Konkan Railway: गणेशोत्सव विशेष गाड्यांच्या नियोजनात अनेक त्रुटी; रेल्वे प्रवासी समितीने वेधले लक्ष

   Follow us on        

Konkan Railway: मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वेने कोकण रेल्वेमार्गावर सोडलेल्या गणपती विशेष गाड्यांची यादी प्रसिद्ध झाली. ही प्रवाशांना दिलासा देणारी बाब असली तरी या नियोजनात काही त्रुटी आढळून आल्या आहेत. यामुळे प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागणार आहे. तरी, आपण याकडे लक्ष देऊन आणखी गणपती विशेष गाड्या सोडताना काही गोष्टींचा विचार करावा अशी विनंती अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समितीतर्फे एका निवेदनातून करण्यात आली आहे. 

या निवेदनात समिती लिहिते….  

१. पुण्यातून सावंतवाडीसाठी एकही गाडी नाही. मध्य रेल्वेच्या पुणे विभागाला कोंकणाचे वावडे?

यंदा मध्य रेल्वे तर्फे २५० गणपती विशेष फेऱ्यांचे नियोजन करण्यात आले आहे. या मध्ये पुणे विभागातून केवळ १२ फेऱ्यांचे नियोजन करण्यात आले आहे. ह्या १२ फेऱ्याही केवळ रत्नागिरीपर्यंतच असल्याने रत्नागिरी पुढे प्रवास करणाऱ्या प्रवाशांना अद्यापही पुण्याहून आपल्या गावी जायला थेट रेल्वेगाडीची सोय नाही.

मात्र ह्याच पुणे विभागाने एप्रिल,मे,जून ह्या दरम्यान उन्हाळी विशेष गाड्या म्हणून दानापूर, गोरखपूर, बनारस,गाझीपूर,जयपूर येथे तब्बल १९२ फेऱ्या चालवल्या होत्या. ह्यात अधोरेखित करणारी गोष्ट म्हणजे ह्या सगळ्या फेऱ्या ह्या महाराष्ट्रात नसून इतर राज्यात जाणाऱ्या आहेत. जर ह्या फेऱ्या ३ महिन्यांपूर्वी चालवल्या जात होत्या तर मग आताच पुणे विभागाकडे विशेष गाड्या चालवण्याची क्षमता नाही का असा प्रश्न उपस्थित होतो.

२. ⁠चिपळूणसाठी फक्त ८ डब्यांची मेमू. संपूर्ण अनारक्षित गाडीचा फायदा केवळ गाडी सुटण्याच्या स्थानकातील प्रवाशांनाच होतो; त्यापुढील स्थानकांत गाडीत चढताच येत नाही.

येत्या गणेशोत्सवात सोडलेली ०११५५/०११५६ दिवा चिपळूण दिवा मेमू म्हणजे कोकणवासीयांच्या तोंडाला पाने पुसण्याचा प्रकार आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिन्स किंवा दादर येथूनच चिपळूणकरिता विशेष गाडी सोडण्याची आवश्यकत

चिपळूण गाडी दादर आणि ठाण्याला थांबलीच पाहिजे. अन्यथा एवढ्या कमी अंतराच्या प्रवासासाठी गिरगाव, लालबाग, परळ, दादर, माहिम, वरळी, अंधेरी, सांताक्रुज, बोरिवली, कांदिवली, भाईंदर, विरार, वसई, घाटकोपर, भांडुप, ठाणे परिसरातील प्रवासी दिवा किंवा पनवेलला गाडी बदलण्यास उत्सुक नसतात. अति गर्दीचे दिवस वगळता लोक या दिवा किंवा पनवेल गाडीने जाणे टाळतात. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस किंवा दादरहून सुटल्यास चिपळूण गाडी वर्षभर गर्दीने भरून धावेल.

 संपूर्ण अनारक्षित गाडीत असल्यामुळे वेळेत प्रवासाचे नियोजन करणाऱ्यांना रेल्वेने आगाऊ आरक्षण करण्याचा पर्यायच दिलेला नाही. संपूर्ण अनारक्षित गाडी सुरुवातीच्या स्थानकातच पूर्णपणे भरत असल्यामुळे त्यापुढील स्थानकांतील प्रवाशांना या गाडीत जागा मिळत नाही. इतर स्थानकांवर केवळ गाड्यांची संख्या वाढलेली दिसते. त्याचा प्रवाशांना प्रत्यक्ष फायदा होत नाही. याउलट किमान काही आरक्षित डबे उपलब्ध असल्यास प्रवाशांना आपल्या जागेबाबत हमी मिळू शकते.

