आजचे पंचांग
- तिथि-नवमी – 27:25:15 पर्यंत
- नक्षत्र-शतभिष – 18:59:18 पर्यंत
- करण-तैतुल – 16:16:41 पर्यंत, गर – 27:25:15 पर्यंत
- पक्ष-कृष्ण
- योग-वैधृति – 24:34:06 पर्यंत
- वार=बुधवार
- सूर्योदय-06:04
- सूर्यास्त-19:06
- चन्द्र राशि-कुंभ
- चंद्रोदय-26:03:59
- चंद्रास्त-13:18:59
- ऋतु-ग्रीष्म
जागतिक दिन :
- जागतिक ध्यान दिवस
- जागतिक मासे स्थलांतर दिन
- आंतरराष्ट्रीय चहा दिवस
- सांस्कृतिक विविधतेसाठी जागतिक दिवस
महत्त्वाच्या घटना :
- 1881 : वॉशिंग्टन (डी.सी.) मध्ये अमेरिकन रेड क्रॉसची स्थापना झाली.
- 1904 : फेडरेशन इंटरनॅशनल डी फुटबॉल असोसिएशन (FIFA) ची पॅरिसमध्ये स्थापना झाली.
- 1927 : चार्ल्स ऑगस्टस लिंडबर्ग एक अमेरिकन विमानचालक आणि लष्करी अधिकारी होता. त्यांनी न्यूयॉर्क शहर ते पॅरिस पर्यंत 3,600 मैल (5,800 किमी) चे पहिले नॉनस्टॉप उड्डाण केले, 33.5 तास एकट्याने उड्डाण केले.
- 1932 : अमेलिया इअरहार्ट ह्या अटलांटिक महासागर पार करणारी पहिली महिला ठरली.
- 1991 : भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची हत्या.
- 1992 : चीनने 1,000 किलोटन अणुबॉम्बची यशस्वी चाचणी केली. हा जगातील सर्वात शक्तिशाली अणुस्फोट आहे.
- 1994 : मिस इंडिया सुष्मिता सेनने ४३व्या जागतिक सौंदर्य स्पर्धेत मिस युनिव्हर्सचा किताब जिंकला. ही पदवी मिळवणारी ती पहिली भारतीय आहे.
- 1996 : सांगली जिल्ह्यातील माधवराव पाटील हे ब्रिटन मधील इलिंग शहराचे महापौर झाले.
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
- 1916 : ‘हेरॉल्ड रॉबिन्स’ – अमेरिकन कादंबरीकार यांचा जन्म. (मृत्यू: 14 ऑक्टोबर 1997)
- 1923 : ‘अर्मांड बोरेल’ – स्विस गणितज्ञ यांचा जन्म. (मृत्यू: 11 ऑगस्ट 2003)
- 1928 : ‘ज्ञानेश्वर नाडकर्णी’ – कला समीक्षक व लेखक यांचा जन्म. (मृत्यू: 23 डिसेंबर 2010)
- 1931 : ‘शरद जोशी’ – हिन्दी कवी, लेखक व उपहासकार यांचा जन्म. (मृत्यू: 5 सप्टेंबर 1991)
- 1956 : ‘रविन्र्द मंकणी’ – अभिनेता यांचा जन्म.
- 1958 : ‘नइम खान’ – भारतीय-अमेरिकन फॅशन डिझायनर यांचा जन्म.
- 1960 : ‘मोहनलाल’ – दक्षिण भारतीय अभिनेता यांचा जन्म.
- 1971 : ‘आदित्य चोप्रा’ – भारतीय चित्रपट निर्माता यांचा जन्म.
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
- 1471 : ‘हेन्री (सहावा)’ – इंग्लंडचा राजा यांचे निधन. (जन्म: 6 डिसेंबर 1421)
- 1686 : ‘ऑटो व्हॉन गॅरिक’ – वातावरणाबाबत मूलभूत सिद्धांत मांडणारे जर्मन पदार्थवैज्ञानिक यांचे निधन. (जन्म: 30 नोव्हेंबर 1602)
- 1979 : ‘जानकीदेवी बजाज’ – स्वातंत्र्य वीरांगना यांचे निधन. (जन्म: 7 जानेवारी 1893)
- 1991 : ‘राजीव गांधी’ – भारताचे माजी पंतप्रधान यांची हत्या. (जन्म: 20 ऑगस्ट 1944)
- 1998 : ‘आबासाहेब बाबूराव किल्लेदार’ – इंटकचे सोलापुरातील नेते यांचे निधन.
- 2000 : ‘मार्क आर. ह्यूजेस’ – हर्बालाइफ कंपनी चे स्थापक यांचे निधन. (जन्म: 1 जानेवारी 1956)
दररोजच्या अपडेट्स साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.
Facebook Comments Box