०६ ऑगस्ट पंचांग आणि दिनविशेष

आजचे पंचांग

  • तिथि-द्वादशी – 14:10:33 पर्यंत
  • नक्षत्र-मूळ – 13:00:53 पर्यंत
  • करण-बालव – 14:10:33 पर्यंत, कौलव – 26:24:49 पर्यंत
  • पक्ष- शुक्ल
  • योग-वैधृति – 07:17:42 पर्यंत
  • वार- बुधवार
  • सूर्योदय- 06:19
  • सूर्यास्त- 19:10
  • चन्द्र-राशि-धनु
  • चंद्रोदय- 17:03:00
  • चंद्रास्त- 28:03:00
  • ऋतु- वर्षा

जागतिक दिन :

  • आंतरराष्ट्रीय स्कुबा दिवस
  • जागतिक हिरोशिमा दिन

महत्त्वाच्या घटना :

  • 1914 : पहिले महायुद्ध – सर्बियाने जर्मनीविरुद्ध युद्ध पुकारले आणि ऑस्ट्रियाने रशियाविरुद्ध युद्ध पुकारले.
  • 1926 : गर्ट्रूड एडरली ही इंग्लिश चॅनेल ओलांडणारी पहिली महिला ठरली.
  • 1940 : सोव्हिएत युनियनने बेकायदेशीरपणे एस्टोनियाचा ताबा घेतला.
  • 1945 : अमेरिकेने हिरोशिमा, जपानवर अणुबॉम्ब टाकला. इतिहासात प्रथमच अणुबॉम्बचा वापर करण्यात आला.
  • 1952 : राष्ट्रीय विकास परिषदेची स्थापना.
  • 1960 : अमेरिकेच्या निर्बंधाला प्रतिसाद म्हणून, क्युबाने अमेरिकन बँकांसह सर्व परदेशी बँकांचे राष्ट्रीयीकरण केले.
  • 1962 : जमैकाला इंग्लंडपासुन स्वातंत्र्य मिळाले.
  • 1990 : संयुक्त राष्ट्रांनी कुवेतला जोडण्यासाठी इराकवर व्यापार निर्बंध लादले.
  • 1994 : डॉ. शिवराम कारंथ यांना राष्ट्रपती डॉ. शंकरदयाळ शर्मा यांच्या हस्ते इंदिरा गांधी पर्यावरण पुरस्कार प्रदान करण्यात आला.
  • 1997 : कोलंबो येथे भारताविरुद्धच्या कसोटी सामन्यात श्रीलंकेने 6 बाद 952 धावा केल्या. त्यात सनथ जयसूर्याने 340 धावा केल्या.
  • 2010 : भारताच्या जम्मू आणि काश्मीर प्रदेशात भीषण पूर.

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

  • 1809 : ‘लॉर्ड टेनिसन’ – इंग्लिश कवी यांचा जन्म. (मृत्यू : 6 ऑक्टोबर 1892)
  • 1881 : ‘अलेक्झांडर फ्लेमिंग’ – पेनिसिलीन औषधाचे निर्माते नोबेल पारितोषिक विजेते स्कॉटिश शास्त्रज्ञ यांचा जन्म. (मृत्यू : 11 मार्च 1955)
  • 1900 : ‘सीसिल हॉवर्ड ग्रीन’ – टेक्सास इन्स्ट्रूमेंट्स कंपनी चे सहसंस्थापक यांचा जन्म. (मृत्यू : 11 एप्रिल 2003)
  • 1925 : ‘योगिनी जोगळेकर’ – लेखिका यांचा जन्म. (मृत्यू : 1 नोव्हेंबर 2005)
  • 1933 : ‘ए जी कृपाल सिंग’ – भारतीय कसोटी क्रिकेटपटू यांचा जन्म.
  • 1959 : ‘राजेंद्र सिंग’ – भारतीय पर्यावरणवादी यांचा जन्म.
  • 1965 : ‘विशाल भारद्वाज’ – भारतीय चित्रपट दिग्दर्शक यांचा जन्म.
  • 1970 : ‘एम. नाईट श्यामलन’ – भारतीय वंशाचे अमेरिकन चित्रपट निर्माते, दिग्दर्शक व पटकथालेखक यांचा जन्म.

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

  • 1925 : ‘सुरेंद्रनाथ बॅनर्जी’ – भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे एक संस्थापक , राष्ट्रगुरू यांचे निधन. (जन्म : 10 नोव्हेंबर 1848)
  • 1965 : ‘वसंत पवार’ – संगीतकार यांचे निधन.
  • 1991 : ‘शापूर बख्तियार’ – ईराणचे 74 वे पंतप्रधान यांचे निधन. (जन्म : 26 जून 1914)
  • 1997 : ‘वीरेन्द्रकुमार भट्टाचार्य’ – ज्ञानपीठ पुरस्कार विजेते आसामी साहित्यिक यांचे निधन. (जन्म : 14 ऑक्टोबर 1924)
  • 1999 : ‘कल्पनाथ राय’ – केन्द्रीय मंत्री, काँग्रेसचे नेते यांचे निधन. (जन्म : 4 जानेवारी 1941)
  • 2001 : ‘कुमार चॅटर्जी’ – भारतीय नौदल प्रमुख आधार यांचे निधन.
  • 2019 : ‘सुषमा स्वराज’ – भारतीय महिला राजकारणी आणि भारताच्या माजी परराष्ट्र मंत्री, भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ नेत्या यांचे निधन.


दररोजच्या अपडेट्स साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.
Facebook Comments Box

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search