२३ मे पंचांग आणि दिनविशेष


आजचे पंचांग 

  • तिथि – एकादशी – 22:32:49 पर्यंत
  • नक्षत्र – उत्तराभाद्रपद – 16:03:29 पर्यंत
  • करण – भाव – 11:57:55 पर्यंत, बालव – 22:32:49 पर्यंत
  • पक्ष – कृष्ण
  • योग – प्रीति – 18:36:05 पर्यंत
  • वार – शुक्रवार
  • सूर्योदय – 06:04
  • सूर्यास्त – 19:07
  • चन्द्र राशि – मीन
  • चंद्रोदय – 27:21:00
  • चंद्रास्त – 15:15:00
  • ऋतु – ग्रीष्म

जागतिक दिन :
महत्त्वाच्या घटना :
  • १५६८: नेदरलँड्सला स्पेनपासून स्वातंत्र्य.
  • १७३७: पोर्तुगीजांकडुन जिंकल्यानंतर पेशव्यांनी अर्नाळा किल्ला परत बांधून घेतला.
  • १८०५: नेपोलियन बोनापार्टला इटलीचा राज्यपदी राज्याभिषेक.
  • १८२९: सिरील डेमियनला अ‍ॅकॉर्डियन या वाद्याचे पेटंट मिळाले.
  • १९११: न्यू यॉर्क सार्वजनिक ग्रंथालय सामान्य जनतेस खुले.
  • १९४९: पश्चिम जर्मनी हे राष्ट्र अस्तित्त्वात आले.
  • १९५१: तिबेट देशाने चीनबरोबर तिबेटच्या शांततेत मुक्तीसाठी सतरा बिंदू करार केला.
  • १९५६: आयुर्विमा व्यवसायाचे राष्ट्रीयीकरण करण्यासंबंधीचे विधेयक मंजूर झाले.
  • १९५८: अमेरिकेचा पहिला उपग्रह एक्सप्लोरर १ बंद पडला.
  • १९८४: बचेंद्री पाल या महिलेने एव्हरेस्ट शिखर चढून जाणारी पहिली भारतीय महिला होण्याचा मान मिळविला.
  • १९९५: जावा संगणक भाषेची अधिकृत घोषणा.
  • १९९७: माऊंट एव्हरेस्ट हे सर्वोच्‍च शिखर सर्वप्रथम सर करणार्‍या तेनसिंग नोर्गे यांचे नातू ताशी तेनसिंग यांनी माऊंट एव्हरेस्ट सर केले.
  • २००८: भारतीय लष्कर दलाच्या सैन्यांनी जमिनीवरून जमिनीवर मारा करणाऱ्या पुर्थ्वी-२ या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली.
  • २०१६: भारतीय अंतरीक्ष संशोधन संस्था इस्रो ने आंध्रप्रदेश मधील श्रीहरिकोटा अंतराळ केंद्रातून संपूर्ण भारतीय बनावटीचे अंतराळ शटल आरएलव्ही-टीडी ची स्थापना केली.

