Metro Line14: मुंबई मेट्रोचा अंबरनाथ-बदलापूर पर्यंत विस्तार होणार; असा असेल मार्ग

   Follow us on        
Metro Line14: अंबरनाथ -बदलापूर लोकल प्रवाशांसाठी  एक दिलासा देणारी बातमी आहे. मुंबई मेट्रोचा विस्तार करण्यात येणार असून मेट्रो थेट बदलापूरपर्यंत धावणार आहे. कांजूरमार्ग ते बदलापूर या मेट्रो लाईन 14 च्या संदर्भात आता एक नवीन अपडेट समोर आली आहे.
एमएमआरडीएने कांजूरमार्ग ते बदलापूर या मेट्रो 14 मार्गाच्या कामासाठी पाऊल टाकले आहे. या मेट्रो 14 मार्गिकेच्या कामासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून महिन्या अखेरपर्यंत टेंडर काढण्यात येणार आहेत. पीपीपी म्हणजेच सार्वजनिक – खाजगी भागीदारी तत्त्वावर ही मेट्रो मार्गिका उभारण्यात येणार आहे. सुरुवातीला मेट्रोच्या कामासाठी पीपीपी तत्त्वावर उभारणीसाठी इच्छुक कंपन्यांकडून टेंडर मागवण्यात येणार आहेत.
कसा असेल कांजूरमार्ग – बदलापूर मार्ग?
  • मेट्रो 14 ही कांजूरमार्ग ते बदलापूर या मार्गावर धावणार आहे.
  • हा मार्ग एकूण 38 किलोमीटर लांबीचा असणार आहे
  • कांजूरमार्ग ते बदलापूर या मेट्रो 14 मार्गावर एकूण 15 स्थानके असणार आहेत
  • मेट्रो 14 चा मार्ग हा कांजूरमार्ग – घणसोली – महापे – अंबरनाथ – बदलापूर असा असणार आहे.
  • हा मार्ग घणसोलीपर्यंत भूमिगत असणार आहे. ठाण्यातील खाडी खालून ही मेट्रो धावणार आहे.
  • घणसोली ते बदलापूर हा उन्नत मार्ग असणार आहे.
  • या मार्गावरील 4.38 किलोमीटर लांबीचा मार्ग हा पारसिक हिल येथून जाणार आहे.
  • कांजूरमार्ग – बदलापूर या मेट्रो 14 प्रकल्पाचा अंदाजे खर्च 18 हजार कोटी रुपयांच्या घरात आहे.
  • या प्रकल्पाच्या उभारणीसाठी जवळपास 75 हेक्टर जमीन व्यावसायिक वापरासाठी लागणार आहे.
  • हा मेट्रो मार्ग ठाणे खाडी, पारसिक हिल आणि फ्लेमिंगो अभयारण्याच्या क्षेत्रातून जाणार आहे.
मेट्रो मार्गामुळे पर्यावरणावर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास करण्यासाटी एमएमआरडीएन यापूर्वीच सल्लागार नेमण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. कंत्राटदाराची नियुक्ती होईपर्यंत पर्यावरण मंजुरीची प्रक्रिया पूर्ण करण्याचा एमएमआरडीएचा प्रयत्न असणार आहे.
Facebook Comments Box

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search