



मुंबई | ५ ऑगस्ट २०२५
रक्षाबंधन व स्वातंत्र्यदिनाच्या काळात प्रवाशांची होणारी वाढती गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने प्रवाशांच्या सोयीसाठी एकूण १८ विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. या गाड्या मुंबई, पुणे, नागपूर, कोल्हापूर आणि मडगाव या मार्गांवर धावणार आहेत. विशेषतः दीर्घ सुट्टीत प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी हा निर्णय उपयुक्त ठरणार आहे.
. या विशेष गाड्या खालील मार्गांवर धावणार आहेत:
- सीएसएमटी (मुंबई) ते नागपूर – सहा (६) फेऱ्या
- एलटीटी (मुंबई) ते मडगाव – चार (४) फेऱ्या
- सीएसएमटी (मुंबई) ते कोल्हापूर – दोन (२) फेऱ्या
- पुणे ते नागपूर – सहा (६) फेऱ्या
विशेष गाड्यांचा तपशील:
१) सीएसएमटी – नागपूर (दोन [२] फेऱ्या):
०११२३ विशेष गाडी ०९ ऑगस्ट २०२५ रोजी रात्री १२.२० वा. मुंबई सीएसएमटी येथून सुटेल आणि त्याच दिवशी दुपारी ३.३० वा. नागपूरला पोहोचेल.
०११२४ विशेष गाडी १० ऑगस्ट २०२५ रोजी दुपारी २.३० वा. नागपूरहून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ५.२५ वा. मुंबई सीएसएमटी येथे पोहोचेल
सीएसएमटी – नागपूर (चार [४] फेऱ्या):
०२१३९ विशेष गाडी १५ आणि १७ ऑगस्ट २०२५ रोजी रात्री १२.२० वा. सीएसएमटी येथून सुटेल आणि त्याच दिवशी दुपारी ३.३० वा. नागपूरला पोहोचेल.
०२१४० विशेष गाडी १५ आणि १७ ऑगस्ट २०२५ रोजी रात्री ८.०० वा. नागपूरहून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी दुपारी १.३० वा. मुंबई सीएसएमटी येथे पोहोचेल.
थांबे: दादर, ठाणे, कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, मनमाड, जळगाव, भुसावळ, माळखेड, शेगाव, अकोला, मुरतिजापूर, बडनेरा, धामणगाव, वर्धा
डब्यांची रचना: दोन एसी-३ टियर, बारा स्लीपर, सहा जनरल, दोन ब्रेक व्हॅन
२) सीएसएमटी – कोल्हापूर (दोन [२] फेऱ्या):
०१४१७ विशेष गाडी ०८ ऑगस्ट २०२५ रोजी रात्री १०.३० वा. सीएसएमटी येथून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी १०.१५ वा. कोल्हापूरला पोहोचेल.
०१४१८ विशेष गाडी १० ऑगस्ट २०२५ रोजी सायं. ४.४० वा. कोल्हापूरहून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे ४.४५ वा. सीएसएमटी येथे पोहोचेल.
थांबे: दादर, ठाणे, कल्याण, लोणावळा, पुणे, जेऊरी, लोणंद, सातारा, कराड, किर्लोस्करवाडी, सांगली, मिरज
डब्यांची रचना: दोन एसी-३ टियर, बारा स्लीपर, सहा जनरल, दोन ब्रेक व्हॅन
३) एलटीटी – मडगाव (चार [४] फेऱ्या):
०११२५ विशेष गाडी १४ ऑगस्ट २०२५ रोजी रात्री १०.१५ वा. एलटीटी येथून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी दुपारी १२.४५ वा. मडगाव येथे पोहोचेल.
०११२६ विशेष गाडी १५ ऑगस्ट २०२५ रोजी दुपारी १.४० वा. मडगावहून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे ४.०५ वा. एलटीटी येथे पोहोचेल.
०११२७ विशेष गाडी १६ ऑगस्ट २०२५ रोजी रात्री १०.१५ वा. एलटीटी येथून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी दुपारी १२.४५ वा. मडगाव येथे पोहोचेल.
०११२८ विशेष गाडी १७ ऑगस्ट २०२५ रोजी दुपारी १.४० वा. मडगावहून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे ४.०५ वा. एलटीटी येथे पोहोचेल.
थांबे: ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, संगमेश्वर, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिवी, करमळी
डब्यांची रचना: एक एसी-१ टियर, तीन एसी-२ टियर, सात एसी-३ टियर, आठ स्लीपर, एक पँट्री कार, एक जनरेटर कार
४) पुणे – नागपूर (सहा [६] फेऱ्या):
विशेष गाडी क्रमांक ०१४६९ ही ०८.०८.२०२५ रोजी पुणे येथून सायंकाळी १९.५५ वाजता प्रस्थान करेल आणि नागपूर येथे दुसऱ्या दिवशी दुपारी १४.४५ वाजता आगमन करेल. (एक फेरफटका)
विशेष गाडी क्रमांक ०१४७० ही १०.०८.२०२५ रोजी नागपूर येथून दुपारी १३.०० वाजता प्रस्थान करेल आणि पुणे येथे दुसऱ्या दिवशी सकाळी ०५.२० वाजता आगमन करेल. (एक फेरफटका)
थांबे: दौंड चोर्ड लाईन, अहमदनगर, कोपरगाव, मनमाड, जळगाव, भुसावळ, माळकापूर, शेगाव, अकोला, बडनेरा आणि वर्धा.
रचना: दोन एसी-३ टियर डबे, १२ स्लीपर क्लास डबे, ६ सामान्य दुसऱ्या वर्गाचे डबे आणि २ द्वितीय आसन व गार्ड ब्रेक व्हॅन.
आरक्षण माहिती:
०७ ऑगस्ट २०२५ पासून पुढील गाड्यांसाठी आरक्षण सुरू होईल:
०११२३, ०११२४, ०१४१७, ०१४१८, ०१४६९ आणि ०१४७०
०९ ऑगस्ट २०२५ पासून पुढील गाड्यांसाठी आरक्षण सुरू होईल:
०२१३९, ०२१४०, ०१४३९, ०१४४०, ०११२५ आणि ०११२७
प्रवाशांनी www.irctc.co.in या अधिकृत वेबसाइटवर किंवा जवळच्या संगणकीकृत आरक्षण केंद्रात जाऊन तिकीट आरक्षित करावे.