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
  • १०५२: फ्रान्सचा राजा फिलिप (पहिला) यांचा जन्म. (मृत्यू: २९ जुलै ११०८)
  • १७०७: स्वीडीश वनस्पतीतज्ञ कार्ल लिनिअस यांचा जन्म. (मृत्यू: १० जानेवारी १७७८)
  • १८७५: अमेरिकन उद्योगपती आल्फ्रेड पी. स्लोन यांचा जन्म. (मृत्यू: १७ फेब्रुवारी १९६६)
  • १८९६: जुन्या जमान्यातील रंगभूमीवरील श्रेष्ठ संगीत समीक्षक केशवराव भोळे यांचा जन्म.
  • १९१८: इंग्लिश क्रिकेटपटू डेनिस कॉम्पटन यांचा जन्म. (मृत्यू: २३ एप्रिल १९९७)
  • १९१९: जयपूरच्या राजमाता महाराणी गायत्रीदेवी यांचा जन्म. (मृत्यू: २९ जुलै २००९)
  • १९२२: प्रख्यात भारतीय उपखंडातील इतिहासकार रणजीत गुहा यांचा जन्मदिन.
  • १९२६: मार्क्सवादी कम्युनिस्ट नेते पी. गोविंद पिल्लई यांचा जन्म. (मृत्यू: २२ नोव्हेंबर २०१२)
  • १९२६: भारतीय बिशप बॅसिल साळदादोर डिसोझा यांचा जन्म. (मृत्यू: ५ सप्टेंबर १९९६)
  • १९३३: मुद्रितशोधन तज्ञ मोहन वेल्हाळ यांचा जन्म.
  • १९४३: पटकथालेखक आणि दिग्दर्शक कोवेलमूडी राघवेंद्र राव यांचा जन्म.
  • १९४५: भारतीय दिग्दर्शक, पटकथालेखक आणि लेखक पद्मराजन यांचा जन्म.(मृत्यू: २४ जानेवारी १९९१)
  • १९४८: पद्मभूषण पुरस्कार सन्मानित माजी सेवानिवृत्त भारतीय प्रशासकीय सेवेचे अधिकारी आणि भारताचे माजी नियंत्रक आणि महालेखा परीक्षक विनोद राय यांचा जन्मदिन.
  • १९५१: रशियन बुद्धीबळपटू अनातोली कार्पोव्ह यांचा जन्म.
  • १९६५: वूर्केरी रामन, भारतीय क्रिकेट खेळाडू.

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
  • १८५७: ऑगस्टिन लुई कॉशि, फ्रेंच गणितज्ञ. (जन्म: २१ ऑगस्ट १७८९)
  • १९०६: नॉर्वेजियन नाटककार, दिग्दर्शक आणि कवी हेन्‍रिक इब्सेन यांचे निधन. (जन्म: २० मार्च १८२८)
  • १९३०: प्रख्यात भारतीय पुरातत्व व संग्रहालय तज्ञ तसचं, बनारस हिंदू विद्यापीठातील प्राचीन भारतीय इतिहास आणि संस्कृतीचे प्राध्यापक राखालदास बंडोपाध्याय उर्फ जे. आर. डी. बनर्जी यांचे निधन.
  • १९३७: रॉकफेलर घराण्यातील पहिले उद्योगपती, स्टँडर्ड ऑईल उद्योगसमूह व अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांतील पहिल्या तेल उद्योगाचे संस्थापक जॉन डेव्हिसन रॉकफेलर यांचे निधन. (जन्म: ८ जुलै १८३९)
  • १९६०: निऑन लाईट चे निर्माते जॉर्ज क्लोडे यांचे निधन. (जन्म: २४ सप्टेंबर १८७०)
  • १९७५: भारतीय सैन्यातील ले. जनरल व व्हिक्टोरिया क्रॉस मिळविणाअरे पहिले ले. जनरल पी. एस. बापट यांचे निधन.
  • १९३४: क्लाईड बॅरो, अमेरिकन दरोडेखोर.
  • २०१०: भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या संस्थापक सदस्यांपैकी एक व भारतीय नक्षलवादी आंदोलनाचे जनक कानू सन्याल यांचे निधन.
  • २०१०: राष्ट्रीय पुरस्कार सन्मानित प्रसिद्ध भारतीय तेलगु भाषिक चित्रपट गायिका वेतुरी सुंदरम्मा मूर्ती यांचे निधन.
  • २०१४: भारतीय क्रिकेटर माधव मंत्री यांचे निधन. (जन्म: १ सप्टेंबर १९२१)
  • २०१४: भारतीय संगीतकार आणि दिग्दर्शक आनंद मोडक यांचे निधन. (जन्म: १३ मे १९५१)


दररोजच्या अपडेट्स साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.

 

Facebook Comments Box

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search