०२ जुलै पंचांग आणि दिनविशेष

आजचे पंचांग

  • तिथि-सप्तमी – 12:00:41 पर्यंत
  • नक्षत्र-उत्तरा फाल्गुनी – 11:07:59 पर्यंत
  • करण-वणिज – 12:00:41 पर्यंत, विष्टि – 25:01:42 पर्यंत
  • पक्ष-शुक्ल
  • योग-वरियान – 17:45:59 पर्यंत
  • वार-बुधवार
  • सूर्योदय-06:04:33
  • सूर्यास्त-19:20:06
  • चन्द्र राशि-कन्या
  • चंद्रोदय-12:16:59
  • चंद्रास्त-24:22:59
  • ऋतु-वर्षा

जागतिक दिन :

  • जागतिक ट्यूटर (शिक्षक) दिन
  • जागतिक UFO दिवस

महत्त्वाच्या घटना :

  • 1698 : थॉमस सेव्हरीने पहिले स्टीम इंजिन पेटंट केले.
  • 1850 : बेंजामिन लेन या शास्त्रज्ञाला गॅस मास्कचे पेटंट मिळाले.
  • 1865 : सॅल्व्हेशन आर्मी या सेवाभावी संस्थेची स्थापना झाली.
  • 1962 : रॉजर्स, आर्कान्सा येथे पहिले वॉल-मार्ट स्टोअर उघडले.
  • 1972 : पंतप्रधान इंदिरा गांधी आणि पाकिस्तानचे पंतप्रधान झुल्फिकार अली भुट्टो यांनी सिमला करारावर स्वाक्षरी केली.
  • 1983 : कल्पक्कम, तामिळनाडू येथे अणुऊर्जा केंद्र कार्यान्वित झाले.
  • 1994 : चित्रकार जगदीश स्वामीनाथन यांची मध्य प्रदेश सरकारने कालिदास सन्मानासाठी निवड केली.
  • 2001 : बिहारमधील चंपारण्य जिल्ह्यातील केसरिया गावात 104 फूट उंचीचा जगातील सर्वात मोठा बौद्ध स्तूप सापडला.
  • 2002 : स्टीव्ह फॉसेट हा गरम हवेच्या फुग्यातून पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालणारा पहिला व्यक्ती ठरला.
  • 2004 : युनेस्कोच्या जागतिक वारसा समितीने मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकाचा जागतिक वारसा स्थळ म्हणून समावेश केला.
  • 2013 : इंटरनॅशनल ॲस्ट्रॉनॉमिकल युनियन द्वारे प्लूटोच्या चौथ्या आणि पाचव्या चंद्रांना, कर्बेरोस आणि स्टायक्स, नाव देण्यात आले.

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

  • 1862 : ‘विल्यम हेन्री ब्रॅग’ – नोबेल पारितोषिक विजेते इंग्लिश भौतिकशास्त्रज्ञ यांचा जन्म.
  • 1877 : ‘हेर्मान हेस’ – नोबेल पारितोषिक विजेते जर्मन लेखक यांचा जन्म.
  • 1880 : ‘गणेश गोविंद बोडस’ – श्रेष्ठ गायक यांचा शेवगाव, अहमदनगर येथे जन्म. (मृत्यू: 23 डिसेंबर 1965)
  • 1904 : ‘रेने लॅकॉस्ता’ – फ्रेंच लॉन टेनिस खेळाडू आणि पोलो टी शर्टचे जनक यांचा जन्म. (मृत्यू: 12 ऑक्टोबर 1996)
  • 1906 : ‘बेटे हान्स आल्ब्रेख्ट’ – नोबल पुरस्कार विजेते अमेरिकन भौतिकीतज्ञ यांचा जन्म.
  • 1922 : ‘पिअर कार्डिन’ – फ्रेन्च फॅशन डिझायनर यांचा जन्म.
  • 1923 : ‘जवाहरलालजी दर्डा’ – लोकमत चे संस्थापक, संपादक, माजी मंत्री व स्वातंत्र्य सेनानी यांचा जन्म.
  • 1925 : ‘पॅट्रिक लुमूंबा’ – काँगोचे पहिले पंतप्रधान यांचा जन्म. (मृत्यू : 17 जानेवारी 1961)
  • 1926 : ‘विनायक आदिनाथ बुवा’ – विनोदी लेखक यांचा जन्म.
  • 1930 : ‘कार्लोस मेनेम’ – अर्जेंटिनाचे राष्ट्राध्यक्ष यांचा जन्म.

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

  • 1566 : ‘नॉस्ट्रॅडॅमस’ – जगप्रसिद्ध फ्रेंच भविष्यवेत्ता यांचे निधन. (जन्म : 14 डिसेंबर 1503)
  • 1778 : ‘रुसो’ – फ्रेंच विचारवंत, लेखक आणि संगीतकार यांचे निधन. (जन्म : 28 जून 1712)
  • 1843 : ‘डॉ. सॅम्यूअल हानेमान’ – होमिओपाथी या वैद्यकीय उपचारपद्धतीचे जनक याचं निधन. (जन्म : 10 एप्रिल 1755)
  • 1950 : ‘युसूफ मेहेर अली’ – समाजवादी नेते, स्वातंत्र्यसैनिक यांचे निधन. (जन्म : 23 सप्टेंबर 1903)
  • 1961 : ‘अर्नेस्ट हेमिंग्वे’ – नोबेल पारितोषिक विजेते अमेरिकन लेखक यांचे निधन. (जन्म : 21 जुलै 1899)
  • 1999 : ‘मारिओ पुझो’ – अमेरिकन लेखक यांचे निधन. (जन्म : 15 ऑक्टोबर 1920)
  • 2007 : ‘दिलीप सरदेसाई’ – क्रिकेटपटू यांचे निधन. (जन्म : 8 ऑगस्ट 1940)
  • 2011 : ‘चतुरनन मिश्रा’ – कम्युनिस्ट नेते यांचे निधन. (जन्म : 7 एप्रिल 1925)
  • 2013 : ‘डगलस एंगलबर्ट’ – कॉम्पुटर माउस चे शोधक यांचे निधन. (जन्म : 30 जानेवारी 1925)
  • 2018 : ‘ऍडमिरल जयंत नाडकर्णी’ – परम विशिष्ट सेवा पदक, भारताचे 14वे नौसेनाप्रमुख यांचे निधन. (जन्म : 5 डिसेंबर 1931)

दररोजच्या अपडेट्स साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.
Facebook Comments Box

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search