



Konkan Railway: कोकण रेल्वे मार्गावर वेरवली स्थानका नजीक दरड कोसळून या मार्गावरील वाहतूक विस्कळित झाल्याची माहिती समोर आली आहे. संध्याकाळी सहा वाजताच्या सुमारास ही दरड कोसळल्याची प्राथमिक माहिती आहे. सुदैवाने या वेळेस कोणतीही गाडी या ठिकाणावरून जात नव्हती त्यामुळे धोका टळला आहे.
ही दरड बाजूला करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू होते. वाहतुक ठप्प झाल्याने अनेक गाड्या रखडल्या होत्या . मात्र आताच आलेल्या माहितीनुसार दरड बाजूला करण्यात प्रशासनाला यश आले आहे. दोन्ही बाजूने वाहतुक सुरू करण्यात आली आहे. मात्र या घटनेमुळे गाड्यांचे वेळापत्रक बिघडले असून या मार्गावरील गाड्या उशिराने धावत आहेत.
Facebook Comments Box
Related posts:
कोकण रेल्वेचे भारतीय रेल्वेत विलीनीकरण करण्याचा निर्णय निवडणुकीनंतरच - रेल्वे राज्यमंत्री व्ही. सोमन...
कोकण
Konkan Railway: कोकण रेल्वे मार्गावर धावणार हिवाळी विशेष गाडी; आरक्षण 'या' तारखेपासून सुरु
कोकण रेल्वे
कोकण रेल्वेला विक्रमी उत्पन्न मिळवून देणाऱ्या संगमेश्वर रोड स्थानकाकडे रेल्वे प्रशासनाचे दुर्लक्ष
कोकण