हेंबर 1996)
- 1931 : ‘के. नटवर सिंह’ – भारतीय राजकारणी व परराष्ट्रमंत्री यांचा जन्म.
- 1970 : ‘गॅब्रिएला सॅबातिनी’ – अर्जेंटिनाची टेनिस खेळाडू यांचा जन्म.
- 1988 : ‘विक्की कौशल’ – भारतीय बॉलिवूड अभिनेता यांचा जन्म.
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
- 1830 : ‘जोसेफ फोरियर’ – फ्रेन्च गणितज्ञ व भौतिकशास्त्रज्ञ यांचे निधन. (जन्म: 21 मार्च 1768)
- 1950 : ‘अण्णासाहेब लठ्ठे’ – कोल्हापूर संस्थानचे दिवाण व शिक्षणमंत्री यांचे निधन. (जन्म: 9 डिसेंबर 1878)
- 1977 : ‘मादीबो केएटा’ – माली देशाचे पहिले अध्यक्ष यांचे निधन. (जन्म: 4 जुन 1915)
- 1990 : ‘जिम हेनसन’ – द मपेट्स चे जनक यांचे निधन. (जन्म: 24 सप्टेंबर 1936)
- 1994 : ‘माधव मनोहर’ – साहित्य समीक्षक यांचे निधन.
- 1994 : ‘फणी मुजुमदार’ – चित्रपट निर्माते, दिग्दर्शक व पटकथा लेखक यांचे निधन. (जन्म: 28 डिसेंबर 1911)
- 2008 : ‘रॉबर्ट मोन्डवी’ – ओपस वन व्हाइनरी चे सहसंस्थापक यांचे निधन. (जन्म: 18 जुन 1913)
- 2014 : ‘रुसी मोदी’ – टाटा स्टीलचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक यांचे निधन. (जन्म: 17 जानेवारी 1918)
दररोजच्या अपडेट्स साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.
Facebook Comments Box