१७ जुलै पंचांग आणि दिनविशेष


आजचे पंचांग

  • तिथि-सप्तमी – 19:11:32 पर्यंत
  • नक्षत्र-रेवती – 27:39:56 पर्यंत
  • करण-विष्टि – 08:09:53 पर्यंत, भाव – 19:11:32 पर्यंत
  • पक्ष- कृष्ण
  • योग-अतिगंड – 09:28:34 पर्यंत
  • वार- गुरूवार
  • सूर्योदय- 06:12
  • सूर्यास्त- 19:17
  • चन्द्र-राशि-मीन – 27:39:56 पर्यंत
  • चंद्रोदय- 23:56:59
  • चंद्रास्त- 11:58:59
  • ऋतु- वर्षा

जागतिक दिन :

  • जागतिक इमोजी दिवस
  • आंतरराष्ट्रीय न्यायासाठी जागतिक दिवस

महत्त्वाच्या घटना :

  • 1802 : मोडी लिपीत पहिली छपाई.
  • 1819 : ॲडम्स-ओनिस करारानुसार, अमेरिकेने फ्लोरिडा राज्य स्पेनकडून $5 दशलक्षला विकत घेतले.
  • 1841 : सुप्रसिद्ध विनोदी साप्ताहिक ‘पंच’ चा पहिला अंक प्रकाशित झाला.
  • 1917 : किंग जॉर्ज (V) यांनी फतवा जारी केला की त्यांच्या वंशातील सर्व पुरुष सदस्य विंडसर हे आडनाव घेतील.
  • 1947 : मुंबईहून रेवसला जाणारी रामदास ही नौका उलटून सुमारे 700 जणांना जीव गमवावा लागला.
  • 1955 : वॉल्ट डिस्नेने कॅलिफोर्नियामध्ये डिस्नेलँड उघडले.
  • 1975 : अमेरिकेची अपोलो आणि रशियाची सोयुझ ही दोन अंतराळयानांद्वारे जोडली गेली.
  • 1976 : मॉन्ट्रियल, कॅनडात 21व्या ऑलिंपिक खेळांना सुरुवात झाली.
  • 1993 : ज्येष्ठ विचारवंत तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांना तेलुगू भाषेतील तेलुगु थल्ली पुरस्कार.
  • 1994 : धूमकेतू शुमाकर लेव्ही-9 चा पहिला तुकडा गुरू ग्रहाशी टक्कर झाला.
  • 1994 : विश्वचषक अंतिम फेरीत ब्राझीलने इटलीचा पेनल्टी शूटआऊटमध्ये पराभव केला.
  • 1996 : मद्रास म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शहराचे अधिकृतपणे चेन्नई असे नामकरण करण्यात आले
  • 2000 : अभिनेत्री नृत्यांगना वैजयंतीमाला बाली यांना भरतनाट्यम शिखरमणी पुरस्कार जाहीर.
  • 2004 : तामिळनाडूच्या कुंभकोणम गावात एका शाळेला आग लागून 90 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला.
  • 2006 : फ्लोरिडामधील केप कॅनवेरल स्पेस सेंटरमध्ये 13 दिवसांचा अंतराळ प्रवास पूर्ण केल्यानंतर डिस्कव्हरी अंतराळयान पृथ्वीवर सुरक्षितपणे उतरले.

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

  • 1889 : ‘अर्लस्टॅनले गार्डनर’ – अमेरिकन लेखक यांचा जन्म. (मृत्यू: 11 मार्च 1970)
  • 1917 : ‘बिजोन भट्टाचार्य’ – भारतीय अभिनेते, गायक आणि पटकथालेखक यांचा जन्म. (मृत्यू: 19 जानेवारी 1978)
  • 1918 : ‘कार्लोसमनुएल अराना ओसोरिया’ – ग्वाटेमालाचा राष्ट्राध्यक्ष यांचा जन्म.
  • 1919 : ‘स्नेहल भाटकर’ – संगीतकार यांचा जन्म. (मृत्यू: 29 मे 2007)
  • 1923 : ‘जॉन कूपर’ – कूपर कार कंपनी चे सहसंस्थापक यांचा जन्म. (मृत्यू: 24 डिसेंबर 2000)
  • 1930 : ‘बाबूराव बागूल’ – दलित साहित्यिक यांचा जन्म. (मृत्यू: 26 मार्च 2008)
  • 1954 : ‘अँजेला मेर्केल’ – जर्मनीच्या चॅन्सेलर यांचा जन्म.
  • 1957 : ‘ॲडमिरल सुनील लांबा’ – निवृत्त भारतीय नौदल अधिकारी, भारतीय नौदलाचे 23 वे नौदल प्रमुख यांचा जन्म.

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

  • 1790 : ‘अ‍ॅडम स्मिथ’ – स्कॉटिश अर्थशास्त्रज्ञ आणि तत्त्ववेत्ता यांचे निधन. (जन्म: 5 जून 1723)
  • 1992 : ‘शांता हुबळीकर’ – अभिनेत्री यांचे निधन. (जन्म : 14 एप्रिल 1914)
  • 1992 : ‘कानन देवी’ – बंगाली हिंदी चित्रपटातील अभिनेत्री आणि गायिका यांचे निधन. (जन्म: 22 एप्रिल 1916)
  • 2005 : ‘सर एडवर्ड हीथ’ – युनायटेड किंग्डमचे पंतप्रधान यांचे निधन.
  • 2012 : ‘मृणाल गोरे’ – समाजवादी नेत्या आणि 6 व्या लोकसभेच्या सदस्य यांचे निधन. (जन्म: 24 जून 1928)
  • 2012 : ‘मार्शा सिंह’ – भारतीय-इंग्रजी राजकारणी यांचे निधन. (जन्म: 11 ऑक्टोबर 1954)
  • 2020 : ‘सी.एस. शेषाद्री’ – पद्म भूषण, शांती स्वरूप भटनागर पुरस्कार, भारतीय गणितज्ञ यांचे निधन. (जन्म: 29 फेब्रुवारी 1932)

दररोजच्या अपडेट्स साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.
Facebook Comments Box

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search