आजचे पंचांग
- तिथि-अष्टमी – 14:08:45 पर्यंत
- नक्षत्र-हस्त – 13:51:00 पर्यंत
- करण-भाव – 14:08:45 पर्यंत, बालव – 27:20:02 पर्यंत
- पक्ष- शुक्ल
- योग-परिघ – 18:34:54 पर्यंत
- वार- गुरूवार
- सूर्योदय- 06:04:52
- सूर्यास्त- 19:20:09
- चन्द्र-राशि-कन्या – 27:19:34 पर्यंत
- चंद्रोदय- 13:03:59
- चंद्रास्त- 24:53:59
- ऋतु- वर्षा
जागतिक दिन :
- आंतरराष्ट्रीय प्लास्टिक पिशवी मुक्त दिवस
महत्त्वाच्या घटना :
- 1608 : सॅम्युअल बी. चॅम्पलेनने कॅनडातील क्विबेक शहराची स्थापना केली.
- 1850 : ईस्ट इंडिया कंपनीच्या अध्यक्षांनी भारतातून आणलेला कोहिनूर हिरा इंग्लंडच्या राणीला सुपूर्द केला.
- 1852 : महात्मा फुले यांनी दलित मुलांसाठी पहिली शाळा उघडली.
- 1855 : भारतात कायदे शिक्षणाचा प्रारंभ झाला.
- 1884 : शेअर मार्केट मध्ये डाऊ जोन्स इंडेक्स लाँच झाला.
- 1886 : जर्मनीच्या कार्ल बेंझने यांनी जगातील पहिली मोटारगाडी बनवली.
- 1890 : ओहायो हे अमेरिकेचे 43 वे राज्य बनले.
- 1928 : लंडनमध्ये पहिला रंगीत दूरदर्शन कार्यक्रम प्रसारित झाला.
- 1938 : मॅलार्ड स्टीम इंजिन 202 किमी प्रतितास वेगाने धावले. वाफेच्या इंजिनाचा विक्रम अजूनही आहे.
- 1962 : फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांनी अल्जेरियाच्या स्वातंत्र्याची घोषणा केली.
- 1998 : कवी प्रदीप यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर.
- 2000 : विमानवाहू युद्धनौका विक्रांतचे मुंबईच्या समुद्रातील सागरी संग्रहालयात रूपांतर करण्यास मान्यता.
- 2001 : सुधीर फडके यांना राज्य सरकारचा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार जाहीर झाला.
- 2006 : एक्स. पी. 14 हा लघुग्रह पृथ्वीच्या अगदी जवळून गेला.
- जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
- 1683 : ‘एडवर्ड यंग’ – इंग्लिश कवी यांचे जन्म.
- 1838 : ‘मामा परमानंद’ – पत्रकार, प्रार्थना समाजाचे एक संस्थापक यांचा जन्म. (मृत्यू: 13 सप्टेंबर 1893)
- 1886 : ‘रामचंद्र दत्तात्रय रानडे’ – आधुनिक विद्याविभूषित तत्त्वज्ञ व संत, फर्ग्युसन व विलींग्डन महाविद्यालयातील तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक यांचा जन्म. (मृत्यू: 6 जून 1957)
- 1909 : ‘बॅरिस्टर व्ही. एम. तारकुंडे’ – कायदेपंडित, स्वातंत्र्यसैनिक, मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश व सर्वोच्च न्यायालयात सामाजिक समस्यांसाठी लढा देणारे झुंजार कायदेतज्ञ यांचा जन्म. (मृत्यू: 22 मार्च 2004)
- 1912 : ‘श्रीपाद गोविंद नेवरेकर’ – मराठी रंगभूमीवरील लोकप्रिय गायक व नट यांचा जन्म. (मृत्यू : 16 जून 1977)
- 1914 : ‘दत्तात्रय गणेश गोडसे’ – इतिहासकार, नाटककार, कलादिग्दर्शक, वेशभूषाकार आणि नेपथ्यकार यांचा जन्म. (मृत्यू : 5 जानेवारी 1992)
- 1918 : ‘व्ही. रंगारा राव’ – भारतीय अभिनेते, दिग्दर्शक आणि निर्माते यांचा जन्म. (मृत्यू : 18 जुलै 1974)
- 1924 : ‘सेल्लप्पन रामनाथन’ – तामीळवंशीय राजकारणी, सिंगापूरच्या प्रजासत्ताकाचे 6वे राष्ट्राध्यक्ष यांचा जन्म.
- 1924 : ‘अर्जुन नायडू’ – भारतीय क्रिकेटपटू यांचा जन्म.
- 1926 : ‘सुनीता देशपांडे’ – लेखिका स्वातंत्र्य सैनिक यांचा जन्म. (मृत्यू : 7 नोव्हेंबर 2009)
- 1951 : ‘सररिचर्ड हॅडली’ – न्यूझीलंडचा क्रिकेट खेळाडू यांचा जन्म.
- 1952 : ‘अमित कुमार’ – भारतीय गायक यांचा जन्म.
- 1952 : ‘रोहिनटन मिस्त्री’ – भारतीय कॅनेडियन लेखक यांचा जन्म.
- 1962 : ‘टॉम क्रूझ’ – प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेता यांचा जन्म.
- 1971 : ‘ज्युलियन असांज’ – विकीलीक्स चे संस्थापक यांचा जन्म.
- 1976 : ‘हेन्री ओलोंगा’ – झिम्बाब्वेचे क्रिकेटपटू यांचा जन्म.
- 1980 : ‘हरभजन सिंग’ – भारतीय क्रिकेटपटू यांचा जन्म.
- 1984 : ‘भारती सिंग’ – भारतीय विनोदी कलाकार यांचा जन्म.
- मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
- 1350 : ‘संत नामदेव’ – यांनी समाधी घेतली. (जन्म : 29 ऑक्टोबर 1270)
- 1933 : ‘हिपोलितो य्रिगोयेन’ – अर्जेंटिनाचे राष्ट्राध्यक्ष यांचे निधन. (जम : 12 जुलै 1852)
- 1935 : ‘आंद्रे सीट्रोएन’ – सिट्रोएन कंपनीचे संस्थापक यांचे निधन. (जन्म : 5 फेब्रुवारी 1878)
- 1969 : ‘ब्रायन जोन्स’ – द रोलिंग स्टोन्सचे संस्थापक, गिटार, हार्मोनिका आणि पियानो वादक यांचे निधन. (जन्म : 28 फेब्रुवारी 1942)
- 1996 : ‘राजकुमार’ – हिंदी चित्रपट अभिनेता यांचे निधन. (जन्म : 8 ऑक्टोबर 1926)
दररोजच्या अपडेट्स साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.
Facebook Comments Box