Vande Bharat Express: मुंबई-नांदेड वंदे भारत एक्सप्रेस मुहूर्त ठरला

No block ID is set

Vande Bharat Express: नांदेडकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे. लवकरच मुंबई ते नांदेड या मार्गावर वंदे भारत एक्स्प्रेस सुरू होणार आहे. पुढील महिन्यापासून मुंबई ते नांदेड असा प्रवास करता येणार आहे. काँग्रेसमधून भाजपमध्ये गेलेले अशोक चव्हाण यांनी यासंदर्भात ट्विट करून माहिती दिली आहे. ही ट्रेन मुंबई ते नांदेडदरम्यान (Mumbai to Nanded) 771 किलोमीटरचं अंतर तब्बल 8 तासात पूर्ण करणार असल्याची माहिती आहे.

मुंबई-नांदेड वंदे भारत एक्सप्रेस मुहूर्त ठरला असून 26 ऑगस्ट 2025 पासून ही एक्स्प्रेस सुरू होणार आहे. दरम्यान मुंबई-नांदेड वंदे भारत एक्स्प्रेसच्या स्वागतासाठी नांदेडकर सज्ज झाले असल्याचं अशोक चव्हाण यांनी ट्विट केलं आहे. याशिवाय त्यां मोदी सरकारचे आभारही मानले.

Facebook Comments Box

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search