



Mumbai Local: मध्य रेल्वेने मुंबई लोकलमध्ये प्रथमच ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष डबा सुरू केला. ही पहिली सेवा आज, दिनांक १०.०७.२०२५ रोजी, दुपारी ३:४५ वाजता सीएसएमटी–डोंबिवली लोकलने सुरू झाली. ज्येष्ठ नागरिकांसाठी प्रवास अधिक आरामदायक आणि सुलभ करण्याच्या दृष्टीने हे पाऊल उचलण्यात आले आहे.
वाढीव आसनव्यवस्था, सुरक्षेची अधिक व्यवस्था आणि आकर्षक देखणं सजावट असलेला हा खास डबा आता सर्व लोकल गाड्यांना जोडण्यात येणार आहे. हा डबा केवळ ज्येष्ठ नागरिकांसाठी आरक्षित आहे, ज्यामुळे त्यांना गर्दीतून थोडा दिलासा मिळेल. आसने मऊ असून, वयोवृद्ध प्रवाशांच्या सोयीसाठी खास डिझाइन करण्यात आली आहेत. हँडरेल, सुरक्षिततेसाठी कॅमेरे, तसेच प्रभावी प्रकाश व्यवस्था उपलब्ध आहे. डब्याची सजावट सौंदर्यपूर्ण आणि आरामदायक ठेवण्यात आली आहे, जेणेकरून प्रवास अधिक सुखद होईल.
हे डबे एमयूएम लोकल रेकमध्ये हळूहळू इतर गाड्यांमध्येही समाविष्ट केले जाणार आहेत. जेणेकरून ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या डब्यात सुरक्षित आणि सन्मानाने प्रवास करता येईल.
🚆 Central Railway launches Mumbai local’s 1st senior citizen coach!
A dedicated compartment with enhanced seating, safety & aesthetics now onboard EMU rake.
The first journey begins with the 3:45 PM CSMT–Dombivli local today i.e 10.07.2025, offering added comfort and ease of… pic.twitter.com/FLPgbrii5d
— Central Railway (@Central_Railway) July 10, 2025