तसेच, ही दिलेली गाडीही केवळ आठ डब्यांची मेमू आहे. मुंबई ते कल्याण या ५५ किमीच्या मार्गावरही १२ डब्यांच्या गाड्या कमी पडत असून १५ किंवा १८ डब्यांची मागणी होत असताना दिवा चिपळूण या २३३ किमीसाठी भर गणेशोत्सवाच्या गर्दीच्या दिवसांत ८ डब्यांची गाडी देण्याची कल्पनाच चुकीची आहे. तसेच, खालील सीटच्या वरील भागात बसण्याची सोय नसणे तसेच, प्रत्येकी चार डब्यांमध्ये एक मोटार कोच असल्यामुळे मेमूची प्रवासी वहन क्षमता सामान्य गाडीपेक्षा ५०% कमी असते.

तरी, मध्य रेल्वेने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस किंवा दादर येथूनच चिपळूणकरिता सामान्य द्वितीय श्रेणी आरक्षित, एसी चेअर कार तसेच सामान्य अनारक्षित डबे असलेली विशेष गाडी सोडावी. तसेच, ८ किंवा १२ डब्यांच्या मेमू न चालवता २२ डब्यांच्या गाड्याच चालवाव्यात.

३. ⁠गुजरातहून सावंतवाडीकरिता एकही गाडी नाही.

पश्चिम रेल्वेने गुजरातहून सोडलेल्या गाड्यांपैकी एकही गाडी सावंतवाडीपर्यंत जात नसल्यामुळे सध्या गुजरातमधील अहमदाबाद, वडोदरा, सुरत, वापी, तर पालघर जिल्ह्यातील डहाणू, बोईसर, पालघर विभागात राहणाऱ्या कोकणवासीयांना रत्नागिरी जिल्ह्याचा दक्षिण भाग व सिंधुदुर्ग जिल्ह्यात जाण्यासाठी एकही गणपती विशेष गाडी उपलब्ध नाही. तरी, पश्चिम रेल्वेने अहमदाबाद येथून सावंतवाडी किंवा पेडणेपर्यंत एखादी विशेष गाडी सोडण्याची आवश्यकता आहे.

४. मध्य रेल्वेतर्फे द्वितीय श्रेणी आरक्षित आणि एसी चेअर कार प्रकारातील एकही गाडी नाही

सर्व विशेष गाड्या विशेष दरांवर चालवल्या जात असल्यामुळे स्लीपर प्रकारातील डब्यांसाठी किमान ५०० किलोमीटरचे भाडे द्यावे लागते. त्यामुळे पेण, रोहा, माणगाव, वीर, खेड अशा मुंबईपासून तुलनेने कमी अंतरावरील ठिकाणी जाण्यासाठी प्रवाशांना दुपटीहून अधिक भाडे द्यावे लागते. उदा. ठाणे ते खेड प्रवासासाठी स्लीपर डब्याला सामान्य गाडीला प्रति प्रवासी १८५ रुपये आणि एसी थ्री टायरसाठी ५१५ रुपये भाडे असते तर विशेष गाडीला हेच भाडे स्लीपरला ३९० तर एसी थ्री टायरला १०६० रुपये द्यावे लागतात. हे नियमित गाडीपेक्षा दुपटीपेक्षा अधिक आहे.

म्हणूनच, दिवसा धावणाऱ्या सर्व गाडयांना सीटिंग आणि एसी चेअर कार डबे असावेत किंवा स्लीपर डबे सीटिंग म्हणून आणि एसी थ्री टायर डबे एसी चेअर कार म्हणून वापरावेत.

५. मुंबई सेंट्रल सावंतवाडी रोड विशेष गाडीच्या वारंवारतेत मागील वर्षीपेक्षा कपात 

मागील वर्षी पश्चिम रेल्वेने मुंबई सेंट्रल सावंतवाडी विशेष गाडी आठवड्यातून सहा दिवस सोडली होती. यावर्षी त्यात कपात करून ही गाडी आठवड्यातून केवळ चार दिवस सोडलेली आहे. परराज्यात भरभरून गाड्या सोडणाऱ्या पश्चिम रेल्वेला महाराष्ट्रात गाड्या सोडण्यासाठी साधनसंपत्ती (डबे, इंजिन, पिटलाईन,ई.) उपलब्ध नाही का असा प्रश्न उपस्थित होतो. तरी, पश्चिम रेल्वे मुंबई विभागाने आणखी काही गाड्यांची व्यवस्था करावी. 

६. मागील वर्षी खेड येथून सोडलेल्या गाड्या केवळ पनवेल पर्यंतच होत्या. त्या ऐवजी या गाड्या मध्य रेल्वेवर दादर किंवा पश्चिम रेल्वेवर वसई रोड पर्यंत चालवाव्यात.

वरील निवेदन समितीचे सचिव अक्षय सरोज मधुकर महापदी यांनी संबधित रेल्वे कार्यालये आणि अधिकार्‍यांना पाठवले आहे. 

Facebook Comments Box

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search